फडणवीसांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून बुलडाण्यात राडा; भाजपच्या माजी आमदाराला डोळा सुजेस्तोवर मारहाण

भीमराव गवळी, Tv9 मराठी

|

Updated on: Apr 19, 2021 | 4:12 PM

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करणं भाजप नेत्यांना चांगलंच भोवलं आहे. (clashes between shiv sena and bjp workers in buldana)

फडणवीसांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून बुलडाण्यात राडा; भाजपच्या माजी आमदाराला डोळा सुजेस्तोवर मारहाण
vijayraj shinde

बुलडाणा: शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करणं भाजप नेत्यांना चांगलंच भोवलं आहे. गायकवाड यांचा पुतळा जाळताना शिवसेना आणि भाजप कार्यकर्ते एकमेकांना भिडले. यावेळी झालेल्या मारहाणीत भाजपच्या माजी आमदाराच्या डोळ्याला जबर मार लागला. त्यामुळे त्यांचा डोळा सुजला आहे. या घटनेमुळे बुलडाण्यात तणाव निर्माण झाला आहे. (clashes between shiv sena and bjp workers in buldana)

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर अत्यंत जहरी टीका केली होती. यावेळी गायकवाड यांचा तोल सुटला होता. त्यामुळे भाजप नेते माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी योगेंद्र गोडे, सिद्धार्थ शर्मा यांच्यासह भाजपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी काल 18 एप्रिल रोजी जयस्तंभ चौकात येऊन गायकवाड यांचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी गायकवाड यांचा पुतळा जाण्यास सुरुवात केली. तेव्हा गायकवाड यांचे चिरंजीव कुणाल गायकवाड यांनी त्याला विरोध केला.

जोरदार हाणामारी

कुणाल यांनी भाजप कार्यकर्त्यांना विरोध केल्याने दोन्ही गटात शाब्दिक चकमक उडून प्रकरण हमरीतुमरीवर आलं. ही शाब्दिक चकमक अधिकच वाढली आणि प्रकरण हाणामारीवर आलं. दोन्ही गटांनी एकमेकांच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीत माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या डोळ्याला जबर मार लागल्याने त्यांचा डोळा सुजला. या घटनेची माहिती मिळताच बुलडाणा शहर पोलीस आणि शीघ्र कृती दलाचे जवान तातडीने घटनास्थळी पोहोचले.

गुन्हे दाखल

पोलीस आणि जवानांनी दोन्ही गटाला पांगवून तात्काळ परिस्थितीवर नियंत्रण आणलं. दोन्ही गटातील हाणामारी थांबली असली तरी परिसरातील वातावरण अजूनही तापलेलं आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या दोन्ही गटांवर संचारबंदीचा भंग, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि साथरोग नियंत्रण कायद्याचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (clashes between shiv sena and bjp workers in buldana)

संबंधित बातम्या:

प्रियंका गांधींची देवेंद्र फडणवीसांवर टीका; व्हिडीओ ट्विट करून म्हणाल्या…

केंद्र सरकारविरोधात अफवा पसरवली, नवाब मलिकांविरोधात भातखळकरांची पोलिसांत तक्रार

प्रेमाखातर गर्लफ्रेंड मुंबईहून झारखंडला गेली, प्रियकराकडून भेटताच क्षणी मारहाण, पैसे-दागिनेही हिसकावले

(clashes between shiv sena and bjp workers in buldana)

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI