AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये’, अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर

नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बोंडे यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. बोंडेंच्या या टीकेला आता अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

'दंगलीत आरोपी असलेल्या अनिल बोंडेंनी शहाणपणा करु नये', अशोक चव्हाणांचं जोरदार प्रत्युत्तर
अशोक चव्हाण, सार्वजनिक बांधकाम मंत्री
| Edited By: | Updated on: Nov 22, 2021 | 4:36 PM
Share

नांदेड : त्रिपुरातील कथित घटनेनंतर अमरावती, मालेगाव आणि नांदेडमध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापलं आहे. या दंगलीची सखोल चौकशी करण्याच्या मागणीसाठी आज भाजपकडून राज्यभरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली. नांदेडमध्येही माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं. त्यावेळी बोंडे यांनी नाव न घेता अशोक चव्हाण यांच्यावर जोरदार टीका केली. बोंडेंच्या या टीकेला आता अशोक चव्हाण यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलंय. (Ashok Chavan responds to allegations made by Anil Bonde in Nanded riots case)

नांदेडमधील दंगलखोरांना राजाश्रय दिला जात असल्याचा आरोप अनिल बोंडे यांनी अशोक चव्हाणांवर केलाय. दंगलीत आरोपी असलेल्या बोंडे यांनी इथे येईन शहाणपणा करु नये. त्यांचे माझ्यावरील आरोप हे हास्यास्पद आहे, मानसिक संतुलन बिघडल्यासारखे बोंडे बोलत आहेत, अशी खोचक टीका अशोक चव्हाण यांनी केलीय.

अनिल बोंडे यांचा नेमका आरोप काय?

नांदेडमध्ये झालेल्या दंगलीचे कटकारस्थान करणाऱ्यांना राजाश्रय असल्याचा खळबळजनक आरोप अनिल बोंडे यांनी केलाय. अमरावती, मालेगाव आणि नांदेड इथल्या दंगलखोरांवर कारवाई करा, अशी मागणी करत भाजपनं धरणं आंदोलन केलं. नांदेडमध्ये अनिल बोंडे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. यावेळी बोंडे यांनी अशोक चव्हाण यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नांदेडमध्ये झालेली दंगल पूर्वनियोजित होती आणि दंगलखोरांना राजाश्रय दिला जात आहे. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असी मागणीही बोंडे यांनी केली आहे.

ठाण्यातही भाजपची निदर्शनं

राज्यात मालेगाव, अमरावती आणि नांदेड येथे झालेल्या दंगलींची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी करावी. या मागणीबरोबरच दंगलीच्या निषेधार्थ ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. तसेच आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले.

इतर बातम्या :

‘सरकारकडून स्पष्ट भूमिका येत नाही तोवर ‘लालपरी’चं चाक फिरणार नाही’, परब-पवारांच्या बैठकीनंतरही पडळकर ठाम

राज्यातील दंगलींच्या चौकशीसाठी ठाण्यात भाजपची निदर्शनं, निरंजन डावखरेंच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

Ashok Chavan responds to allegations made by Anil Bonde in Nanded riots case

फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.