BREAKING – अखेर फॉर्म्युला ठरला, भाजप 146, शिवसेना 124 !

महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे.

BREAKING - अखेर फॉर्म्युला ठरला, भाजप 146, शिवसेना 124 !

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Assembly election 2019) निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेना यांच्या जागावाटपाचा फॉर्म्युला (BJP Shivsena seat sharing formula) ठरला आहे. भाजप 146, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांसाठी 18 जागा सोडण्यात येणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे शिवसेनेला भाजपच्या कोट्यातून 2 विधानपरिषदेच्या जागाही सोडण्यात येणार आहेत.

यापूर्वी 18 जागा मित्रपक्षांना (BJP Shivsena seat sharing formula) सोडल्यानंतर शिवसेना-भाजप युतीचं 135-135 जागा लढवण्याचं सूत्र ठरल्याचं बोललं जात होतं. शिवसेना आधीपासूनच 50-50 जागांच्या फॉर्म्युल्यावर ठाम होती. पण त्यामध्ये बदल करण्यात आला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election) भाजपने आपली पहिली 125 उमेदवारांची यादी (BJP First Candidate List) जाहीर केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नागपूर दक्षिण पश्चिम, चंद्रकांत पाटील कोथरुड, अतुल भोसले- कराड दक्षिण, शिवेंद्रराजे भोसले जावळी यांना उमेदवारी मिळाली आहे. पहिल्या यादीत विनोद तावडे यांचं नाव नाही.

पत्रक काढून महायुतीची घोषणा

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत (Maharashtra Assembly Election) महायुती होणार असल्याच्या निर्णयाबाबत एक पत्र प्रकाशित करुन माहिती देण्यात आली आहे. यात भारतीय रिपब्लिकन पक्ष (RPI), राष्ट्रीय समाज पक्ष (RSP), शिवसंग्राम (Shivsangram) आणि रयतक्रांती (Rayatkranti) या पक्षांचाही समावेश आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि शिवसेनेचे नेते सुभाष देसाई (Subhash Desai) यांच्या नेतृत्वात युतीची घोषणा करणारे प्रसिद्धी पत्रक काढण्यात आले. विशेष म्हणजे पहिल्यांदाच पत्रकार परिषदेऐवजी शिवसेना-भाजपने पत्रकाद्वारे युतीची घोषणा केली. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नागपूर येथील पत्रकार परिषदेत युतीचा निर्णय झाल्याचं सांगितलं.

संबंधित बातम्या 

BJP Candidate List | भाजपची पहिली यादी जाहीर

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI