Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर

| Updated on: Jun 24, 2021 | 11:06 PM

आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर
corona virus

महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळाली. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसला. मात्र आता कोरोनाची दुसरी लाट ओसरते आहे. राज्यातीलच नाही तर देशभरातील रुग्णांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. तसेच, रोजचे नवे रुग्णही कमी झाले आहेत. त्यामुळे राज्यातील कडक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. देशात मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहिम राबवण्यात येत आहे. तसेच, काहीच आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने त्यासाठीची तयारीही सुरु करण्यात आली आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 24 Jun 2021 10:32 PM (IST)

    कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही, ICMR च्या संशोधनात माहिती समोर

    कोरोनामुक्तांना दुसऱ्या डोसची गरज नाही. ICMR च्या संशोधनात माहिती समोर, कोरोनामुक्तांमध्ये अँटिबॉडीज तयार होतात. 18 ते 75 वयोगटातील 135 नागरिकांचा अँटिबॉडीज टेस्टचा अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

  • 24 Jun 2021 09:39 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 197 जणांचा मृत्यू

    राज्यात आज दिवसभरात 9 हजार 844 नवे कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर 9 हजार 371 रुग्णांची कोरोनावर मात, तर 197 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला

  • 24 Jun 2021 08:30 PM (IST)

    रायगड जिल्ह्यात दिवसभरात 695 नवे कोरोनाबाधित, 11 जणांचा मृत्यू

    रायगड :

    जिल्ह्यात आज कोरोनाचे 695 नवीन रुग्ण.

    अलिबाग तालुक्यात सर्वाधिक 128 रुग्ण.

    दिवसभरात बरे झालेले रुग्ण 470.

    दिवसभरात मृत रुगणांची संख्या - 11.

    आज अखेर सक्रिय रुग्णसंख्या - 5 हजार 885.

    आतापर्यंत बरे झालेले रुग्ण - 1 लाख 34 हजार 980.

    आतापर्यंत मृत रुग्ण - 3 हजार 510.

    आतापर्यंतचे एकूण रुग्ण - 1 लाख 44 हजार 375.

  • 24 Jun 2021 07:07 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात 333 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 13 जणांचा मृत्यू

    पुणे : दिवसभरात ३३३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात १८७ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत १३ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०८. - ३२३ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६८२६. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २५१६. - एकूण मृत्यू -८५५४. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५७५६. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५६९६

  • 24 Jun 2021 07:06 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात दिवसभरात 10 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    अकोला कोरोना अपडेट :

    अकोल्यात आज दिवसभरात 10 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात दोघांचा मृत्यू झाला आहे

    आतापर्यंत 1124 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 55962 जणांनी कोरोनावर मात केली आहे

    तर सध्या 423 रुग्ण उपचार घेत आहेत

    तर दिवसभरात 75 जण कोरोनामुक्त झाले आहेत

  • 24 Jun 2021 07:03 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    वाशिम कोरोना अपडेट :

    जिल्ह्यात गेल्या चार महिन्यात एका दिवशी आढळलेला सर्वात कमी नव्या कोरोना रुग्णांचा आकडा

    जिल्ह्यात दिवसभरात फक्त 7 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    तर आज 24 जणांना देण्यात आला डिस्चार्ज, तसेच एकही मृत्यू नाही

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 41315

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 284

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 40415

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 615

  • 24 Jun 2021 07:00 PM (IST)

    सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश झुगारुन बैलगाडा शर्यतीचे आयोजन

    सोलापूर :

    सोलापुरात जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन

    गावकऱ्यांनी आयोजित केली बैलगाडा शर्यत

    कारणहुणवीच्या सणाच्या निमित्ताने काढली बैलांची मिरवणूक

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागात आजही आहेत कडक निर्बंध

    कारणहुणवी सणाच्या पार्श्वभूमीवर मिरवणूकवरी घालण्यात आली आहे बंदी

    नियमांची पायमल्ली करत कारणहुणवी सण केला साजरा

    अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील प्रकार

  • 24 Jun 2021 04:58 PM (IST)

    राज्यात दरदिवशी 3 हजार मे.टन ऑक्सिजन निर्मितीचे उद्दिष्ट, मुख्यमंत्र्यांचे ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांना आवाहन

    राज्यात आज दरदिवशी 1300 मे.टन ऑक्सिजन निर्मिती होत असून ही निर्मिती 3 हजार मे.टनापर्यंत वाढवण्याच्या उदेशाने शासनाने “ऑक्सिजन स्वावलंबन योजना” हाती घेतली आहे. याअंतर्गत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या उद्योगांना अनेक प्रोत्साहने देण्यात आली आहेत. याचा लाभ घेत ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या कंपन्यांनी तातडीच्या उपाययोजना करत राज्यातील त्यांची ऑक्सिजन निर्मिती तसेच साठवणूक क्षमता येत्या तीन ते चार आठवड्यात वाढवावी जेणेकरून  कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेत लागणारी ऑक्सिजनची अंदाजित गरज आपण भागवू शकू असे  प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. तसेच याक्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांना शासन पूर्ण सहकार्य करील, अशी ग्वाही ही त्यांनी यावेळी दिली

  • 24 Jun 2021 04:55 PM (IST)

    निलेश लंके यांच्या कोरोना काळातील कामाची सातासमुद्रापार दखल, 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन' पुरस्काराने सन्मानित

    अहमदनगरच्या पारनेर तालुक्याचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांच्या कोरोना काळात केलेल्या कार्याची दखल घेत ''वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डस लंडन'' या राष्ट्रीय पुरस्कारने त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. कोरोना काळात आदर्श काम केल्यामुळे आमदार निलेश लंकेंचा डंका सातासमुद्रापार पोहोचला आहे. हा पुरस्कार प्रदान सोहळा आज मुंबई येथे पार पडला. लंके यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अकराशे बेडच कोविड सेंटर उभारलं होत. या सेंटरची चर्चा देशभरात झाली होती. तर कोविड सेंटरमध्ये जवळपास 7 हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन घरी परतले. तसेच  त्यांच्या कार्याची दखल घेत देशभरातून दानशूर व्यक्तींनी कोविड सेंटरला आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत केलीय. कोरोनाच्या संकटात गेल्या दीड वर्षापासून कोरोना बाधितांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करणाऱ्या आमदार निलेश लंके यांच्या या सेवेची विदेशातही दखल घेतली असून महाराष्ट्रातील ते‌ एकमेव आमदार ठरले आहे.
  • 24 Jun 2021 12:07 PM (IST)

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सरपंचांना विमा कवच, सरपंचांना दिलासा

    सिंधुदुर्ग--

    सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडून सरपंचांना विमा कवच.

    कोरोना काळात काम करणाऱ्या सरपंचांना दिलासा.

    स्वानिधीतून जिल्हा परिषद 428 सरपंचांना एक लाखांचे विमा कवच देणार आहे.

    नऊ महिने कालावधीसाठी हे विमा कवच मिळणार आहे.

    कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यास देशभरातील कोणत्याही रुग्णालयात उपचार घेता येणार.

    15 सरपंचांना प्रातिनिधिक स्वरूपात जि प अध्यक्षा संजना सावंत यांच्या हस्ते पॉलिसी सुपूर्द.

    हा अभिनव उपक्रम राबविणारी सिंधुदुर्ग ही राज्यातील पहिली जिल्हा परिषद .

  • 24 Jun 2021 08:01 AM (IST)

    सोलापूर महापालिकेत लसीचा साठा संपला, लसीकरण ठप्प

    सोलापूर- शहरात आज लसीकरण होणार नाही

    महानगर पालिकेकडे लसीचा साठा शिल्लक नसल्याने होणार नाही लसीकरण

    त्यामुले आज पालिकेचे सर्व लसीकरण केंद्र राहणार बंद

    मागील महिन्यापासून शहरात सुरू असलेले लसीकरण आज ठप्प

  • 24 Jun 2021 07:27 AM (IST)

    औरंगाबाद शहरासह जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट, फक्त 59 रुग्ण आढळले

    औरंगाबाद  :-

    औरंगाबाद शहर जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्येत कमालीची घट

    काल दिवसभरात आढळले फक्त 59 रुग्ण

    सध्या रुग्णालयात 892 रुग्णांवर उपचार सुरू

    तर काल दिवसभरात कोरोनामुळे 5 जणांचा मृत्यू

    औरंगाबाद शहर जिल्ह्यात डेल्टा प्लस जिवाणूंचा अद्याप संसर्ग नाही

  • 24 Jun 2021 07:24 AM (IST)

    पुण्यातील ग्रामीण भागात हॉटस्पॉट गावांच्या संख्येत केवळ 2 ने घट

    पुणे

    जिल्ह्याच्या ग्रामीण भागात, मागील आठ दिवसांत हॉटस्पॉट गावांच्या संख्येत केवळ 2 ने घट

    तर आंबेगाव, जुन्नर आणि शिरूर तालुक्‍यात हॉटस्पॉटच्या संख्येत वाढ

    ग्रामीण भागातील संसर्ग कमी करण्यात आरोग्य विभागाला यश का येत नाही, असा प्रश्‍न होतोय निर्माण

  • 24 Jun 2021 07:23 AM (IST)

    पुण्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट, ऑक्सिजनची मागणीही 63 टक्‍क्‍यांनी घटली

    पुणे

    कोरोना बाधितांची संख्या कमी होत असल्याने ऑक्‍सिजनची मागणी 228 मेट्रिक टनांनी म्हणजे तब्बल 63 टक्‍क्‍यांनी कमी झाली

    सद्यस्थितीत ही मागणी 134.5 मेट्रिक टन

    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत दररोज लागत होता 363 मेट्रिक टन ऑक्सिजन

  • 24 Jun 2021 07:08 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील लसीकरणाचा विक्रम, एकाच दिवशी 42 हजार नागरिकांचे लसीकरण

    नागपूर जिल्ह्यातील लसीकरणाचा विक्रम एकाच दिवशी ४२ हजार नागरिकांचे लसीकरण मनपा क्षेत्रात २३ हजार ७०३ जणांचं लसीकरण ग्रामीण भागात १८ हजार १८ लसीकरण

  • 24 Jun 2021 07:04 AM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यातील 2 लाख 89 हजार 263 विद्यार्थी परीक्षा न देता पास

    उस्मानाबाद

    कोरोना संकटामुळे उस्मानाबाद जिल्ह्यातील 1 ली ते 12 वी पर्यंतच्या शाळा व परीक्षा न झाल्याने 2 लाख 89 हजार 263 विद्यार्थी परीक्षा न देता पास

    ऑनलाईन शिक्षण पद्धतीने अनेक विद्यार्थीच्या शिक्षणावर परिणाम

  • 24 Jun 2021 07:00 AM (IST)

    उस्मानाबादेतील 30 कोविड केअर सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

    उस्मानाबाद -

    कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील 45 पैकी 30 कोविड केअर सेंटर तात्पुरता स्वरुपात बंद

    जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांचे आदेश,

    30 केंद्र बंद केल्याने कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांवर बेरोजगारीची वेळ

  • 24 Jun 2021 06:52 AM (IST)

    पुण्यात दिवसभरात 283 नवे कोरोनाबाधित, 255 जणांना डिस्चार्ज

    पुणे :

    -दिवसभरात २८३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात २५५ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १६ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९. – ३३१ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४७६४९३. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २३७५. – एकूण मृत्यू -८५४९. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४६५५६९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ५४३७

  • 24 Jun 2021 06:51 AM (IST)

    राज्यात 24 तासात 10 हजार 66 नवे कोरोनाबाधित, 163 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात 24 तासात नवे रूग्ण – १०,०६६

    राज्यात 24 तासात बरे झालेले रूग्ण – ११,०३२ राज्यात 24 तासात मृत्यू – १६३ राज्यात एकूण रूग्ण – ५७,५३,२९० राज्यात एकूण बरे झालेले – ५७५३२९० राज्यात एकूण मृत्यू – ११९३०३ राज्यात अॅक्टीव्ह रूग्ण – १२१८५९

Published On - Jun 24,2021 6:48 AM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.