महिलांनी ‘त्याला’ तुडव-तुडव तुडवलं, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं?

बुलढाण्याचा एका व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओत दोन महिला एका पुरुषाला चपलेने मारहाण करताना दिसत आहेत. संबंधित प्रकार हा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयातला असल्याची माहिती समोर आलीय.

महिलांनी 'त्याला' तुडव-तुडव तुडवलं, बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नेमकं काय घडलं?
Follow us
| Updated on: Oct 04, 2023 | 7:09 PM

गणेश सोळंकी, Tv9 मराठी, बुलढाणा | 4 ऑक्टोबर 2023 : नारीशक्ती जिंदाबाद, असं आपण म्हणतो ते उगाच नाही. चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लढण्यासाठी महिलांमधील नारीशक्ती जागी झाली तर ती चुकीचं वागणाऱ्या लोकांना सळो की पळो करुन सोडते. बुलढाण्यात याचाच प्रत्यय बघायला मिळाला आहे. बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नारी शक्तीचं रौद्ररुप बघायला मिळालं आहे. ग्रामपंचायत उपसरपंच आणि सदस्यांना शिवीगाळ करुन पैसे मागणाऱ्या एका व्यक्तीला मारहाण करण्यात आलीय. या व्यक्तीने तक्रार मागे घेण्यासाठी 1 लाख रुपयांची मागणी केली होती.

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील भालेगाव येथील महिला उपसरपंच आणि सदस्य अनिता काळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आपले रौद्ररूप धारण केलं. त्यांनी अश्लील शिवीगाळ आणि 1 लाख रुपये मागणाऱ्या संतोष चांदणे या व्यक्तीला चपलेने चांगलेच धुतले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

संतोष चांदणे याने भालेगाव सह तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत सदस्यांविरोधात अतिक्रमण केल्याची तक्रार केलीय. तो हे प्रकरण आपसात मिटवण्यासाठी पैसे उकळतो असा आरोप आहे. त्याने भालेगावचे महिला उपसरपंच मंगला निकम आणि अनिता काळे यांच्यासोबतही असंच काहीसं केलं. संतोष चांदणे याने दोन्ही महिलांकडे 1 लाख रुपयांची मागणी, तसेच अश्लील शिवीगाळही केल्याचा आरोप आहे.

मंगला निकम आणि अनिता काळे यांची संतोष चांदणे याने जिल्हाधिकारी कार्यालयात तक्रार केलीय. ही तक्रार मागे घेण्यासाठी त्याने महिलांकडे 1 लाखांची मागणी केली. तसेच महिला पैसे देण्यास तयार न झाल्याने त्याने महिलांना शिवीगाळ केली. त्यामुळे महिलांना राग अनावर झाला. यावेळी निकम आणि काळे या महिलांनी संतोष चांदणे याला चपलेने चांगलेच धुतले. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या गोंधळाचा आणि मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

संबंधित प्रकरणी आता प्रशासनाकडून काही कारवाई करण्यात येते का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. संबंधित व्यक्तीकडून अशाप्रकारे किती जणांना फसवण्यात आलं किंवा त्या व्यक्तीवर तशे फक्त आरोप करण्यात आले आहेत का? याचा खुलासा आता प्रशासनाकडून केला जातो का? ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Non Stop LIVE Update
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी
अनुज थापनच्या कुटुंबाची उच्च न्यायालयात धाव, सलमानवर कारवाईची मागणी.
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?
पुढील 36 तास महत्वाचे, समुद्रात मोठ्या लाटा उसळणार, काय दिलाय इशारा?.
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल
अविनाश जाधव यांची सराफाच्या मुलाला मारहाण, CCTV व्हिडीओ व्हायरल.
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल
अजित पवारांचं कौतुक करताना महादेव जानकर चुकले, व्हिडीओ तुफान व्हायरल.
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला...
राणेंच्या आव्हानाला ठाकरेंचं प्रत्युत्तर, म्हणाले तू आडवा येच तुला....
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत
लोकांनी ठरवलं तर काही चमत्कार होऊ शकतो, पंकजा मुंडेंचं भाषण चर्चेत.
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.