सर्वात मोठी बातमी! सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या खात्यापासून डावललं, कोणती खाती मिळाली?
अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर आज सुनेत्रा पवार यांनी महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आज दुपारी राष्ट्रवादीच्या आमदारांच्या बैठकीत सुनेत्रा पवार यांनी विधिमंडळाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली होती, त्यानंतर सायंकाळी सुनेत्रा पवार यांचा शपथविधी पार पडला. यावेळी राष्ट्र्वादीचे प्रमुख नेते, आमदार आणि महायुतीचे नेते उपस्थित होते. त्यानंतर आता त्यांच्याकडे 3 महत्त्वाची खाती देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खातं सुनेत्रा पवार यांनी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार यांना या महत्त्वाच्या खात्यापासून डावललं
सुनेत्रा पवार यांच्याकडे क्रीडा आणि युवक कल्याण, राज्य उत्पादन शुल्क आणि अल्पसंख्यांक खात्याची जबाबदारी देण्यात आलं असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र अजित पवारांकडे असलेले अर्थखाते मात्र सुनेत्रा पवार यांच्याकडे देण्यात आलेले नाही. समोर आलेल्या माहितीनुसार हे खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्याकडेच ठेवणार असल्याचे बोलले जात आहे. मात्र राष्ट्रवादीचे नेते हे खाते आमच्या पक्षाला मिळावं अशी मागणी करत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अर्थमंत्री पदावरून महायुतीत वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. आता भाजप अर्थमंत्रीपदावरील दावा सोडणार का? तसेच राष्ट्रवादीला हे खाते मिळाल्यात या खात्याची जबाबदारी कोण सांभाळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुनेत्रा पवार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे, राजभवनामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यपालांनी सुनेत्रा पवार यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ दिली आहे. या शपथविधी सोहळ्यासाठी राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित होते, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होण्याचा मान हा सुनेत्रा पवार यांना मिळाला आहे. दरम्यान आता शपथविधी पार पडल्यानंतर सुनेत्रा पवार मंत्रायलात जाणार नसल्याची माहिती समोर आली आहेत. त्या आता बारामतीला जाणार आहे आणि अजित दादांचा दशक्रिया विधा पार पडल्यानंतर त्या पदभार स्वीकारणार आहेत.
