AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे… छे… ते कशाला पाहिजे?; चंद्रकांत खैरे यांनी गजानन कीर्तिकर यांचा तो सल्ला लावला उडवून

उद्धव आणि राज ठाकरे एकत्र येण्याबद्दल मराठवाड्यातील उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते चंद्रकांत खैरे महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. त्याचसोबत त्यांनी गजानन कीर्तीकर यांचा सल्लादेखील उडवून लावला आहे.

एकनाथ शिंदे... छे... ते कशाला पाहिजे?; चंद्रकांत खैरे यांनी गजानन कीर्तिकर यांचा तो सल्ला लावला उडवून
Chandrakant Khaire and Eknath ShindeImage Credit source: Tv9
| Updated on: Jun 08, 2025 | 2:06 PM
Share

उद्धव आणि राज ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र येण्यासाठी नातेवाईकांचे प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊत आणि अनिल परब यांच्यावर जबाबदारी आहे. दोन्ही भाऊ एकत्र येण्यासाठी नातेवाईकसुद्धा प्रयत्न करत आहे. याबाबत अनिल परब यांच्यावर जबाबदारी आहे, अशी प्रतिक्रिया मराठवाड्यातील उद्धव ठाकरे गटाचे मोठे नेते चंद्रकांत खैरे यांनी दिली. परंतु यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते गजानन कीर्तिकर यांनी दिलेला सल्ला उडवून लावला आहे. “एकनाथ शिंदे छे….ते कशाला पाहिजेत? त्यांनी उद्धव, आदित्य ठाकरे यांना त्रास दिला आहे. आम्हाला एकनिष्ठ असलेली व्यक्ती पाहिजे. गजानन कीर्तीकर हे तसं बोलले असतील कारण त्यांचा मुलगा आमच्याकडे आहे. त्यामुळे त्यांना शिंदेंसोबत जाऊन पश्चात्ताप होतोय,” असं ते पुढे म्हणाले.

“राज आणि उद्धव ठाकरे यांची युती होत असेल तर या युतीत एकनाथ शिंदे हवेत. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचा विचार आणि हिंदुत्व पुढे घेऊन जात आहेत. त्यांच्याकडे शिवसेना नाव आणि चिन्ह आहे. त्यामुळे शिंदेंनाही या युतीत घेतलं पाहिजे. त्यासाठी मी स्वत: प्रयत्न करेन. बाळासाहेबांची जशी एकसंघ शिवसेना होती. तशीच एक संघ शिवसेना पुन्हा निर्माण व्हायला पाहिजे”, असं गजानन कीर्तिकर यांनी स्पष्ट केलं होतं.

“उद्धव आणि राज ठाकरे एकत्र आले तर ते दोघं मिळून महायुतीला धडा शिकवतील. दोन्ही बंधू एकत्र येतील म्हणून अजित पवार आणि सुप्रिया सुळेसुद्धा एकत्र येण्याच्या उकळ्या फुटत आहेत. एकनाथ शिंदे गटाची परिस्थिती काही दिवसांत वाईट होईल. शिवसेना फोडली याचं गजाभाऊंनादेखील वाईट वाटतंय”, असा टोला खैरेंनी लगावला आहे. यावेळी त्यांनी राणे कुटुंबीयांवरही जोरदार टीका केली. “नारायण राणे यांच्या पुत्रांनी भाजप संपवण्याचा घाट केला आहे. त्यांना शिस्त नाही. त्यांच्याकडे लक्ष द्यायला नको. ते घाणेरडं बोलत आहेत. थांबा, तुम्हालाच आम्ही जेलमध्ये टाकणार आहोत. यांची खूप प्रकरणं आहेत, हेच जेलमध्ये जाणार आहेत. राणे परिवार भाजपाला संपवण्याचा घाट घालत आहे. त्यांना शिस्त नाही. राणे परिवाराला आम्ही तुरुंगात टाकू. त्यांचे अनेक मोठे कारनामे आम्हाला माहीत आहेत”, असं ते म्हणाले.

मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!
एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार? संजय शिरसाट स्पष्टच बोलले!.
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा
गिरणी कामगारांना खुशखबर! अधिवेशनात एकनाथ शिंदेंची मोठी घोषणा.
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा
फडणवीस पंतप्रधान होणार? महायुतीच्या नेत्याचा मोठा खुलासा.
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत
शिंदे, फडणवीस की पवार?मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीवर भास्कर जाधवांचे संकत.
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात
राज्याच्या हिताची चर्चा नाही! अधिवेशनावर सुप्रिया सुळे यांचा घणाघात.