“काय उखाडायचे ते उखाडून घ्या…”; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले…

शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

काय उखाडायचे ते उखाडून घ्या...; शिवसेनेच्या आमदाराने विरोधकांना खडसावून सांगितले...
Follow us
| Updated on: Apr 19, 2023 | 7:01 PM

बुलढाणा : बुलढाणा शहरातील विकासावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोप टोकाला गेले आहेत. एकीकडे राज्यात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरून राजकारण ढवळून निघाले असतानाच आता बुलढाणा शहरातील शिवसेना आणि काँग्रेस हा वादही आता टोकाला पोहचला आहे. शहरातील विकासाच्या मुद्यावरून आता आमदार धीरज लिंगाडे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाली आहे. त्यावरून आता आमदार संजय गायकवाड यांनी अतिक्रमणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्यावर टीका टिपण्णी केल्यानंतर त्यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, शहरातील ज्या टपऱ्यांच्या अतिक्रमाणाविषयी टीका केली जात आहे.

त्या टपऱ्या सगळ्या गोरगरीबांच्या आहेत आणि त्या जर गोरगरीबांच्या टपऱ्या असतील तर आम्ही आणखी 100-500 टपऱ्यांचे अतिक्रमण करणार असा टोला त्यांनी काँग्रेसला लगावला आहे. त्यामुळे हा वाद आणखी चिघळणार असल्याचे दिसून येत आहे.

यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी काँग्रेसचे आमदार धीरज लिंगाडे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांच्यावर टीका करताना म्हणाले की, बुलढाणा नगरपालिकेत आमदार धीरज लिंगाडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन विविध विषयावर चर्चा केली होती. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ देखील या बैठकीला उपस्थित होते.

या बैठकीवेळी त्यांनी गावातील अतिक्रमणधारकांचा मुद्दाही उचलून धरला होता. त्यावरूनच शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली होती. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षात माजी आमदार सपकाळ यांनी एक टक्काही काम केलं नाही.

त्यामुळे त्यांना या अतिक्रमणाविषयी बोलण्याचा कोणताही अधिकार नाही. शहरातील ज्या काही टपऱ्या आहेत, त्या गरीबांच्या टपऱ्या आहेत.त्यामध्ये काय आमचे नातेवाईक राहत नाहीत.

त्यामुळे शहरात आणखी शंभर पाचशे टपऱ्या उभारणार असल्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे. त्यामुळे कुणाला काय उखाडायचे ते उखाडून घ्या, असं म्हणत संजय गायकवाड यांनी विरोधकांना थेट इशाराच दिला आहे.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.