AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘ना भाजप ना राष्ट्रवादी आम्ही फक्त खडसे परिवाराचे’ विजयी उमेदवारांच्या निर्णयामुळे संभ्रम

आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनीविजयी उमेदवारांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे.

'ना भाजप ना राष्ट्रवादी आम्ही फक्त खडसे परिवाराचे' विजयी उमेदवारांच्या निर्णयामुळे संभ्रम
| Edited By: | Updated on: Jan 19, 2021 | 6:48 AM
Share

जळगाव : मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालामुळे मोठं संभ्रमाचं वातावरण तयार झालं आहे. ग्रामपंचायत एकूण अकरा जागांची होती. यामध्ये दोन जागा बिनविरोध होत्ता. त्यामुळे नऊपैकी 5 याठिकाणी शिवसेनेनं विजय मिळवला तर सहा उमेदवार आम्ही ना राष्ट्रवादीचे ना भाजपचे आम्ही खडसे परिवाराचे असल्याचं त्यांनी म्हटल्यानं याठिकाणी संभ्रमाचं वातावरण आहे. (Confusion in jalgaon due to decision of winning candidates Neither BJP nor NCP we are just Khadse family)

ग्रामपंचायत निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी म्हणजेच सोमवारी खासदार रक्षा खडसे यांनी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये आमचा विजय झाल्याचं म्हटलं होतं. एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी यांनी विजयी झालेले उमेदवार नाथा भाऊंना मानणारे असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे आता विजय उमेदवारच म्हणतात आम्ही खडसे परिवाराचे त्यात खासदार रक्षा खडसे यांनीही आमचा विजय झाल्याचं म्हटलं, त्यामुळे या ग्रामपंचायतीमध्ये मोठा संभ्रम उडाल्याचं पाहायला मिळतं.

अशात सरपंचाचे आरक्षण जाहीर नसल्यामुळे गावचा सरपंच झाल्यावरच गावाचा ताबा कोणाचा याबद्दल माहिती मिळणार आहे. खरंतर, अनेक जागांवर अशा प्रकारे चित्र आहे. खडसे राष्ट्रवादी गेले पण त्यांची सून भाजपात आहे. त्यामुळे समर्थकांध्येही मोठा गोंधळ उडाला आहे. अशात आता पुढे काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं आहे.

खरंतर, मुक्ताईनगर तालुक्यातील सर्वात महत्त्वाची ग्रामपंचायत असलेल्या कोथळी ग्रामपंचायतीच्या निकालावेळी खडसे कुटुंबात गृहयुद्ध पाहायला मिळत आहे. कारण कोथळी ग्रामपंचायत भाजपच्या ताब्यात आल्याचा दावा भाजप खासदार आणि एकनाथ खडसेंच्या स्नुषा रक्षा खडसे यांनी केला आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्याकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत. राज्यभरातील जवळपास 14 हजार ग्राम पंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत.

सासरेबुआ vs सूनबाई

कोथळी ग्रामपंचायतीत 11 जागांपैकी 2 जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरित 9 पैकी 6 जागांवर भाजप पुरस्कृत पॅनलचे उमेदवार विजयी झाले आहेत. मागील वेळी कोथळी ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे सरपंच होते, मात्र आता भाजपचा सरपंच होणार आहे. त्यामुळे सत्तेच्या चाव्या शिवसेनेकडून भाजपकडे गेल्या आहेत. सत्तांतरामुळे सूनबाईंनी सासरेबुवांना धक्का दिल्याची चर्चा रंगली आहे. तर शिवसेना-राष्ट्रवादी यांच्याकडूनही विजयाचे दावे केले जात आहेत.

“राजकीय बदलामुळे मोठी जबाबदारी”

“या निवडणुकीत झालेल्या राजकीय बदलामुळे मोठी जबाबदारी माझ्यावर होती. पहिल्यांदा मी बारकाईने या निवडणुकीत लक्ष घातले असून त्यात मला यश मिळाले आहे” अशी प्रतिक्रिया भाजप खासदार रक्षा खडसे यांनी दिली.

कोथळी ग्रामपंचायीतवर भाजपचा झेंडा, भाजपचे कोणते 6 उमेदवार विजयी?

उमेश राणे, अनुराधा योगेश चौधरी, नारायण चौधरी, मीराबाई शामराव पाटील, वंदना विजय चौधरी, राखी गणेश राणे (Confusion in jalgaon due to decision of winning candidates Neither BJP nor NCP we are just Khadse family)

संबंधित बातम्या – 

Jalgaon Gram Panchayat Election Results 2021 | जळगाव ग्रामपंचायतीत जोरदार लढत, जेलमध्ये असलेला उमेदवार विजयी

महाराष्ट्र ग्रामपंचायत निकाल 2021 : जळगावात महाविकास आघाडीच्या ताकदीसमोर भाजप निष्प्रभ

सोलापुरात सर्वात तरुण ग्रामपंचायत सदस्य, ऋतुराजची अवघ्या 21 वर्षात ग्रामपंचायतीत एन्ट्री

(Confusion in jalgaon due to decision of winning candidates Neither BJP nor NCP we are just Khadse family)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.