AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तीन दिवसानंतरही अधिकाऱ्याने रेमडेसिवीर दिल्या नाही; संतप्त भुजबळांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव

तीन दिवस सातत्याने संपर्क साधूनही अन्न व औषध प्रशासना आयुक्तांनी नाशिकला रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा केला नाही. (chhagan bhujbal wrote cm uddhav thackeray for remdesivir shortage in nashik)

तीन दिवसानंतरही अधिकाऱ्याने रेमडेसिवीर दिल्या नाही; संतप्त भुजबळांची थेट मुख्यमंत्र्यांकडे धाव
chhagan bhujbal
| Updated on: Apr 26, 2021 | 5:08 PM
Share

मुंबई: तीन दिवस सातत्याने संपर्क साधूनही अन्न व औषध प्रशासना आयुक्तांनी नाशिकला रेमडेसिवीर इंजेक्शनचा सुरळीत पुरवठा केला नाही. त्यामुळे संतप्त झालेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे धाव घेतली आहे. रुग्णसंख्येनुसार नाशिकला रेमडेसिवीरचा पुरवठा करा, अशी मागणीच भुजबळांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्र लिहून केली आहे. (chhagan bhujbal wrote cm uddhav thackeray for remdesivir shortage in nashik)

नाशिकमध्ये रेमडेसिवीर इंजेक्शनचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिक जिल्ह्यात रुग्णसंख्येच्या प्रमाणात रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा उपलब्ध नसल्याने नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ हे गेल्या तीन दिवसांपासून राज्याचे अन्न, औषध प्रशासनाचे आयुक्त परिमल सिंग यांच्याशी सातत्याने संपर्क करून पुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना देत होते. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील साठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे भुजबळ चांगलेच संतप्त झाले असून त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना फोन करून नाशिक जिल्ह्याला रेमडेसिवीर इंजेक्शन निश्चित सूत्रानुसार वितरण करावे, अशी मागणी केली आहे. तसेच याबाबत त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र देऊन रेमडेसिवीरचा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.

केवळ 450 रेमडेसिवीर मिळत आहे

नाशिक जिल्ह्यासाठी दररोज 10 हजार रेमडेसिवीरची मागणी असतांना नाशिकला केवळ 450 इंजेक्शनचा पुरवठा होत आहे. त्या तुलनेत ठाणे, पुणेसह नागपूर शहराला तब्बल चौपट स्वरूपात म्हणजेच जवळपास 1600 हून जास्त इंजेक्शनचा दररोज पुरवठा केला जात आहे. लोकसंख्येच्या तुलनेत बाधितांची संख्या या शहरांपेक्षा नाशिक शहर व जिल्ह्यात अधिक असतांना नाशिकमध्ये कमी प्रमाणात रेमडेसिवीरचा पुरवठा होत असल्याने नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात रुग्णांचे हाल होत असल्याचे भुजबळांनी या पत्रात म्हटले आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनचे समन्यायी पद्धतीने वाटपासाठी राज्यस्तरावरून वाटप करत असतांना सक्रीय रुग्णसंख्या विचारात घेऊन सदर इंजेक्शन वाटपाचे सूत्र निश्चित करण्यात आले आहे. त्यानंतर राज्यातील सदर उत्पादकांद्वारे सदर साठा पुढील वितरणासाठी संबंधित जिल्ह्यातील वितरकांकडे प्राप्त होईल व सर्व जिल्हाधिकारी सदर साठा जिल्ह्यामध्ये त्वरित वितरीत करतील अशा सूचना आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील दि. 20 एप्रिल 2021 रोजीची सक्रीय रुग्णसंख्या हि राज्याच्या एकूण रुग्णसंखेच्या 6.48% असल्याचे दर्शविले आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे.

म्हणून साठा कमी येतो

धुळे व अहमदनगर जिल्ह्याकरिता देण्यात येणारा रेमडेसिवीर इंजेक्शनचा साठा नाशिक येथील वितरकांना देण्यात येतो. त्यामुळे सदर साठा प्रत्यक्षात इतर जिल्ह्यांना जाणार असला तरी सुद्धा नाशिकच्या नावे नोंदविला जात असल्याने प्रत्यक्षात नाशिकला कमी साठा उपलब्ध होतो. रुग्णसंख्येच्या तुलनेत जो साठा उपलब्ध व्हायला पाहिजे त्यापेक्षा कमी साठा उपलब्ध होत आहे. त्यामुळे इतर जिल्ह्यात जात असलेला साठा हा त्याच जिल्ह्याच्या वितरकांचे नावे देण्याबाबत सदर कंपनीचे अधिकारी यांना सूचित करण्यात येऊन नाशिक जिल्ह्यात रुग्णांच्या तुलनेत येत असलेला रेमडेसिवीरचा साठा अतिशय कमी येत असल्याने नाशिककरांवर हा मोठ्या अन्याय होत आहे. नाशिक जिल्ह्यातील रेमडेसिवीरचा साठा सुरळीत करून हा अन्याय आपण दूर करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. (chhagan bhujbal wrote cm uddhav thackeray for remdesivir shortage in nashik)

मुख्यमंत्र्यांचं आश्वासन

केंद्राने रेमडेसिवीर इंजेक्शनचा डबल कोटा केल्यामुळे डबलच्या हिशोबाने तसे वाटप सुद्धा सुरू करण्यात आले. मात्र स्टोकिस्टने वाढीव रेमडेसिवीरचा साठा दिलाच नाही. त्यामुळे काही जिल्ह्यांमध्ये कमी साठा मिळाला. मात्र मी यात लक्ष घालून नाशिकवर अन्याय होऊ देणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल्याचं भुजबळांनी सांगितलं. (chhagan bhujbal wrote cm uddhav thackeray for remdesivir shortage in nashik)

संबंधित बातम्या:

कृषीमंत्री दादा भुसेंच्या मुलाचं शिवसेना खासदार कन्येशी लग्न, गुपचूप लगीन उरकलं!

नाशिकच्या क्रीडा, राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्राला धक्का, तीन दिग्गजांचा कोरोनामुळे मृत्यू

‘नाशिकच्या दुर्घटनेला सरकारचा निष्काळजीपणा कारणीभूत, आता तरी जागे व्हा’, दरेकरांचा संताप

(chhagan bhujbal wrote cm uddhav thackeray for remdesivir shortage in nashik)

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.