"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिम प्रभावीपणे राबवा, नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

"माझे कुटुंब माझी जबाबदारी" ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले.

"माझे कुटुंब-माझी जबाबदारी" मोहिम प्रभावीपणे राबवा, नवी मुंबई महापालिका अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आदेश

नवी मुंबई :चेस द व्हायरस” मोहिमेंतर्गत या पुढील काळात प्रत्येकाने अधिक काळजी घेत (CM Uddhav Thackeray At Launch Of 6 COVID-19 Facility) माझ्यामुळे माझे कुटुंब कोरोना बाधित होता कामा नये. याची काळजी घेऊन मास्कचा वापर, सुरक्षित अंतर, नियमित हात धुणे, डोळे नाक आणि तोंडाला हात न लावणे, घरात आल्यानंतर लहानपणीच्या सवयीप्रमाणे हातपाय धुणे आणि कपडे बदलणे अशा साध्या साध्या पण महत्वाच्या गोष्टींची स्वयंशिस्त पाळली पाहिजे. यादृष्टीने “माझे कुटुंब माझी जबाबदारी” ही मोहिम पुढील महिन्याभरात प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिले (CM Uddhav Thackeray At Launch Of 6 COVID-19 Facility).

राज्य शासनामार्फत मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आलेल्या आरोग्याच्या सोयीसुविधा उत्कृष्ट असून तेथील उपचारांबाबत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी सर्व यंत्रणांनी प्रयत्न करावेत असेही मुख्यमंत्री महोदय यांनी स्पष्ट केले.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आयोजित अत्याधुनिक आर.टी.-पी-सी-आर. चाचणी आणि निदान प्रयोगशाळा, 200 आयसीयू बेड्ससह 80 व्हेंटीलेटर्सची सुविधा, 3 ठिकाणी 1003 ऑक्सिजन बेड्सची सुविधा असणारी डेडीकेटेड कोव्हिड हेल्थ सेंटर्स तसेच ऐरोली येथील 302 बेड्सचे कोव्हिड केअर सेंटर अशा 6 सुविधांच्या ऑनलाईन लोकार्पण प्रसंगी मुख्यमंत्री मनोगत व्यक्त करीत होते. याप्रसंगी नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, पोलीस आयुक्त बिपिन कुमार, अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, संजय काकडे आणि इतर उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्यमंत्र्यांनी कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या सूचनेनुसार, राज्य सरकारने 80 टक्के ऑक्सिजन रुग्णालयांकरीता आणि 20 टक्के ऑक्सिजन उद्योगांसाठी देण्याचा निर्णय घेतला. त्याचे वितरण केंद्रीय पध्दतीने होणार असल्याचे सांगितले. आवश्यकतेनुसार बेड्स तसेच प्रयोगशाळाही वाढविण्यात आल्या असून उपचार सुविधा वाढविताना त्यांचा उपयोग ज्यांना आवश्यकता आहे, अशाच रुग्णांकरिता होईल, याकडेही बारकाईने लक्ष देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या (CM Uddhav Thackeray At Launch Of 6 COVID-19 Facility).

नवी मुंबई महानगरपालिकेने चांगल्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. हा समाधान देणारा कार्यक्रम असून ऑक्सिजन बेड उपलब्ध करुन देताना अगदी शौचालयातही ऑक्सिजन उपलब्धतेची काळजी घेत असल्याचे त्यांनी विशेषत्वाने नमूद केले. त्याचप्रमाणे कोरोना बाधिताच्या मानसिकतेचा विचार करुन त्यांच्यासाठी व्हिडीओ कॉलिंगची सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दलही मुख्यमंत्री महोदयांनी कौतुक केले.

एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोव्हिड उपाययोजनांबाबत चांगले काम करीत असल्याचे म्हटलं. 15 लाख लोकसंख्येमध्ये 1.5 लाखाहून अधिक टेस्टिंग केल्याचे नमूद करीत 25 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. हे प्रमाण 86 टक्के इतके चांगले आहे, असे ते म्हणाले. मृत्यू दरातही घट झाली असून तो 2.19 इतका आहे. हे चांगले संकेत असले तरी कोणत्याही प्रकारे गाफील न रहाता रुग्ण शोध वाढवून अधिक दक्षतेने काम केले जाईल असा विश्वास पालकमंत्री महोदयांनी व्यक्त केला.

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई महानगरपालिका कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी ‘मिशन ब्रेक दे चेन’ अंतर्गत टेस्ट, आयसोलेट, ट्रिट या त्रिसूत्रीच्या आधारे करीत असलेल्या विविध उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री महोदयांनी केलेल्या सूचनांनुसार ‘मिशन झिरो’ साठी यापुढील काळात अधिक प्रभावीपणे काम केले जाईल आणि 3.3 वरुन 2.19 पर्यंत खाली आलेला मृत्यू दर आणखी कमी करीत शून्यावर आणण्याकरिता कसोशीने प्रयत्न केले जातील, असे सांगितले.

CM Uddhav Thackeray At Launch Of 6 COVID-19 Facility

संबंधित बातम्या :

राज्यातील कोरोना चाचणीच्या दरात कपात, नवी किंमत किती?

महाड दुर्घटनेतील बांधकाम व्यावसायिकाच्या पनवेलमधील आणखी 2 इमारती अतिधोकादायक

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *