Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात दिवसभरात 28 हजार 699 नवे बाधित, दिवसभरात 132 जणांचा मृत्यू

| Updated on: Mar 24, 2021 | 1:38 AM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Corona Cases and Lockdown News LIVE : राज्यात दिवसभरात 28 हजार 699 नवे बाधित, दिवसभरात 132 जणांचा मृत्यू
corona viएकूणच दम्याची औषधं कोरोनाची लक्षणं कमी करण्यास मदत करत असल्याने दम्याच्या रुग्णांना कोरोना संसर्गाचा धोका इतरांपेक्षा कमी असल्याचं मत तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.rus

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यात आज दिवसभरात तब्बल 28 हजार 699 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 132 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय.| Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 23 Mar 2021 08:49 PM (IST)

    नांदेडमध्ये दिवसभरात तब्बल 1330 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

    नांदेड : गेल्या 24 तासात 1330 नवीन रुग्ण, एकूण तपासणी 5473 त्यापैकी 1330 पॉझिटिव्ह, तर 24 तासात 10 जणांचा मृत्यू,

    एकूण पॉझिटिव्ह – 34337

    बरे झाले – 26293

    एकूण मृत्यू – 668

    सध्या ऍक्टिव्ह – 7144, गंभीर – 59

    19 मार्च – 697 20 मार्च – 947 21 मार्च – 927 22 मार्च – 1291 23 मार्च – 1330

  • 23 Mar 2021 08:45 PM (IST)

    पिंपरी चिंचवडमध्ये दिवसभरात तब्बल 1519 नवे कोरोनाबाधित

    पिंपरी चिंचवड कोरोना अपडेट :

    आज – कोरोना रुग्ण -1519 कोरोनामुक्त -812 मृत्यू -13

    आत्तापर्यंत – कोरोना रुग्ण -125071 कोरोनामुक्त -111216 मृत्यू -1933

  • 23 Mar 2021 08:45 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 3098 रुग्णांची वाढ

    Pune Corona Update :

    - पुण्यात दिवसभरात ३०९८ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १६९८ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ३१ रुग्णांचा मृत्यू. ९ रूग्ण पुण्याबाहेरील. - ५५५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या २४०८३४. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २४४४०. - एकूण मृत्यू -५०९०. -आजपर्यंतच एकूण डिस्चार्ज २११३०४. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११३१०.

  • 23 Mar 2021 08:43 PM (IST)

    ठाणे शहरात दिवसभरात 775 जणांना कोरोनाची लागण

    ठाणे महानगरपालिका कोरोना अपडेट:

    # आज 775 जणांना कोरोनाची बाधा, आजपर्यंत कोरोना संसर्ग झालेले एकूण संख्या 70,217 इतकी आहे # आज पर्यंत कोरोना संसर्गावर मात करून पूर्णपणे बरे झालेले 60,827 इतके रुग्ण आहेत ( बरं होण्याचं प्रमाण 91% इतकं आहे ) # 5,018 रुग्णांवर सध्या कोरोनाचे उपचार सुरु आहेत # 332 रुग्ण कोरोनातून बरे झाले त्याना रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज # आज 1 रुग्णांचा कोरोनामुळे झाला मृत्यू तर आतापर्यंत 1,372 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे

  • 23 Mar 2021 08:42 PM (IST)

    सांगलीत दिवसभरात 143 नवे कोरोनाबाधित, जिल्ह्यात दिवसभरात एका रुग्णाचा दुर्दैवी मृत्यू

    सांगली जिल्ह्यात आज दिवसभरात 143 कोरोना रुग्ण, जिल्ह्यात आज कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू, जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1766 वर, सक्रीय कोरोना रुग्णसंख्या 1100 वर, तर उपचार घेणारे 45 जण आज कोरोनामुक्त, आजपर्यंत बरे झालेल्या रुगणांची संख्या 47123 वर, तर जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 49999 वर

  • 23 Mar 2021 08:37 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 28 हजार 699 नवे बाधित, दिवसभरात 132 जणांचा मृत्यू

    राज्यात आज 28699 जणांना कोरोनाची बाधा, दिवसभरात 13165 जणांना डिस्चार्ज, आज राज्यात 132 जणांचा मृत्यू, राज्यातील बरे होण्याचे प्रमाण 88.73 टक्के, मृत्यूदर 2.12 टक्के

  • 23 Mar 2021 08:35 PM (IST)

    सांगलीत दिवसभरात 143 कोरोना रुग्ण, मृतांचा आकडा 1766 वर

    सांगली : जिल्ह्यात आज दिवसभरात 143 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 1 रुग्णाचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 1766 वर

    सध्या 1100  सक्रिय कोरोना रुग्णांवर उपचार

    आज दिवसभरात 45 जण कोरोनामुक्त

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची संख्या 49999 वर

  • 23 Mar 2021 08:16 PM (IST)

    नादेडमध्ये कोरोनाचे 1330 नवे रुग्ण, 10 जणांचा मृत्यू

    नांदेड : गेल्या 24 तासांत 1330 नवे रुग्ण

    5473 संशयितांपैकी 1330  जण कोरोना पॉझिटिव्ह

    दिवसभरात नांदेडमध्ये 10 जणांचा मृत्यू

    नांदेडमध्ये कोरोनाग्रस्तांचा आकडा 34337 वर

    नांदेडमध्ये आतापर्यंत  26293 जण कोरोनामुक्त

    नांदेडमध्ये आतापर्यंत 668 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  • 23 Mar 2021 06:53 PM (IST)

    येवाला तालुक्यात कोरोनाचे 50 नवे रुग्ण, 201 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु 

    येवला :  येवाला तालुक्यात कोरोनाचे 50 नवे रुग्ण

    आतापर्यंत 54 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    येवल्यातील कोरोनाबाधितांची संख्या पोहोचली 1684 वर

    कोरोनावर 1350 जणांची कोरोनावर मात

    सध्या 201 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु

  • 23 Mar 2021 06:50 PM (IST)

    पुण्यात लॉकडाऊन करणं योग्य नाही, पुण्यात महापौरांचा लॉकडाऊनला विरोध

    पुण्यात महापौरांचा लॉकडाऊनला विरोध

    पुण्यात लॉकडाऊन करणं योग्य नाही. त्याऐवजी निर्बंध कडक करता येतील. पुण्यातील परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहपौरांची भूमिका

    आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचे संकेत दिल्यावर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली भूमिका स्पष्ट

  • 23 Mar 2021 03:54 PM (IST)

    ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना

    पुणे : ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

    ऑक्सिजन उत्पादक आणि  पुरवठादारांसोबत जिल्ह्यधिकाऱ्यांनी घेतली बैठक

    सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक

  • 23 Mar 2021 03:18 PM (IST)

    45 वर्षांवरील प्रत्येकाला कोरोनाची लस, केंद्रीय कॅबिनेटची घोषणा

    येत्या एक एप्रिलपासून 45 वर्ष वयोगटावरील प्रत्येकाला कोरोनाची लस मिळणार. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांची घोषणा

  • 23 Mar 2021 03:03 PM (IST)

    पुण्यात ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्यासोबतच पुरवठा सुरळीत ठेवा, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    पुणे

    ऑक्सिजनची निर्मिती पूर्ण क्षमतेने करण्याबरोबरच पुरवठा सुरळीत ठेवा

    जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या सूचना

    ऑक्सिजन उत्पादक व पुरवठादारांसोबत जिल्ह्यधिकाऱ्यांनी घेतली बैठक

    सद्यस्थितीत पुणे जिल्ह्यात 135 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी असून उत्पादकांकडे 790 मेट्रिक टन ऑक्सिजन साठा शिल्लक

  • 23 Mar 2021 02:52 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड उपमहापौर निवडणुकीनंतर महापालिका कक्षात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

    पिंपरी चिंचवड -

    - उपमहापौर निवडणुकीनंतर महापालिका कक्षात सोशल डिस्टनसिंगचा फज्जा

    - महापालिकेत तिसऱ्या मजल्यावर गर्दीच गर्दीच

    - सर्वसामान्यांना नियम सांगणाऱ्या राजकारण्यांना नियम नाहीत का असा सवाल उपस्तिथ

    - महापालिका मुख्यालयातच मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याने आयुक्तांच्या नियमांची पायमल्ली

    - संबधीतावर काय कारवाई होणार हा प्रश्न

  • 23 Mar 2021 10:10 AM (IST)

    पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव, पाच कर्मचाऱ्यांना लागण

    - पुणे महापालिकेत कोरोनाचा शिरकाव,

    - महापालिकेच्या पाच कर्मचाऱ्यांना झाली कोरोनाची बाधा !

    - महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याला झाली दुसऱ्यांदा कोरोनाची बाधा

    - कोरोना सर्वेक्षण करत असताना झाला संसर्ग,

    - आतापर्यंत एका वर्षात पालिकेचे 669 कर्मचारी झाले होते बाधित.....

  • 23 Mar 2021 09:59 AM (IST)

    पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमधील नॉन कोव्हीड बेड कोव्हीडसाठी देण्यास हॉस्पिटलचा नकार

    पुणे : पुण्यातील खाजगी हॉस्पिटलमधील नॉन कोव्हीड बेड कोव्हीडसाठी देण्यास हॉस्पिटल चालकांचा नकार,

    - मात्र 50 टक्के बेड शहरातील हॉस्पिटल्सना राखीव ठेवण्याचे पालिकेचे आदेश,

    - सोमवारी महापालिकेनं खाजगी हॉस्पिटल चालकांसोबत घेतलेल्या बैठकीत दिला नकार,

    - मात्र दोन दिवसात बेडची व्यवस्था करा अन्यथा सक्तीने ताब्यात घेऊ महापालिकेनं दिली तंबी,

    - 50 टक्के बेड दिले नाहीत तर 80 टक्के बेड राखीव ठेवण्याचे धोरण आखावं लागेल महापालिकेचा इशारा,

    - शहरातील शासकीय हॉस्पिटलमधील बेड फुल्ल झाल्यानं महापालिका ऍक्शन मोडवर !

    - दोन दिवसात शहरातील खाजगी हॉस्पिटलमधील 50 टक्के बेड घेणार ताब्यात

    - महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांची माहिती....

  • 23 Mar 2021 09:15 AM (IST)

    नागपूरच्या आमदार निवासात पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू

    नागपूर -

    नागपूरच्या आमदार निवासात अखेर पुन्हा कोविड केअर सेंटर सुरू

    350 खाटाची सोय, B आणि C विंग मध्ये सेंटर सुरू करण्यात आले

    सुरवातीच्या काळात या ठिकाणी कोविड केअर सेंटर,

    मात्र रुग्ण संख्या कमी होताच करण्यात आलं होतं बंद

    आता पुन्हा गरज वाढल्याने करण्यात आलं सुरू

  • 23 Mar 2021 09:12 AM (IST)

    उस्मानाबादेत सध्या 999 अॅक्टिव्ह रुग्ण

    उस्मानाबाद -

    कोरोना रुग्णाची संख्या वाढत असल्याने उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात 200 ऑक्सिजन सपोर्ट बेडचे काम हाती, रुग्णाची होणार सोय, जिल्ह्यात सध्या 999 ऍक्टिव्ह रुग्ण तर काल सापडले सर्वाधिक 173 रुग्ण

  • 23 Mar 2021 08:49 AM (IST)

    नागपुरात कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू, प्रशासनाची चिंता वाढली

    नागपूर ब्रेकिंग -

    नागपुरात काल कोरोनामुळे 40 जणांचा मृत्यू , तर 3595 नवीन रुग्णांची भर

    मृत्य संख्या वाढल्याने प्रशासनाची वाढली मोठी चिंता

    दुसऱ्या लाटे तील हा मृत्यूचा उच्चांक

    गेल्या सहा दिवसात वाढत आहे रुग्ण संख्या आणि मृत्यू सुद्धा

    गेल्या तीन दिवसात 101 जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला

    मृत्यूच प्रमाण थांबविण्याच प्रशासन समोर मोठं आवाहन

  • 23 Mar 2021 08:01 AM (IST)

    सोलापुरात 31 मार्चपर्यंत शहरातील जनावरे, आठवडी बाजार बंद

    सोलापूर - 31 मार्च परिसरातील शहरातील जनावरे ,आठवडा बाजार बंद

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संसर्ग वाढू नये,त्यासाठी होणारी गर्दी टाळण्यासाठी आठवडे बाजार बंद ठेवण्याचा आदेश

    पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांनी काढले आदेश

  • 23 Mar 2021 07:59 AM (IST)

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर, 2779 नवीन कोरोना रुग्णांची भर

    नाशिक जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच गेल्या 24 तासात 2779 नव्या कोरोना रुग्णांची भर

    ग्रामीण भागात देखील कोरोना रुग संख्येत लक्षणीय वाढ 1101 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    शहरात सर्वाधिक 1544 तर मालेगाव मध्ये 103 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

    कडक निर्बंध लागू करून देखील दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली

  • 23 Mar 2021 06:59 AM (IST)

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1 हजार 219 जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

    नांदेडमध्ये गेल्या 24 तासांत 1 हजार 219 जणांचा कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. तर 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहेत. नांदेड जिल्ह्यात सध्या 6 हजार 264 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. त्यातील 59 रुग्ण गंभीर आहेत.

  • 23 Mar 2021 06:57 AM (IST)

    नागपुरात 24 तासात 3 हजार 595 नव्या रुग्णांची वाढ

    नागपुरात 24 तासात 3 हजार 595 नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 40 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. नागपुरात आज दिवसभरात 1 हजार 837 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. आज आढळून आलेल्या नव्या रुग्णांसह नागपुरातील एकूण रुग्णसंख्या 19 लाख 6 हजार 676 वर जाऊन पोहोचली आहे. त्यापैकी 16 लाख 945 रुग्ण पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहेत. नागपुरातील एकूण 4 हजार 664 जणांचा कोरोनांमुळे मृत्यू झाला आहे.

  • 23 Mar 2021 06:39 AM (IST)

    मुंबईत 24 तासात 3 हजार 260 नव्या कोरोना रुग्णांची वाढ

    मुंबईत 24 तासात 3 हजार 260 नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. तर दिवसभरात 1 हजार 223 रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईत दिवसभरात 10 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. मृत रुग्णांपैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 6 पुरुष आणि 4 महिला रुग्णाचा समावेश होता.

  • 23 Mar 2021 06:38 AM (IST)

    राज्यात 24 तासात 24 हजार 645 रुग्ण

    राज्यात 24 तासात 24 हजार 645 रुग्ण, नवीन 19463 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 22 लाख 34 हजार 330 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत.राज्यात एकूण 2 लाख 15 हजार 241 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत, राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.22 % झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागानं ही माहिती दिली आहे. दिवसभरात 58 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published On - Mar 23,2021 8:53 PM

Follow us
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.