सरकारने बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं, शरद पवार यांच्याकडे बैठक का ? गोपीचंद पडळकर यांचा सवाल

सरकारने बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं, शरद पवार यांच्याकडे बैठक का ? गोपीचंद पडळकर यांचा सवाल
GOPICHAND PADALKAR

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट झाली, हे मला माध्यमातून समजले आहे. सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही. शरद पवार यांच्याकडे कोणतंच खातं नाही. तरी त्यांच्याकडे बैठक का ? असा रोखठोक सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Nov 22, 2021 | 6:08 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि परिवहन मंत्री अनिल परब यांची भेट झाली, हे मला माध्यमातून समजले आहे. सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही. शरद पवार यांच्याकडे कोणतंच खातं नाही. तरी त्यांच्याकडे बैठक का ? असा रोखठोक सवाल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला. मुंबईतील आझाद मैदान तसेच राज्यभरात एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु आहे. मागील तेरा दिवसांपासून कर्मचारी आपल्या मागण्यांसाठी ठाण मांडून बसले आहेत. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांना घेऊन आज परब आणि पवार यांच्यात बैठक झाली. या बैठकीबाबत बोलताना पडळकर यांनी वरील वक्तव्य केले.

पवार यांच्याकडे कोणतेही खाते नाही, त्यांच्याकडे बैठक का ?

“आज शरद पवार आणि अनिल परब यांच्यात बैठक झाल्याचं समजलं. सरकारकडून या बैठकीसाठी कोणी अधिकृत बोलत नाही. शरद पवार यांच्याकडे कोणतेही खाते नाही, तरी त्यांच्याकडे बैठक का ? सरकारची अधांतरी भूमिका आहे. गेली 13 दिवस आम्ही भूमिका मांडत आहोत. सरकार चोरासारखं का वागत आहे हे कळत नाही. एसटी महामंडळाचं राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होऊ शकत नाही, तर सरकारची भूमिका काय आहे हे सरकार ने सांगावं. सरकारने कर्मचाऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे,” असे पडळकर म्हणाले.

सरकारने कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं

तसेच पुढे बोलताना त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाच्या दिशेबद्दल भाष्य केलं. “कर्मचाऱ्यांची जी भूमिका असणार आहे तीच आमची भूमिका असेल. सरकारने कर्मचाऱ्यांशी बोलण्यासाठी आझाद मैदानात यावं, आम्ही तुम्हांला सहकार्य करू. हा संप संघटना विरहित आहे. कर्मचाऱ्यांनी संघटनेला तिलांजली दिली आहे,” असे गोपीचंद पडळकर म्हणाले.

पवार-परबांच्या बैठकीत नेमकं काय घडलं?

दरम्यान, अनिल परब यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, आजच्या बैठकीत विविध विषयांवर चर्चा झाली. यातील कोणताही मुद्दा आता सांगण्यासारखा नाही. त्यावर अभ्यास करुनच निर्णय घेतला जाईल. कर्मचाऱ्यांचं समाधान कसं करता येईल, यावर या बैठकीत चर्चा झाली. कर्मचारी आणि प्रवासी या दोघांच्याही सोयीचा पर्याय काढला जाईल. वेगवेगळे मार्ग आहेत. त्या सगळ्यांवर चर्चा नाही. निश्चित कुठल्याही निर्णयावर येत नाही तोपर्यंत त्यावर भाष्य करणं योग्य नाही, असंही पडळकर म्हणाले. तसंच वेतनवाढीचा प्रश्नही चर्चिला गेला. अन्य राज्यांचा आणि आपल्या राज्यातील पगार यावर चर्चा झाल्याची माहिती परबांनी दिली.

इतर बातम्या :

‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर

‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें