AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपच्या गोटात खळबळ, माजी नगरसेवक दाम्पत्याचा राजीनामा, हैराण करणारं कारण समोर

KDMC Election : कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्याने भाजपची साथ सोडली आहे. यामागील कारण आता समोर आले आहे.

भाजपच्या गोटात खळबळ, माजी नगरसेवक दाम्पत्याचा राजीनामा, हैराण करणारं कारण समोर
BJP Flag
| Updated on: Nov 29, 2025 | 5:49 PM
Share

राज्यातील नगर पंचायत आणि नगर पालिकांच्या निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. या निवडणुकीची घोषणा झाल्यापासून मोठ्या प्रमाणात भाजपमध्ये इनकमिंग पहायला मिळत आहे. ही निवडणूक पार पडल्यानंतर लगेच महानगरपालिकांच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यापूर्वी कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपच्या माजी नगरसेवक दाम्पत्याने भाजपची साथ सोडली आहे. यामागील कारण आता समोर आले आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

माजी नगरसेवक दाम्पत्याने भाजपची साथ सोडली

काही दिवसांनंतर कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. यासाठी भाजपने तयारी सुरू केली आहे. सध्या बरेच नेते भाजपमध्ये प्रवेश तरत असताना या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला धक्का बसला आहे. माजी नगरसेवक श्रीकर चौधरी व त्यांची पत्नी माजी नगरसेविका प्रमिला चौधरी यांचा भाजपचा राजीनामा दिला आहे. यावेळी त्यांनी पक्षावर नाराजी देखील व्यक्त केली आहे.

आता त्यांना आमची गरज नसेल तर…

भाजपचा राजीनामा देताना माजी नगरसेवक श्रीकर चौधरी यांनी म्हटले की, ‘भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेल्या लोकांनी बॅनरबाजी करत तिकीट मिळणार असल्याचे आश्वासन मिळाले आहे असं सांगितलं आहे. त्यामुळे आम्हाला दु:ख झालं आहे. कार्यकर्त्यांच्या भूमिकेचा विचार न करताच घेतले जाणारे निर्णय खटकले आहे. आता त्यांना आमची गरज नसेल तर आम्हालाही राजकारणाची गरज नाही.’

4 वेळा नगरसेवक

पुढे बोलताना श्रीकर चौधरी म्हणाले की, ‘1995 पासून पक्षात काम करत आहे. 2000 पासून मी दोन वेळा आणि माझी पत्नी दोनवेळा असं सलग चार वेळा निवडून आलो आहोत. आम्ही भरपूर जनतेची सेवा केली आहे. आता आम्ही दोघेही राजकारणातून संन्यास घेत आहोत. राजकारण वाईट झाले आहे, आपल्याच मर्जीने आलो, आपल्या मर्जीने बाहेर जात आहे. आम्ही माफिया नाही, शिक्षित आणि सरळ आहोत. तिकीट आश्वासनावरील अस्पष्टता आणि दुर्लक्ष यामुळे नाराज झालो आहोत. आता आम्ही कोणतीही निवडणूक लढवणार नाहीत.’

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याशी याबाबत बोलणं झालं का? यावर बोलताना श्रीकर चौधरी म्हणाले, ‘आमचं कुणाशीही बोलणं झालेलं नाही. आम्हाला तशी गरजही वाटली नाही. आम्ही आता राजकारणातून संन्यास घेत आहोत, त्यामुळे आम्ही आता कोणतीही निवडणूक लढवणार नाही.’

Follow Us
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...