AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र, कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणी

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठवणूक क्षमतेबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना पत्र, कांदा व्यापाऱ्यांची साठवणूक क्षमता वाढवण्याची मागणी
| Updated on: Oct 31, 2020 | 11:51 AM
Share

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना कांदा खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांच्या साठवणूक क्षमतेबाबत मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. (Cm Uddhav Thackeray Wrote a Letter To Union Minister Piyush Goyal Over onion trader issue) कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांसाठी कांदा साठवणूक मर्यादा ही 25 मेट्रिक टनावरून 1500 मेट्रिक टन इतकी करण्यात यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने 29 ऑक्टोबर 2020 च्या सुचनेप्रमाणे एपीएमसीतील कांदा खरेदीच्या दिनांकापासून पॅकेजिंगसाठी 3 दिवसांचा कालावधी दिला आहे. हा कालावधीही खुप कमी असून तो सात दिवसांचा करण्यात यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांनी पत्राद्वारे केली आहे.

केंद्र शासनाने 23ऑक्टोबर 2020 रोजी जीवनावश्यक वस्तु कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून घाऊक कांदा व्यापाऱ्यांसाठी 25 मे. टन तर किरकोळ कांदा व्यापाऱ्यांसाठी फक्त 2 मे. टनापर्यंत साठवणुकीचे निर्बंध घातले आहेत.  त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि कांदा व्यापारी दोघांनाही अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.

कांद्याचं 100 लाख मे. टन महाराष्ट्रात उत्पादन रब्बी कांदा उत्पादनात महाराष्ट्र देशातील अग्रगण्य राज्य असून एकूण उत्पादनाच्या 1/3 उत्पादन एकट्या महाराष्ट्रात होते. देशाच्या एकूण कांदा निर्यातीमध्ये ही महाराष्ट्राचा हिस्सा 80 टक्के असल्याचे मुख्यमंत्र्यांनी पत्रात नमूद केले आहे. यासंबंधी अधिक माहिती देतांना मुख्यमंत्र्यांनी मागील हंगामात रब्बी हंगामातील कांदा उत्पादनाचे क्षेत्र वाढले असून अंदाजे 100 लाख मे. टन कांद्याचे उत्पादन झाल्याची माहिती दिली आहे.

अतिवृष्टीने कांद्याचे नुकसान मागील काही वर्षात सप्टेंबर आणि ऑक्टोबर या महिन्यात कांद्याला चांगला भाव मिळाला आहे. असे असले तरी मागील रब्बी हंगामाच्या साठवलेल्या कांद्याचे ढगाळ वातावरणामुळे नुकसान झाले आहे.  प्रतिकूल हवामानामुळे खरीपाचा नवा कांदा येण्यास उशीर झाला आहे. यावर्षी महाराष्ट्र, कर्नाटक, आंधप्रदेश, मध्यप्रदेश अशा कांदा उत्पादक राज्यांमध्ये अतिवृष्टीने शेतातील उभ्या कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे सप्टेंबर आणि ऑक्टोबर २०२० मध्ये कांद्याचे भाव वाढलेले दिसून येत आहेत.

पुरवठा साखळीवर परिणाम केंद्र शासनाने जीवनावश्यक वस्तु कायद्यातील नियंत्रण आदेशात सुधारणा करून कांदा साठवणुकीची मर्यादा घाऊक व्यापाऱ्यांकरता 25 मे. टन एवढी कमी केल्याने एपीएमसीमधील कांदा व्यापारी जे शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी करत होते त्यांच्यावर त्याचा परिणाम झाला. त्यांच्याकडून कांदा साठवणुकीची ही मर्यादा 1500 मे. टनापर्यंत वाढवून देण्याची मागणी सातत्याने होत आहे. 23 ऑक्टोबर 2020 च्या नोटिफिकेशनद्वारे कांद्याच्या आयातीला स्टॉक मर्यादेतून सूट देण्यात आली आहे. त्याचधर्तीवर एपीएमसीमध्ये थेट शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी करणाऱ्या कांदा व्यापाऱ्यांची कांदा साठवणूक मर्यादा 1500 मे. टनापर्यंत वाढवावी अशी मागणी कांदा व्यापाऱ्यांकडून होत आहे.

(Cm Uddhav Thackeray Wrote a Letter To Union Minister Piyush Goyal Over onion trader issue)

संबंधित बातम्या

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर कोंडी फुटली; राज्यात उद्यापासून कांदा लिलाव सुरु होणार

‘कांदा उत्पादक शेतकऱ्यांची मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, सकारात्मक चर्चा, उद्धव ठाकरे उद्या केंद्र सरकारशी बोलणार’

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.