AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला जबर धक्का, ज्या जागेसाठी लागली प्रतिष्ठा पणाला तिथेच झाला मोठा गेम, ते सीट धोक्यात?

आज विधान परिषद निवडणुकीतून उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. आता अर्ज मागे घेण्याची मुदत संपली आहे. मात्र काही ठिकाणी बंडखोर उमेदवारांनी आपले अर्ज कायम ठेवल्यामुळे महायुतीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे.

विधान परिषद निवडणुकीत महायुतीला जबर धक्का, ज्या जागेसाठी लागली प्रतिष्ठा पणाला तिथेच झाला मोठा गेम, ते सीट धोक्यात?
महायुतीला मोठा धक्का Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jun 04, 2026 | 4:34 PM
Share

आज विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आता संपली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी महायुती आणि महाविकास आघाडीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळालं. विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं पहायला मिळालं. इच्छा असूनही ज्यांना उमेदवारी मिळाली नाही, अशा नेत्यांनी बंडखोरी करत या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. ही बंडखोरी महायुतीसाठी डोकेदुखीचा विषय ठरू शकते असं वाटत असताना, अनेक ठिकाणची बंडखोरी मोडून काढण्यात महायुतीला यश मिळालं. मात्र ज्या विधान परिषदेच्या जागेकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं होतं, तिथे मात्र महायुतीला मोठा धक्का बसला आहे.

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. नाशिक विधान परिषदेची जागा महायुतीमध्ये शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला गेली आहे. नाशिकमधून नरेंद्र दराडे हे महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत. परंतु जागा वाटप होण्याच्या आधीच भाजपच्या वतीने गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तर दुसरीकडे त्यांचे बंधू गोकुळ गीते यांनी या निवडणुकीसाठी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान गीते बंधू यांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घ्यावेत यासाठी गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मंत्री गिरीश महाजन, मंत्री दादा भुसे यांचे प्रयत्न सुरू होते. अर्ज माघे घेण्याच्या शेवटच्या दिवशी गणेश गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

परंतु गोकुळ गीते ही निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत, त्यांनी शेवटच्या दिवशी देखील आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला नसल्याने आता नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये मोठं ट्विस्ट निर्माण झालं असून, ही लढत आता शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार दराडे आणि गीते यांच्यामध्ये होणार आहे. नरेंद्र दराडे यांच्यासमोर गोकुळे गीतेच्या रुपानं मोठं आवाहान निर्माण झालं आहे. गोकुळ गीते यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घ्यावा यासाठी गिरीश महाजन यांनी प्रयत्न केले मात्र तरी देखील गोकुळ गीते हे निवडणूक लढवण्यावर ठाम राहिले आहेत.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा