AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘लाव रे तो व्हिडीओ’ लाडकी बहीण योजनेवरुन…, आता भाजपचे खासदार अडचणीत

maharashtra assembly election 2024: खासदार प्रणिती शिंदे यांनी धनजंय महाडिक यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी प्रचारसभेत धनंजय महाडिक यांचा तो व्हिडिओ दाखवला. 'लाव रे तो व्हिडिओ', म्हणत खासदार महाडिक यांचे वक्तव्य सभेत दाखवले.

'लाव रे तो व्हिडीओ' लाडकी बहीण योजनेवरुन..., आता भाजपचे खासदार अडचणीत
| Updated on: Nov 10, 2024 | 10:41 AM
Share

राज्यात विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सर्वात चर्चेची ठरली होती. या योजनेमुळे महायुती सरकारला ‘अच्छे दिने’ येईल, अशी अपेक्षा वाटत आहे. परंतु या योजनेसंदर्भात सत्ताधारी पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आलेल्या वक्तव्यांमुळे अडचण निर्माण होत आहे. भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ प्रणिती शिंदे यांनी भर सभेत दाखवला. अगदी ‘लाव रे तो व्हिडीओ’ या स्टाईलने व्हिडिओ दाखवत धनंजय महाडिक यांच्यावर जोरदार निशाणा साधला. तसेच बिनधास्त फोटो काढा, महाराष्ट्राच्या लेकी तुम्हाला घाबरणार नाहीत, असे आव्हान दिले. कोल्हापूर दक्षिण मतदार संघातील उजळाईवाडी येथील जाहीर सभेत प्रणिती शिंदे यांनी हे आव्हान दिले.

काय म्हणाले होते धनंजय महाडिक

भाजपचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतेच ‘लाडकी बहीण योजनेबाबत वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले होते, या योजनेचे पैसे घेणाऱ्या महिला जर काँग्रेसच्या रॅलीत किंवा सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा. ते फोटो आम्हाला पाठवा, म्हणजे आम्ही त्यांची व्यवस्था करू. त्यांच्या या वक्तव्यानंतर वाद निर्माण झाला आहे.

प्रणिती शिंदे यांचा हल्ला

खासदार प्रणिती शिंदे यांनी धनजंय महाडिक यांच्यावर जोरदार हल्ला केला आहे. त्यांनी प्रचारसभेत धनंजय महाडिक यांचा तो व्हिडिओ दाखवला. ‘लाव रे तो व्हिडिओ’, म्हणत खासदार महाडिक यांचे वक्तव्य सभेत दाखवले. त्यानंतर त्या म्हणाल्या, ही तुमची भाषा आहे का? कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र म्हणत प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक आणि भाजपवर हल्लाबोल केला आहे.

दिले थेट आव्हान

प्रणिती शिंदे यांनी धनंजय महाडिक यांना थेट आव्हान दिले आहे. बिनधास्त फोटो काढा महाराष्ट्राच्या लेकी तुम्हाला घाबरणार नाहीत. दरम्यान या वक्तव्यानंतर वाद निर्माण होताच धनंजय महाडिक यांनी माघार घेतली. ते म्हणाले, लाडकी बहीण योजने संदर्भातील माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे. काँग्रेस आणि त्यांच्या नेत्यांना आता बोलण्यासारखे काहीच मुद्दे राहिले नाहीत म्हणून ते गैरसमज पसरवत आहेत. ज्या महिला काँग्रेसच्या रॅलीमध्ये सहभागी होतील त्यांचे फोटो काढून पाठवा त्यांचे व्यवस्था आपण करू, असे मी म्हणालो होतो. कदाचित अशा महिलांना लाडका बहीण योजनेचे लाभ मिळाले नसेल त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी हे वक्तव्य केले होते, असे स्पष्टीकरण महाडिक यांनी दिले.

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.