आता छत्रपती संभाजीनगर थांबणार नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टॉक शोच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप सांगिता आहे.

आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टॉक शोचं छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना त्यांनी छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप सांगितला. छत्रपती संभाजीनगर हे मराठवाड्यातील प्रमुख शहर मानलं जातं. परंतु वर्षानुवर्ष इथे दुष्काळ आणि रोजगाराचा वणवा आढळतो. आपण मुख्यमंत्री आहात त्यामुळे आज आपण छत्रपती संभाजीनगर आणि मराठवाड्याकडे कसे पहाता. असा प्रश्न या मुलाखतीमध्ये फडणवीस यांना विचारण्यात आला होता, या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी मराठवाड्याच्या विकासाचा रोड मॅप सांगितला.
नेमकं काय म्हणाले फडणवीस?
मुळामध्ये बघा मी विदर्भातून येतो, आणि मराठवाडा व विदर्भातील मागासपणाबद्दल वर्षानुवर्ष लढणाऱ्यांपैकी आम्ही आहोत. 99 पासून महाराष्ट्रातील विधानसभेत जेव्हा महाराष्ट्रातील मागास भागाची लढाई सुरू केली, तेव्हा फक्त विदर्भ नाही तर विदर्भासोबत मी मराठवाड्याचा विषय देखील मांडायचो. म्हणजे जे काही दु:ख आहे, ते विदर्भ आणि मराठवाड्याचं सारखंच आहे, त्यामुळे आम्ही ते दु:ख समजून घेतलं, आणि म्हणूनच मला जेव्हा पहिल्या टर्मला मुख्यमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. ज्यावेळी दिल्ली- मुंबई कॉरिडॉर घोषीत झाला, त्याचं काम सुरू झालं, तेव्हा सगळ्यात जास्त वेगानं डीएमआयसीचं काम आपण महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरात केलं, असं यावेळी बोलताना फडणवीस यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना ते म्हणाले की, ऑरिक सिटी जे आपल्या पंतप्रधानांचं स्वप्न होतं, आपण देशातील पहिली इंटीग्रेटेड इड्रस्टिअल टाउनशिप ही ऑरिक सिटीच्या रुपानं तयार केली. आणि आज एक मॅगनेट म्हणून आपल्याला ही डीएमआयसी आणि हा जो काही छत्रपती संभाजीनगरचा इकोसिस्टिम आहे, ती आपल्याला एखाद्या मॅगनेटसारखी दिसते. ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला, डीएमआयसी केली, मी 2015 मध्ये सांगायचो की महाराष्ट्रातील पुढील डेस्टिनेशन हे पुण्यानंतर छत्रपती संभाजीनगर असणार आहे, त्यावेळी अनेकांना ती अतिशोयोक्ती वाटयाची पण आज ते झालं आहे. ही जी काही विकासाची वाटचाल आहे ती मोठ्या वेगानं पुढे जात आहे. आमची तर टॅगलाईन आहे, आता महाराष्ट्र थांबणार नाही. पण तुम्हाला सांगतो छत्रपती संभाजीनगरही आता थांबणार नाही. मराठवाड्यात अनेक कंपन्या येत आहेत, किर्लोस्करचा प्रोजेक्ट इथे आला, जेएसडब्लूचा प्रोजेक्ट इथे आला. मी इथेल्या उद्योजकांचं देखील अभिनंदन करतो, त्यांच्या संघटांनी अतिशय चांगलं काम केलं आहे, असं यावेळी फडणवीस यांनी म्हटलं.
