ऑनलाईन बिघाड; मुक्ताईनगर ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज नाही!

जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. (candidates couldn't filled Gram Panchayat Election form because of technical issue)

ऑनलाईन बिघाड; मुक्ताईनगर ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज नाही!

जळगाव: जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील 51 ग्रामपंचायत निवडणुकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र, ऑनलाईन पद्धतीने उमदेवारी अर्ज भरण्यात अडचणी येत असल्याने दोन दिवस उलटले तरी एकाही उमदेवाराला आपला अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. (candidates couldn’t filled Gram Panchayat Election form because of technical issue)

राज्यातील 14 हजाराहून अधिक ग्रामपंचायतीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. ग्रामपंचायतीसाठी येत्या 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी राज्यात सर्वत्र उमेदवारी अर्ज भरण्याची एकच झुंबड उडालेली आहे. मात्र मुक्ताईनगर तालुक्यातील 51 पैकी एकाही ग्रामपंचायतीत अद्यापपर्यंत एकाही उमेदवाराने अर्ज भरलेला नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना ऑनलाईनपद्धतीने अर्ज भरण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, ऑनलाई अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या तांत्रिक अडचणीमुळे गेल्या दोन दिवसात एकाही उमेदवाराला एकही अर्ज भरता आलेला नाही. त्यामुळे इच्छुक उमेदवार आणि राजकीय पक्षांमध्ये प्रचंड संताप पसरला आहे.

सेतू केंद्रावर गर्दी

दरम्यान, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी तालुक्यातील सेतू केंद्रावर प्रचंड गर्दी झाली आहे. उमेदवार आणि त्यांचे समर्थक एकाच वेळी सेतू केंद्रावर आल्याने ही गर्दी झाली असून त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचं पाहायला मिळत आहे.

जिल्ह्यात केवळ 70 अर्ज दाखल

जळगाव जिल्हयात ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आता पर्यंत जिल्ह्यात 70 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात सर्वाधिक 14 अर्ज बोदवड तालुक्यातील आहेत. तर, यावल तालुक्यात अजून पर्यंत एकही अर्ज दाखल झालेला नाही. नामांकन सादर करण्याच्या पहिल्या दिवशी एकाही उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला नव्हता. मात्र 783 ग्रामपंचायतीसाठी आतापर्यंत केवळ 70 नामांकन अर्ज दाखल करण्यात आला आहे. जानेवारीपासून नव्या वर्षात निवडणूक प्रचाराचा धुरळा उडणार असून 15 जानेवारी रोजी मतदान तर 17 जानेवारी मतमोजणी होणार आहे. जिल्हयात 1152 ग्रामपंचायतीपैकी पहिल्या टप्प्यात 783 ग्रामपंचायतीच्या निवडणूका होत आहेत. यात सर्वात जास्त पाचोरा तालुक्यात 96 ग्रामपंचायतींची निवडणूक होऊ घातली आहे. तर सर्वात कमी भुसावळ तालुक्यात 26 ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. (candidates couldn’t filled Gram Panchayat Election form because of technical issue)

 

संबंधित बातम्या:

ग्रामपंचायत निवडणूक लढवायची आहे? मग तुम्हाला ‘या’ अर्जाची पोचपावती गरजेची

तुमच्या ग्रामपंचायत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम एका क्लिकवर

ग्रामपंचायत निवडणुकांचं बिगुल वाजलं, अर्ज भरण्यास सुरुवात, यंदा महत्त्वाचे दोन बदल कोणते?

(candidates couldn’t filled Gram Panchayat Election form because of technical issue)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI