राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडागर्दी सहन करणार नाही, आमदार पडळकरांना तत्काळ संरक्षण द्या : सदाभाऊ खोत

राष्ट्रवादी काँग्रेसची गुंडागर्दी सहन करणार नाही, आमदार पडळकरांना तत्काळ संरक्षण द्या : सदाभाऊ खोत
GOPICHAND PADALKAR AND SADABHAU KHOT

गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ला घडवून आणण्यात येत आहे, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे गुंडागर्दी यापुढे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारादेखील खोत यांनी दिला.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: prajwal dhage

Nov 08, 2021 | 11:58 PM

सरकार : गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न घेऊन महाविकास आघाडी सरकारविरोधात आवाज उठवत असल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर हल्ला केला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ला घडवून आणण्यात येत आहे, असा आरोप माजी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केला. तसेच पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे हे गुंडागर्दी यापुढे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारादेखील खोत यांनी दिला. काही दिवसांपूर्वी भाजप नेते गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची सांगली जिल्ह्यात तोडफोड करण्यात आली. त्यांचे काही कार्यकर्तेदेखील जखमी झाले. याच मुद्द्यावर सदाभाऊ खोत सांगली येथे बोलत होते.

गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका, संरक्षण देण्याची सरकारची जबाबदारी

गोरगरिबांचे आणि बहुजनांचे प्रश्न गोपीचंद पडळकर मांडतात. त्यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसकडून हल्ला घडवून आणला जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची ही गुंडागर्दी यापुढे कदापि सहन केली जाणार नाही. या आधीही राष्ट्रवादीकडून आमदार पडळकर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. भविष्यात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या जीविताला धोका असून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी ही सरकारची आहे. तेव्हा त्यांना तत्काळ संरक्षण देण्यात यावे,” अशी मागणी आमदार खोत यांनी केली.

गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात वातावरण चांगलेच तापले आहे. येथे उमदेवार पळवापळीवच्या मुद्द्यावरुन भाजप आमदार गोपीचंद पडळकर तसेच शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले होते. 7 नोव्हेंबर रोजी दोन्ही गटात चांगलाच वाद झाला होता. या वादामुळे पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली. काही कार्यकर्ते जखमीदेखील झाले होते. आटपाडी येथे सोसायटी गटातील उमेदवार फोडाफोडीच्या मुद्द्यावरुन गोपीचंद पडळकर गट आणि शिवसेना-राष्ट्रवादी गट आमनेसामने आले होते. या दोन्ही गटात चांगलाच वाद झाला होता. यामध्ये भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली होती. पडळकर यांच्या ताफ्यातील काही गाड्यादेखील फोडण्यात आल्या होत्या.

इतर बातमया :

Ahmednagar Hospital Fire | अहमदनगर जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात मोठी कारवाई, 4 अधिकारी निलंबित, दोघांच्या सेवा समाप्त

India vs Namibia T20 world cup Result: स्पर्धेचा शेवट गोड, भारताचा नामिबीयावर 9 गडी राखून विजय

नारायण राणेंनी घेतली राज्यपालांची भेट, म्हणतात ‘चर्चा झाली सांगायची नसते’

(bjp leader gopichand padalkar life is in danger state government duty to provide him protection said sadabhau khot)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें