AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मनोज जरांगे यांनी पत्ते उघडले, किती जणांना पडणार सांगितले…नाव घेण्यासाठी….

Manoj Jarange Patil On Assembly Election: मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहे. या लोकांचा 25 दिवसांचा पोळा संपला की, आम्ही सावधच आहोत आणि आमचे आंदोलन सुरू करणार आहोत.

मनोज जरांगे यांनी पत्ते उघडले, किती जणांना पडणार सांगितले...नाव घेण्यासाठी....
| Updated on: Nov 12, 2024 | 9:45 AM
Share

Manoj Jarange Patil On Assembly Election: विधानसभा निवडणुकीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आपले पत्ते उघडले आहे. आतापर्यंत नवीन आघाडी निर्माण करण्याच्या प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे यांनी उमेदवार पाडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यांच्या उमेदवार पाडण्याच्या यादीत 113 जण आहेत. ज्यांनी मराठा समाजास त्रास दिला, ज्यांनी मराठा समाजाच्या मुलांकडे पहिले नाही, त्यांना मराठे पाडू शकतात, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

कोण आहेत ते 113?

मराठा समाज विधानसभा निवडणुकीत 113 जणांना पाडणार आहे. ते 113 जण कोण आहेत? त्यावर बोलताना मनोज जरांगे म्हणाले, आपण भाजपचे नाव घेतले नाही. आपण फक्त 113 पडणार आहे, असे म्हणालो आहे. त्यांचे नाव घ्यायला ते काय देवदूत आहेत का? मी समाजाला सरळ सांगितले आहे, कोणालाही पाडा आणि कोणालाही निवडून आणा. लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळी ही मराठा समाजाला सन्मान होता. आता विधानसभेलाही मराठा समाजाला सन्मान असणार आहे. परंतु माझे मत मी समाजावर लादू शकत नाही. त्यांना अडचणी येतील, असे मला वागायचे नाही. कोणाला पाडा कोणाला निवडून आणा, ते बरोबर त्यांच्या हिशोबाने चालतील.

समाजाला संकटात आणणार नाही

मी वैयक्तिक कोणाला सांगणे म्हणजे समाजाला संकटात आणण्यासारखे आहे. उद्या सत्ता कोणाची येऊ द्या, दोन हात करायची ताकद मराठा समाजामध्ये आहे. आम्ही आमच्या आरक्षणासाठी लढणार आहोत. आम्हाला राजकारणाचा नाद लावून घ्यायचा नाही. मी स्पष्ट सांगितले आहे. कोणालाही पाडा, कोणालाही निवडून आणा, मराठा समाजाला एकदा आयुष्याचे आरक्षण द्यायचे आहे.

मराठा समाजास सर्व कळते

मराठा समाज निवडणुकीमध्ये सक्रीय आहे. त्यांना काय करायचे ते बरोबर कळते. ते वाट बघत असले तरी वेळेवर बरोबर काम करणार आहे. या लोकांचा 25 दिवसांचा पोळा संपला की, आम्ही सावधच आहोत आणि आमचे आंदोलन सुरू करणार आहोत. आमच्यासाठी आरक्षण महत्त्वाचे आहेत आणि सहा कोटी मराठ्यांना खेटणे सोपे नाही, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

आज पोरं अडचणीत आहेत, आरक्षण नसल्यामुळे आणि शेती मालाला भाव नसल्यामुळे आमचेच लोक अडचणीत आहे, त्यासाठी हा संघर्ष करायचा आहे. आपला आरक्षणात जीव आहे आणि आरक्षणापासून मी भूमिका बदलत नाही. मला मराठा समाज शंभर टक्के आरक्षण देऊन मोकळा करायचा आहे. निवडणुकीत मोठा होण्यासाठी रडरड करणारे खूप आहेत, त्यांनी ही रडरड समाजाच्या आरक्षणासाठी करावी, असे मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.