Bhandara Death : स्वतःच्या शेतीवर राखणदारीला गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, भंडारा कलेवाडा शेतशिवारातील घटना

Bhandara Death : स्वतःच्या शेतीवर राखणदारीला गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला, भंडारा कलेवाडा शेतशिवारातील घटना
स्वतःच्या शेतीवर राखणदारीला गेलेल्या शेतकऱ्याचा मृतदेह आढळला

मयत प्रदीप टेंभुर्णे हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या आपल्या शेतात राखणीला रात्री गेले होते. मात्र सकाळी उशिर होऊनसुद्धा घरी परत न आल्यामुळे मुलाने शेतात जाऊन पाहिले असता प्रदीप यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. याची माहिती तात्काळ अड्याळ पोलिसांना देण्यात आली.

तेजस मोहतुरे

| Edited By: वैजंता गोगावले, टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

Mar 21, 2022 | 4:19 PM

भंडारा : वन्यप्राण्यांद्वारे शेतातील पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून रात्री आपल्या शेतात जागरणाला गेलेल्या शेतकऱ्या (Farmer)चा मृतदेह (Deadbody) आढळल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या कलेवाडा येथे घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून संबंधित शेतकऱ्याच्या शरीरावर जखमा आढळून आल्याने या शेतकऱ्याची हत्या झाल्याची प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. प्रदीप टेंभुर्णे (45) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे. याप्रकरणी अड्याळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (The body of a farmer was found in the farm in bhandara)

शरीरावरील जखमांमुळे हत्या झाल्याचा अंदाज

मयत प्रदीप टेंभुर्णे हे नेहमीप्रमाणे गावालगत असलेल्या आपल्या शेतात राखणीला रात्री गेले होते. मात्र सकाळी उशिर होऊनसुद्धा घरी परत न आल्यामुळे मुलाने शेतात जाऊन पाहिले असता प्रदीप यांचा रक्तबंबाळ अवस्थेत मृतदेह आढळला. याची माहिती तात्काळ अड्याळ पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच अड्याळ पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा सुरू केला. शरीरावरील जखमांमुळे प्रदीपची हत्या झाल्याचा पोलिसांनी प्राथमिक अंदाज वर्तविला असून अड्याळ पोलिस त्या दृष्टीने तपास करीत आहेत. मृतक शेतकऱ्याचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी भंडारा येथील सामान्य रुग्णालयात पाठवण्यात आला. प्रदीप यांच्या या दुर्दैवी मृत्यूमुळे कलेवाडा गावात शोककळा पसरली आहे.

अन्य एका घटनेत मित्रांकडून मित्राची हत्या

क्षुल्लक कारणावरून 4 मित्रांनी मिळून तलवारीने वार करून एका मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना भंडारा शहरात उघडकीस आली आहे. हत्या केल्यानंतर पुरावे मिटविण्यासाठी आरोपींनी मृतदेह वैनगंगा नदीत फेकून दिला होता. ह्या प्रकरणी भंडारा शहर पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. महेंद्र उर्फ टिंकू दहिवले (36) असे मयत तरुणाचे नाव आहे. शुभम नंदूरकर (21), निशांत कटकवार (19), दीपांशु शहारे (20), हेमंत पांडे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. (The body of a farmer was found in the farm in bhandara)

इतर बातम्या

Rajasthan | घरच्यांचा लग्नाला विरोध, प्रेमी युगुल नदीवरील रेल्वे पुलावर, हायव्होल्टेज ड्राम्याने मालगाडीचा खोळंबा

Nalasopara | ‘ये XXX रोता क्यू है’, नालासोपाऱ्यात पादचाऱ्याला शिवीगाळ आणि मारहाण, दोन माथेफिरु पसार

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें