अपक्ष लढणार, पण लोकसभा निवडणूक लढणारच…!; शेतकरी नेत्याचा एल्गार

Ravikant Tupkar on Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. अशात कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार याची उत्सुकता राजकीय वर्तुळासोबतच सर्वसामान्य लोकांमध्ये देखील आहे. अशातच एका शेतकरी नेत्याने लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे.

अपक्ष लढणार, पण लोकसभा निवडणूक लढणारच...!; शेतकरी नेत्याचा एल्गार
Follow us
| Updated on: Mar 19, 2024 | 12:37 PM

गणेश सोळंकी, प्रतिनिधी- टीव्ही 9 मराठी, बुलढाणा | 19 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकीचा रणसंग्राम सुरु झाला आहे. अशात महाराष्ट्रात आघाडी आणि युतीच्या चर्चा सुरु आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचं जागावाटप अद्याप जाहीर झालेलं नाही. अशात आता एका शेतकरी नेत्याने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेतल्याचं दिसतं आहे. लोकसभा निवडणूक लढण्याचा मानसही त्यांनी बोलून दाखवला आहे. अपक्ष लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घतोय. जनतेचा आग्रह आहे की मी निवडणूक लढवावी. मतदार संघात प्रचार सुरू केला आहे, असं शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी म्हटलं आहे.

निवडणूक लढणारच- तुपकर

लोकांच्या आग्रहाखातिर ही निवडणूक लढणार आहे. एक नोट एक व्होट… या पद्धतीने निवडणूक लढणार आहे. जनतेचा विजय निश्चित होईल आणि ऐतिहासिक निकाल लागेल असं रविकांत तुपकर म्हणाले. माझ्या निवडणूक लढण्याच्या निर्णयाने प्रस्थापितांच्या पाया खालची वाळू सरकली आहे. रस्त्यावरची लढाई सभागृहात न्यायाची अशी भावना शेतकऱ्यांची आहे. सोयाबीन कापसाचा आवाज दिल्लीतील सभागृहात घुमला पाहिजे. पक्षाचे झंदे मी बाजूला ठेऊन आणि एकत्र येऊ, अशी परिस्थिती लोकांनी केलीय. ते राजकीय समीकरणे सुद्धा बिघडली आहेत, असं रविकांत तुपकरांनी म्हटलं.

“शेतकरी हाच माझा पक्ष”

जनशक्ती विरुध्द धनशक्ती अशी निवडणूक होणार आहे. अद्याप उद्धव ठाकरे यांना भेटलो नाही, तशी चर्चा केली नाही. फक्त बातम्या येत आहेत. शरद पवारांनी माझे नाव उद्धव ठाकरेंकडे सांगितले, हे मला माहिती नाही. गाव गाड्यातील शेतकरीच माझा पक्ष आहे. सामान्य माणूस म्हणजे आपला पक्ष आहे. त्यांच्याच आशिर्वादाने मी निवडून येणार, असं विश्वास तुपकरांनी व्यक्त केला.

राजू शेट्टींवर निशाणा

यापूर्वी राजू शेट्टी सह अनेक नेते अपक्ष खासदार झालो आहे. निवडणुकीत पैशाची गरज नाही. लोकच मला वर्गणी देत आहेत. निवडणुकीत तेच मतदान करतील. शेतकऱ्यांचा नेता म्हणून दिल्लीत जायचे. त्यासाठी सगळ्यांनी तयारी केलीय. राजू शेट्टी हे फक्त स्वतःच पाहतात आणि आघाडीत वाटाघाटी करतात. मग आम्ही का फक्त भजन करत बसायचं का?, असा सवाल तुपकर यांनी केला आहे.

राजू शेट्टी यांचे भूमिकेशी मी सहमत नाही, ते त्यांची भूमिका काय घायाची ते घेतील. संघटना प्रत्येक कार्यकर्त्याची आहे. त्यांनी काय निर्णय घायचा तो घ्यावा. कुण्या पक्षाचा पाठिंबा मिळेल असं वाटत नाही. फाईट जी होणार ती फक्त माझ्याशीच होणार, असं तुपकरांनी म्हटलं आहे.

Non Stop LIVE Update
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला
ठाकरेंचे किती आमदार अन् खासदार संपर्कात? सामंतांनी थेट आकडा सांगितला.
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग
माझ्यावर मताचा पाऊस पाडा, मी तुमच्यावर...भरपवसात पंकजा मुंडेंची बॅटींग.
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट
ठाकरेंना राजीनामा देण्यास कुणी भाग पाडलं? सेनेच्या नेत्याचा गौप्यस्फोट.
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न
गरिबांच्या मुलांना मराठीतून...सोलापुरातील सभेत मोदींनी सांगितलं स्वप्न.
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप
त्यांनी मला जीवे मारण्याचा प्रयत्न केला, उदय सामंत यांचा गंभीर आरोप.
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला
मोठ्या मनाचा माणूस...राज ठाकरेंच कौतुक करत शिंदेंचा ठाकरेंना खोचक टोला.
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?
उबाठा म्हटलं की उलटी आल्यासारखं... राणेंची खोचक टीका, बघा काय म्हणाले?.
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?
शरद पवार यांना भाजप देणार मोठा धक्का? तरुण, तडफदार नेतृत्व साथ सोडणार?.
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?
कुणाची तरी 200 एकर जमीन लखनऊमध्ये जप्त, लवकरच... शिंदेंचा रोख कुणावर?.
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका
मुख्यमंत्रीपदासाठी दुसऱ्यांच्या मांडीवर... मनसे नेत्याची ठाकरेंवर टीका.