AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, अखेर नितेश राणेंची ती मागणी मान्य

मोठी बातमी समोर येत आहे, सरकारने मोठा निर्णय घेतला आहे, या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून घोषणा करण्यात आली आहे, मंत्री नितेश राणेंच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

मोठी बातमी! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सर्वात मोठी घोषणा, अखेर नितेश राणेंची ती मागणी मान्य
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Oct 24, 2025 | 3:35 PM
Share

राज्य सरकार विविध योजना राबवत आहे, लाडकी बहीण योजना, महिलांना अर्ध्या तिकिटामध्ये एसटी बसने प्रवासाची सुविधा, यासोबत शेतकऱ्यांसाठी देखील अनेक नव्या योजनांची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. यंदा महाराष्ट्राला पावसाचा चांगलाच तडाखा बसला, पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं. ऐन हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतला. शेतातील उभी पिके आडवी झाली, काही ठिकाणी तर पावसाचा एवढा जबरदस्त तडाखा बसला की शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली. या सर्व पार्श्वभूमीवर सरकारे काही दिवसांपूर्वी मोठ्या पॅकेजी घोषणा केली होती.

या पॅकेजअंतर्गत ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे, त्यांना नुकसान भरपाई, तसेच ज्यांचं घर पावसामुळे जमीनदोस्त झालं त्यांना पंतप्रधान आवास योजनेतून नवं घर, ज्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्या शेतकऱ्यांना वेगळी मदत, तसेच ज्यांच्या विहिरी पावसामुळे ढासळल्या त्यांना देखील विशेष मदतीची घोषणा, अशी मदत शासनाकडून जाहीर करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांसाठी सरकारच्या विविध योजना आहे, ज्यामध्ये शेतकऱ्यांच्या कृषीपंपांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जात आहे, यासोबत सैर कृषीपंपांवर देखील मोठं अनुदान सरकारच्या वतीनं देण्यात येत आहे. दरम्यान आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे, त्यांनी आणखी एक मोठी घोषणा केली आहे.  आता शेतकऱ्यांप्रमाणे मच्छीमारांना देखील सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिली जाणार आहे. मंत्री नितेश राणे यांनी यासंदर्भात मागणी केली होती, नितेश राणे यांच्या या मागणीनंतर अखेर मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा निर्णय घेतला आहे.

मस्त्य व्यवसायाला कृषी दर्जा दिल्यामुळे ही वीज सवलत लागू करण्यात आली आहे,  मच्छिमार,  मस्त्य संवर्धक, मस्त्य व्यवसायिक, तसेच मस्त्यकास्तकार यांना ही सवलत लागू असणार आहे. मस्त्य व्यवसाय प्रकल्पांनाही कृषी दराप्रमाणे वीजदर सवलत लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या सवलतीचा लाभ घेण्यासाठी प्रकल्पाची एनएफडीबी अंतर्गत नोंदणी आवश्यक असल्याचं सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे, या सवलतीमुळे मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळणार आहे.

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया.

पेपरफुटी हा गंभीर विषय, याला राजकीय रंग देऊ नये; CJP च्या आंदोलनावर सलमान खानची प्रतिक्रिया

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?.

नागपुरात CJP च्या आंदोलकांची धरपकड, अनेकजण पोलिसांच्या ताब्यात; नेमकं काय घडलं?

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या