ठाकरे सरकारला आव्हान, श्रीपाद छिंदमला कोर्टाचा दणका

राज्य सरकारचा निर्णय कायम ठेवत हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने (Bombay High Court) श्रीपाद छिंदमचे (Shripad Chindam) नगरसेवकपद रद्द ठेवले

ठाकरे सरकारला आव्हान, श्रीपाद छिंदमला कोर्टाचा दणका
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 8:26 AM

औरंगाबाद : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अनुद्गार काढणाऱ्या श्रीपाद छिंदम (Shripad Chindam) याचे नगरसेवक पद रद्दच ठेवण्यात आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने यासंबंधी महत्त्वपूर्ण निर्णय दिला. ठाकरे सरकारच्या निर्णयाला छिंदमने हायकोर्टात आव्हान दिले होते. परंतु सरकारचा निर्णय कायम ठेवत कोर्टाने छिंदमला दणका दिला. (Bombay High Court slams Shripad Chindam)

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अनुद्गार काढल्यामुळे अहमदनगर महापालिका आणि राज्य सरकारने तत्कालीन उपमहापौर श्रीपाद छिंदमचे नगरसेवकपद रद्द केले होते. शासन निर्णयाच्या विरोधात छिंदमने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. अखेर उच्च न्यायालयानेही श्रीपाद छिंदमला झटका दिला.

काय होता निर्णय?

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अवमानकारक भाषा वापरणारा नगरसेवक श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारने गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात दणका दिला होता. श्रीपाद छिंदम याचं नगरसेवकपद रद्द करण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला. महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी श्रीपाद छिंदमवर कारवाई करण्यात आली होती.

तत्कालीन महापालिकेतील सभागृहाने छिंदमचं पद रद्द झाले पाहिजे, यासाठी ठराव केला होता. त्याबाबतची सुनावणी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रालयातील दालनात झाली.

काय आहे प्रकरण?

अहमदनगरचा तत्कालीन उपमहापौर आणि भाजपच्या तिकीटावर त्यावेळी नगरसेवकपदी निवडून आलेल्या श्रीपाद छिंदम याने महापालिका कर्मचाऱ्याशी दूरध्वनीवरुन बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अवमान करणारे अपशब्द वापरले होते. तीन वर्षांपूर्वी घडलेल्या या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे गेल्या वर्षी श्रीपाद छिंदम गेल्या वर्षी अहमदनगर महापालिकेच्या निवडणुकीला पुन्हा उभा राहिला होता. अपक्ष उभ्या राहिलेल्या छिंदमचा निवडणुकीत त्याचा विजयही झाला. त्यानंतर छत्रपती शिवरायांच्या तसबीरीला अभिवादन करत त्याने प्रायश्चित्त घेण्याचा प्रयत्न केला होता.

छिंदमने गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत बसपच्या तिकीटावर रिंगणात उतरण्याची हिंमतही केली होती. परंतु मतदारांनी नाकारल्यामुळे तो विधीमंडळाची पायरी चढू शकला नाही.

संबंधित बातम्या :

छत्रपती शिवरायांचा अवमान भोवला, श्रीपाद छिंदमला ठाकरे सरकारचा दणका

नगरसेवक पद रद्द, श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया

(Bombay High Court slams Shripad Chindam)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.