AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘मी त्यांच्या प्रचाराला गेले नव्हते’, सुलभा गायकवाड यांचा खुलासा

कल्याण लोकसभेत युतीधर्म संकटात आल्याचे मोठे संकेत मिळालेत. भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी थेट ठाकरेंच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारात दिसल्या ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय.

'मी त्यांच्या प्रचाराला गेले नव्हते', सुलभा गायकवाड यांचा खुलासा
सुलभा गायकवाड यांचा खुलासा
| Updated on: Apr 16, 2024 | 9:55 PM
Share

कल्याणमध्ये ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासोबत एकाच जीपवर भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड बघायला मिळाल्या. त्यामुळे ठाकरे गटाच्या उमेदवाराच्या प्रचारसभेत भाजप आमदाराची पत्नी सहभागी झाल्याची चर्चा सुरु झाली. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. यावर आता सुलभा गायकवाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. “मी त्यांच्या प्रचाराला नव्हते. मला गावदेवी मंदिराचं आमंत्रण होतं. त्या निमित्ताने त्या ठिकाणी गेले. मात्र तिकडे असा प्रकार होईल हे माहिती नव्हतं. मी ठाकरे गटाच्या उमेदवारांना गुढीपाडव्यालाही शुभेच्छा दिल्या नाही. आत्ताही शुभेच्छा दिल्या नाहीत. मला कुठल्याही पक्षाचा दबाव नाही. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आहोत. त्यांच्यासोबतच राहणार. म्हणूनच त्यांना पुन्हा पंतप्रधान करणार. आमचं मत मोदींना, भारतीय जनता पार्टी ज्यांना उमेदवारी देईल त्यांनाच”, अशी प्रतिक्रिया सुलभा गायकवाड यांनी दिली.

कल्याण लोकसभेत युतीधर्म संकटात आल्याचे मोठे संकेत मिळालेत. भाजप आमदार गणपत गायकवाडांच्या पत्नी थेट ठाकरेंच्या उमेदवार वैशाली दरेकरांच्या प्रचारात दिसल्या ज्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. एकीकडे कल्याणसाठी इच्छूक असलेली भाजप, शिवसेना फुटीनंतर शिवसेनेच्याच बालेकिल्ल्यात शिंदे विरुद्ध ठाकरेंची पणाला लागलेली प्रतिष्ठा आणि त्यात राजकीय शत्रूत्वामुळे भाजप आमदारांच्याच पत्नीनं ठाकरेंच्या उमेदवाराच्या रॅलीत हजेरी लावलेली. या तीनही गोष्टींवरुन दावे-प्रतिदावे सुरु झाले आहेत.

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरण

गणपत गायकवाड हे कल्याण पूर्वचे भाजप आमदार आहेत. कल्याण पूर्व विधानसभेचा समावेश कल्याण लोकसभेत येतो. काही दिवसांपूर्वी शिंदेंचे नेते महेश गायकवाड आणि भाजपच्या गणपत गायकवाडांमध्ये वाद झाला होता. वादाचं पर्यावसान थेट पोलीस चौकीत गोळीबार करण्यापर्यंत गेलं. गोळीबारानंतर आपल्याला एकनाथ शिंदेंमुळेच गुंड बनण्याची वेळ आल्याचा आरोप गणपत गायकवाडांनी केला होता.

कल्याण लोकसभेचा गेल्या निवडणुकीचा निकाल काय?

कल्याण लोकसभेत अंबरनाथ, उल्हासनगर, कल्याण पूर्व, डोंबिवली, कल्याण ग्रामीण आणि मुंब्रा-कळवा या ६ विधानसभा येतात. 2019 ला शिवसेनेकडून श्रीकांत शिंदेंविरोधात राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील लढले होते. श्रीकांत शिंदेंना 5,59,723 तर राष्ट्रवादीच्या बाबाजी पाटलांना 2,15,380 मतं मिळाली होती. शिंदेंचा 3,44,343 मतांनी विजय झाला होता. अंबरनाथ- उल्हासनगर- कल्याण पूर्व- डोंबिवली- कल्याण ग्रामीण- या पाचही मतदारसंघात श्रीकांत शिंदेंना लीड होतं. डोंबिवलीतून शिंदेंना सर्वाधिक म्हणजे 92 हजार 990 मतांनी आघाडीवर राहिले. तर मुंब्रा-कळव्यातून बाबाजी पाटील आघाडीवर होते.

कल्याण लोकसभेतल्या आमदारांचं बलाबल पाहिल्यास, अंबरनाथमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे बालाणी किणीकर, उल्हासनगरमध्ये भाजपचे कुमार आयलानी, कल्याण पूर्वमध्ये भाजपचे गणपत गायकवाड, डोंबिवलीत भाजपचे रविंद्र चव्हाण, कल्याण ग्रामीणमधून मनसेचे राजू पाटील, तर मुंब्रा-कळव्यात शरद पवार गटाचे जितेंद्र आव्हाड आमदार आहेत, 6 पैकी अंबरनाथ या एका विधानसभेत शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आहेत. त्यामुळे विधानसभा बलाबलात महायुतीचं पारडं जड असलं, तरी लोकसभेत युतीधर्म पाळण्याचंही आव्हान असणार आहे.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.