AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘काय तर म्हणे दादाचा वादा, मी काय लल्लूपंजू आहे काय?’; छगन भुजबळ यांचा अजित पवारांना सवाल

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, मात्र नव्या मंत्रिमंडळात छगन भुजबळ यांना स्थान देण्यात आलं नाही, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

'काय तर म्हणे दादाचा वादा, मी काय लल्लूपंजू आहे काय?'; छगन भुजबळ यांचा अजित पवारांना सवाल
| Updated on: Dec 17, 2024 | 4:40 PM
Share

रविवारी मंत्रिमंडळाचा विस्तार झाला, या मंत्रिमंडळाचं वैशिष्ट म्हणजे या मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली, तर काही अनुभवी नेत्यांचा पत्ता कट करण्यात आला. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना देखील मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं नाहीये, यावरून त्यांनी नाराजी व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट सवाल केला आहे.

नेमकं काय म्हणाले भुजबळ ? 

काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले. कारण मला मंत्री केलं नाही म्हणून. मंत्रिपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता नाही भेटलं त्यात काही वाद नाही. पहिल्यांदा मी महसूल मंत्री झालो आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणं सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केलं. 1999 साली जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो, मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी शरद पवारांसोबत गेलो. राष्ट्रवादी स्थापन झाली तेव्हा कोणाचा पत्ता नव्हता फक्त मी आणि शरद पवार साहेब होतो. जेव्हा मुंबईत दहशत होती तेव्हा मी गृहमंत्री झालो. बच्चन, शाहरुख मुंबई सोडून जाणार होते, मी त्यांना थांबवलं आणि मुंबईतली दहशत संपवली असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, होळीच्या दिवशी मला रस्त्यातून अजितदादांनी बोलावून घेतलं आणि मला लोकसभा लढवायला सांगितलं. जेव्हा मी म्हंटल लोकसभा लढणार नाही, मग त्यावेळी अजितदादांनी पुढे येऊन लगेच सांगायला पाहिजे होत ना, मी काय दूध पितो का? मी काही लहान बाळ आहे का? मला समजत नाही का?

साताऱ्याची जागा आम्ही भाजपला सोडली म्हणून एक राज्यसभा आम्हाला मिळाली होती अजित दादांनी शब्द दिला म्हणजे काय? काही चर्चा आहे की नाही. शरद  पवार साहेब सुद्धा चर्चा करून निर्णय घ्यायचे, आठ दिवसांपूर्वीच समीर भाऊंना पटेल यांनी बोलावून घेतलं आणि सांगितलं की भुजबळांना राज्यसभेवर पाठवू. मकरंद पाटील यांना मंत्री करण्यासाठी मला राज्यसभेवर पाठवायचं? मी काय मूर्ख आहे का?  इतरांना दिलेला शब्द पाळण्यासाठी भुजबळांचा बळी घेणार का? मी काही लल्लू-पंजू आहे का? चर्चा सुद्धा नाही केली की कोण मंत्री होणार? माझी जर किंमत नाही तर मी काय करायला पाहिजे, तुम्ही शब्द दिला म्हणजे काहीही करायचं का? काय तर म्हणे दादाचा वादा, असं यावेळी भुजबळ यांनी म्हटलं आहे.

नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द
नाशिक तपोवन परिसरातील प्रस्तावित MICE सेंटरची निविदा अखेर रद्द.
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन
जब तक सूरज चांद रहेगा, गांधी तेरा... 'मनरेगा'विरोधात संसद भवनला आंदोलन.
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट
लवकरच बॉम्ब फोडणार, त्यांनी कॅश बॉम्ब...शिंदेंच्या आमदाराचा गौप्यस्फोट.
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी
ठाकरेबंधू-शिंदेंची शिवतीर्थसाठी रस्सीखेच, प्रचारसभेसाठी कुणाला परवानगी.
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!
BMC साठी महायुतीची पहिली बैठक अन् दादांच्या NCP ला निमंत्रण नाही!.
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार
गांधी कुटुंबाला दिलासा, ED आरोपपत्राची दखल घेण्यास कोर्टाचा नकार.
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर
इलेक्शन जीतकर हम होंगे असली धुरंधर...शिंदेंच्या टीकेवर राऊतांचं उत्तर.
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा
महायुतीची राज्यात सर्वच ठिकाणी तंतरली... दानवे यांचा सरकारवर निशाणा.
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?
...तर दिल्लीत आंदोलन करणार; जरांगे पाटील यांचा थेट इशारा, प्रकरण काय?.
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर
अखेर 'तो' क्षण येणार, मनसे-ठाकरेंची युती कधी होणार? तारीख समोर.