चंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक

चंद्रपुरात खंडणीविरोधात मोठी कारवाई, काँग्रेस नेत्याला अटक
अशोक मत्ते

मत्ते यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Congress leader Ashok Matte Arrest against ransom in Chandrapur)

Namrata Patil

|

Jan 26, 2021 | 4:00 PM

चंद्रपूर : चंद्रपुरात पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वात खंडणीविरोधी मोठी कारवाई करण्यात आली आहे. यात काँग्रेस पक्षातील मोठे नाव असलेल्या एका आरटीओ दलालाला अटक करण्यात आली आहे. अशोक मत्ते असे या नेत्याचे नाव असून तो व्यवसायाने दलाल आहे. मत्ते यांच्या अटकेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. (Congress leader Ashok Matte Arrest against ransom in Chandrapur)

चंद्रपूरच्या उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयातील मोटार वाहन निरीक्षकाला अशोक मत्ते त्रास द्यायचा. मत्ते हा मोठे नेते-पत्रकार यांच्या नावाने फोन करत वाहन निरीक्षकाकडूनन सातत्याने मोठ्या रक्कमेची मागणी करायचा. त्याच्या या मागण्यांना अधिकारी कंटाळले होते.

हेही वाचा – जनावरांच्या चाऱ्यातून दारूची तस्करी, चंद्रपूरमध्ये 37 लाख रुपयांचा माल जप्त

यानंतर काही दिवसांपूर्वी एका खंडणीप्रकरणी त्याची अज्ञात व्यक्तीने तक्रार केली. या तक्रारीनंतर अखेर 40 हजारांच्या खंडणीप्रकरणी मत्ते यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी विशेष पथक नेमून ही कारवाई केली. काँग्रेस नेता-सत्तेच्या अगदी जवळ असलेल्या मत्ते यांच्या अटकेने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून पुराव्यानुसार पुढील कारवाई केली जात आहे.

दरम्यान अशोक मत्ते हा काँग्रेसमधील अनेक नेत्यांच्या जवळचा असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे त्याच्या अटकेनंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.  (Congress leader Ashok Matte Arrest against ransom in Chandrapur)

संबंधित बातम्या : 

नवरदेवाची वरात, वधूच्या दारात, घराला कुलूप लावून वधू पळाली जोरात

एनसीबीची मोठी कारवाई, मुंबईतील ड्रग माफिया ‘मिनी दाऊद’ला अटक


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें