काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, राऊतांना अर्वाच्य बोलताना लाज वाटायला हवी, आमदार फरांदे कडाडल्या

नाशिकमध्ये आज रविवारी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा जिल्हा काँग्रेसने दिला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच कार्यकर्त्यांना रोखले. काँग्रेसच्या या आंदोलनाचा आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार समाचार घेतला.

काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, राऊतांना अर्वाच्य बोलताना लाज वाटायला हवी, आमदार फरांदे कडाडल्या
देवयानी फरांदे, आमदार.
Follow us
| Updated on: Feb 20, 2022 | 3:50 PM

नाशिकः एकीकडे राज्यात भाजप (BJP) विरुद्ध शिवसेना अशी धुमचक्री रंगलेली पाहायला मिळतेय. दुसरीकडे काँग्रेसने आज नाशिकमध्ये केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्याघरावर मोर्चा नेत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्त्यांना पोलिसांनी रस्त्यातच रोखले. या साऱ्यावरून आता भाजपच्या आमदार देवयानी फरांदे (Devyani Farande) आक्रमक झाल्यात. त्यांनी काँग्रेसने महाराष्ट्राची माफी मागावी, अशी मागणी केलीय. तर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना अर्वाच्य भाषेत बोलताना लाज वाटायला हवी होती, असा टोलाही हाणलाय. येणाऱ्या काळात नाशिक महापालिकेची निवडणूक होतेय. त्या पार्श्वभूमीवर भाजप आक्रमक झालेला दिसतोय.

नेमके प्रकरण काय?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटले की, कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान देश लॉकडाऊनचे पालन करत होता. मात्र काँग्रेसवाले परिस्थिती बिघडण्याची वाट पहात होते. जागतिक आरोग्य संघटना सांगत होती की, लोकांनी आहे तिथेच थांबावे. परंतु काँग्रेसने तेव्हा महाराष्ट्रातील परराज्यातील लोकांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी मोफत तिकिटे वाटली जात होती. हे खूप मोठे पाप होते, असा गंभीर आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. या वक्तव्याविरोधात काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय. महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संपूर्ण राज्यभरात ‘मोदी माफी मागो’ या मागणीसाठी आंदोलन करण्यात येईल, असा इशारा दिलाय. त्यानंतर मुंबई, पुणे, औरंगाबादसह इतर ठिकाणीही अशी आंदोलने झाली. आज रविवारी केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवार यांच्या घरासमोर आंदोलन करण्याचा नाशिक जिल्हा काँग्रेसने दिला होता. मात्र, पोलिसांनी वाटेतच कार्यकर्त्यांना रोखले. काँग्रेसच्या या आंदोलनाचा आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार समाचार घेतला.

काय म्हणाल्या फरांदे?

काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या धोरणावर भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी जोरदार टीका केली. आमदार फरांदे म्हणाल्या की,देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात आहेत. महाराष्ट्र सरकार यावर नियंत्रण मिळवू शकले नाही. महाविकास आघाडी पूर्णतः अपयशी ठरलीय. त्यामुळे नरेंद्र मोदींनी नाही, तर काँग्रेसनेच महाराष्ट्राचा माफी मागावी, अशी मागणी त्यांनी केली. शिवाय भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर संजय राऊतांनी आज टीका केली. यावर त्या म्हणाल्या की, संजय राऊत यांनी जी अर्वाच्य भाषा वापरली, असे बोलताना त्यांना लाज वाटायला पाहिजे होती, अशी टीकाही त्यांनी केली.

इतर बातम्याः

पब्लिक सब जानती है, कोणावर कशी कारवाई होते, काही लोक भाजपमध्ये का गेले?; भुजबळांचा राणेंना टोला

‘राष्ट्रवादी’कडून इच्छुकांची चाचपणी; नाशिकमध्ये महापालिका निवडणुकीचे पडघम जोरात

शिवजयंतीच्या मुहूर्तावर केबल कार्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीचे उद्घाटन; नाशिकमधून परदेशात होणार निर्यात

Non Stop LIVE Update
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं
मंत्र्याच्या सचिवाच्या नोकराकडे गडगंज रक्कम; ईडीची धाड अन् पितळ उघडं.
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक
मला इंग्रजी येत नाही... धंगेकरांचा साधेपणा अन् थरूर यांच्याकडून कौतुक.
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार
महायुतीच्या 'त्या' जाहिरातीवर काँग्रेसचा आक्षेप, थेट आयोगाकडे तक्रार.
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?
नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात, उद्धव ठाकरेंवर केला हल्लाबोल?.
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल
पंकजा मुंडेंच्या शब्दानंतर अपक्षाची माघार? बीडमध्ये 'ती' क्लिप व्हायरल.
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?
बारामतीकरांचा कौल देणार? अजित पवार की शरद पवार? कोण मारणार मैदान?.
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.