AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vijay Wadettiwar: गडचिरोलीतील पूरस्थितीला भाजपाच जाबाबदार, मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा नुकसानग्रस्तांना मदत गरजेची

सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या दरम्यान, केंद्राने आणि राज्याने तातडीने मदत जाहीर केली होती. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात अशी परस्थिती ओढावली की नेतेमंडळी धावतपळत मदतीचा हात पुढे करततात. मात्र, विदर्भातील नागरिकांच्या बाबतीत अशी दुय्यम भूमिका का असाही सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

Vijay Wadettiwar: गडचिरोलीतील पूरस्थितीला भाजपाच जाबाबदार, मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा नुकसानग्रस्तांना मदत गरजेची
गडचिरोलीतील पूरग्रस्तांची पाहणी करुन नागरिकांच्या समस्या जाणून घेताना आ. विजय वडेट्टीवारImage Credit source: TV9 Marathi
| Edited By: | Updated on: Jul 24, 2022 | 4:56 PM
Share

गडचिरोली : राज्यात पावसाने हाहाकार घातलेला असून (Flood in Gadchiroli) गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती कायम आहे. शेती पिकांसह घरांची पडझड झाली असून नागरिकांना मुलभूत समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संपूर्ण जिल्ह्याला पुराचा विळखा असून याला जबाबदारही (BJP) भाजप असल्याचाच घणाघात आ. विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. सध्या मंत्रिमंडळाच्या विस्तारावरुन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची दिल्लीवारी सुरु आहे. पण या विस्तारापेक्षा पूरग्रस्तांना आणि शेतकऱ्यांना मदतीचा हात देणे गरजेचे असल्याचे मत (Vijay Wadettiwar) वडेट्टीवार यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करुन राज्य सरकारवर टीका केली. इतर जिल्ह्यांमध्ये नुकसान झाल्यास तातडीने मदत मग विदर्भातील नागरिकांच्याबाबतीत अन्याय का असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

भाजपानेच मेडीगट्टा धरणाला दिली मंजुरी

गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली याला केवळ भाजप जाबाबदार आहे. या सरकारनेच मेडीगट्टा धरण उभारणीला परवानगी दिली होती. त्यांनी केलेल्या पापामुळेच या जिल्ह्यातील नागरिकांवर ही वेळ आली आहे. या धरणाच्या बॅकवॉटरमुळेच सध्याची परस्थिती निर्माण झाली आहे. शेती पिकांचे तर नुकसान तर झालेच आहे पण वित्त आणि जीवीतहानीही मोठ्या प्रमाणात झाली आहे. या धरणाला भाजप सरकारनेच मंजुरी दिल्याचे हे परिणाम आहेत. मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होऊ द्या आगोदर नुकसानग्रस्तांना मदत मिळणे गरजेचे आहे. केवळ घोषणा करुन उपयोग नाहीतर प्रत्यक्षात शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणेही गरजेचे असल्याचे वडेट्टीवार म्हणाले आहेत.

विदर्भावरच अन्याय का..?

यापूर्वी सांगली, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती. त्या दरम्यान, केंद्राने आणि राज्याने तातडीने मदत जाहीर केली होती. सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात अशी परस्थिती ओढावली की नेतेमंडळी धावतपळत मदतीचा हात पुढे करततात. मात्र, विदर्भातील नागरिकांच्या बाबतीत अशी दुय्यम भूमिका का असाही सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला. या भागातील आदिवासी नागरिकांच्या मदतीला कोण धावून येणार? केवळ घोषणा आणि पाहणी करुन काही होत नाहीतर प्रत्यक्ष मदत मिळणे गरजेचे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

1 ऑगस्ट रोजी चित्र स्पष्ट

शिवसेनेतील बंडखोर आमदारांवरील सुनावणी ही आता 1 ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे त्याच दिवशी कोण अपात्र आणि पात्र याचा निर्णय होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावरच सर्वकाही अवलंबून आहे. शिवसेनेने 16 आमदारांना अपात्र करण्याबाबत कोर्टात धाव घेतली असून यावर पुढची सुनावणी ही आठ दिवसांनी होणार आहे. त्यामुळे त्यावर बोलण्यापेक्षा न्यायालय काय निकाल देणार हे महत्वाचे असल्याचे वडेट्टीवार यांनी सांगितले आहे.

मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही
मेलो तरी बेहत्तर, दोन व्यापाऱ्यांचा गुलाम बनून जगणार नाही.
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं
ते तर 12 जणांची प्रेयसी; भाजपने राऊतांना डिवचलं.
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते
शिवसेना- भाजपची गट स्थापना घटस्थापनेपर्यंत जाऊ शकते.
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं
मंत्री छगन भुजबळ यांच्या निर्दोष मुक्ततेनंतर राजकारण तापलं.