AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BMC Mayor : त्या नियमामुळे भाजपचं स्वप्न होऊ शकतं चक्काचूर ! मुंबईत होणार ठाकरेंचाच महापौर ?

Mumbai Mayor Election 2026 : भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने युती करून मुंबई महापनगरपालिकेची निवडणूक लढवली. दोघांच्या मिळून 118 जागा आल्या असून मॅजिक फिगर गाठली. मात्र आता दोन्ही पक्षांमध्ये महापौर पदासाठी रस्सीखेच सुरू आहे. मात्र भाजप-शिदे राहिले बाजूला, थेट ठाकरे गटालाच महापौर पद मिळू शकतं, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. एका गोष्टीमुळे मोठा उलटफेर होऊ शकतो.

BMC Mayor :  त्या नियमामुळे भाजपचं स्वप्न होऊ शकतं चक्काचूर ! मुंबईत होणार ठाकरेंचाच महापौर ?
तर मुंबईत ठाकरेंचाच महापौरImage Credit source: social media
| Updated on: Jan 20, 2026 | 11:25 AM
Share

देशातील सर्वात श्रीमंत पालिका असलेल्या मुंबई महापालिकेची (BMC Election) निवडणूक अतिशय चुरशीची झाली. भाजप- शिंदे महायुती वि. ठाकरे बंधू असा लढा मुंबईत झाला. मात्र अखेर भाजप शिंदे सेनेने बाजी मारली. या निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेना शिंदे गटाचे 29 असे मिळून एकूण 118 नगरसेवक असून मुंबईत महापौर (Mumbai Mayor) आमचाच असा विश्वास महायुतीचे सर्व नेते व्यक्त करत आहेत. त्यातही महापौरपदासाठी भाजप /(BJP) -शिंदे सेनेत (Shivsena Shinde Faction)  रस्सीखेच सुरू असून भाजपा महापौर पदार ठाम आहे, तर दुसरीकडे शिंदेनांही तेच पद हवं आहे. दोन्ही गटांचं त्यांमुळे चर्चांचे गुऱ्हाळ सुरू आहे. पण यातच आता एक मोठा ट्विस्ट येऊ शकतो.

महापौरपदाच्या रेसमध्ये नसलेल्या ठाकरे गटालाच हे पद मिळतं की काय अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ॉएका निर्णयामुळे, एका नियमामुळे भाजपच्या हाता-तोंडाशी आलेला घास जाऊ शकतो, मुंबईत आपला महापौर बसवण्याचं त्यांचं स्वप्न चक्काचूर होऊ शकतं. या सर्व घडामोडींकडे संपूर्ण राज्याचच नव्हे तर देशाचंही लक्ष लागलं आहे.

असं बदलू शकतं महापौरपदाचं समीकरण

येत्या 22 जानेवारी मुंबई महानगरपालिकेसह राज्यातील एकूण 29 महानगरापालिकांसाठी सोडत काढली जाणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्वांचं पक्ष याकडे लागलं आहे. गुरूवार, 22 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता मंत्रालयामध्ये परिषद सभागृहात नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली ही सोडत प्रक्रिया पार पडेल. यंदा महापौर पदाच्या आरक्षणाची सोडत चक्राकार पद्धतीने काढली जाणार आहे. मात्र तसं झाल्यास भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेला मोठा झटका बसू शकतो. राज्यातील 29 शहरांचे महापौरपद कोणासाठी राखीव असेल, हे चक्राकार पद्धतीने यावेळी निश्चित केले जाईल. त्यामुळे ही प्रकिर्या पार पडल्यनंतरत, मुंबईचा महापौर कोणत्या प्रवर्गाचा असेल ते स्पष्ट होईल.

शिवसेना ठाकरे गटाची मुंबई महापालिकेवर सलग 25 वर्षं सत्ता होती. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतेच एक वक्तव्य़ केलं होतं, देवाच्या मनात असेल तर आमचाच महापौर होईल, असं ते म्हणाले. त्यांना या गोष्टीची कल्पना असल्यामुळेच ठाकरेंनी असं वक्तव्य केल्याचीही चर्चा आहे.

त्या नियमामुळे भाजप गमावू शकतो हाता-तोंडाशी आलेला घास

मुंबई महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण जुन्या चक्राकार पद्धतीने काढल्यास, तशी सोडत काढली गेली तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, ओबीसी आणि सर्वसाधारण प्रवर्गातून महापौर निवडला जाईल. या सोडतीमध्ये जर मुंबईचे महापौरपद अनुसूचित जमाती (ST) प्रवर्गासाठी आरक्षित झाले, तर मोठा ट्विस्ट येईल. बहुमताचा आकडा गाठूनही, सत्ता असूनही भाजप-शिवसेना महायुतीला मोठा झटका बसू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

जर मुंबईचं महापौरपद हे अनुसूचित जमातीसाठी (ST) राखीव झालं तर सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार,भाजप-शिवसेना शिंदे गट यांच्या महायुतीकडे या प्रवर्गातील एकही नगरसेवक निवडून आलेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे पक्षाचे 2 दोन नगरसेवक या प्रवर्गातून निवडून आलेले आहेत. प्रभाग क्रमांक 53 मधून जितेंद्र वळवी आणि प्रभाग क्रमांक 121 मधून प्रियदर्शनी ठाकरे हे दोन्ही उमेदवार एसटी प्रभागातून निवडून आले आहेत.

नव्या चक्राकार पद्धतीने महापौर पदाच आरक्षण काढलं जाणार असल्याची देखील माहिती सूत्रांनी दिली आहे. जरी जुन्या चक्राकार पद्धतीचा अवलंब न करता नवी पद्धत अवलंबली आणि सोडत काढली. त्यामध्ये जर अनुसूचित जातीची चिठ्ठी निघाली तर भाजप-शिंदे सेनेची कोंडी होऊ शकते. खुल्या प्रवर्गातूनही महायुतीने एसटी समाजाचा कोणताही उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवला नव्हता किंवा त्यांचा कोणताही असा उमेदवार निवडून आला नाही.

त्यामुळे जर आरक्षण एसटीसाठी सोडलं तरी भाजप-शिवसेना शिंदे गटाला धक्का बसू शकतो आणि ठाकरे गटाचा महापौर निवडून येण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे निवडणुकीत चांगली कामगिरी करून, पुरेसे संख्याबळ असूनही महायुतीला मुंबई महापौरपदापासून दूर राहावे लागू शकते.

भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश
भाजपात खळबळ, अजितदादांनी बडा नेता फोडला, थेट पक्षप्रवेश.
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार
महाबळेश्वरमध्ये राजमाता जिजाऊंचा ‘सुवर्णतुलादिन' उत्साहात पडला पार.
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार
शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष चिन्हावरील सुनावणी 21 जानेवारीला होणार.
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान
अनेक नगरसेवक आमच्या संपर्कात, भाजपच्या बड्या नेत्याचे विधान.
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?
केडीएमसीत ठाकरेंचे नगरसेवक कुणासोबत; काय आली मोठी प्रतिक्रिया?.
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर
मुंबईत महापौर कोणाचा? राऊतांच्या प्रश्नाला शिरसाट यांचे उत्तर.
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू
कल्याण डोंबिवली पालिकेत महापौर कोणाचा?; शिंदे-भाजपमध्ये रस्सीखेच सुरू.
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?
एकनाथ शिंदे नाराज; 'या' आमदारांना डच्चू देण्याची तयारी?.
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल
भाजपचा महापौर होईल, तेव्हा मुंबई शोकसागरात बुडेल; राऊतांचा हल्लाबोल.
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल
फोडाफोडीचा खेळ भाजप शिवसेनेमध्येच होणार; शिंदेंवर राऊतांचा हल्लाबोल.