Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 160 नवे कोरोना रुग्ण, 9 जणांचा मृ्त्यू

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. 

Maharashtra Coronavirus LIVE Update : नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 160 नवे कोरोना रुग्ण, 9 जणांचा मृ्त्यू
corona

| Edited By: prajwal dhage

Jul 09, 2021 | 12:22 AM

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 9,558 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 8,899 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 58,81,167 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,14,625 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.05% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 08 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 08 Jul 2021 11:28 PM (IST)

  अंबरनाथ आणि बदलापूर शहरात उद्या लसीकरण बंद राहणार

  अंबरनाथ : अंबरनाथ आणि बदलापूर शहरात उद्या लसीकरण बंद राहणार

  लसींचा पुरवठा न झाल्यामुळे उद्या लसीकरण बंद

  नियमितपणे लसींचा पुरवठा होत नसल्यामुळे लसीकरण मोहिमेत अडथळे

 • 08 Jul 2021 08:00 PM (IST)

  नागपूर मनपा केंद्रामध्ये उद्या कोवीशिल्डचे लसीकरण नाही

  नागपूर मनपा केंद्रामध्ये  उद्या कोवीशिल्डचे लसीकरण नाही

  नागपूर : शासनाकडून नागपूर महानगरपालिकेला कोवीशिल्डचे लसीचा पर्याप्त पुरवठा उपलब्ध न झाल्यामुळे मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर उद्या कोणत्याही वयोगटातील नागरिकांचे लसीकरण होणार नाही. ही माहिती अतिरिक्त आयुक्त श्री. राम जोशी यांनी दिली.

  18 वर्षावरील व 45 वर्षावरील नागरिकांसाठी कोव्हॅक्सीन लसीचा पहिला व दूसरा डोस शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल कॉलेज), बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे सभागृह, सिद्धार्थ नगर, आशिनगर झोन च्या मागे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रूग्णालय) व स्व.प्रभाकर दटके म.न.पा.महाल रोग निदान केंद्र येथे उपलब्ध आहे.

 • 08 Jul 2021 07:42 PM (IST)

  नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 160 नवे कोरोना रुग्ण, 9 जणांचा मृ्त्यू

  नाशिक कोरोना अपडेट

  आज रोजी पूर्ण बरे झालेले रुग्ण- 178

  आज रोजी पॉझिटिव्ह रुग्णसंख्येत झालेली वाढ - 160

  नाशिक मनपा- 054

  नाशिक ग्रामीण- 094

  मालेगाव मनपा- 002

  जिल्हा बाह्य- 010

  नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 8413

  आज रोजी कळवण्यात आलेले मृत्यू:- 09

  नाशिक मनपा- 03

  मालेगाव मनपा- 01

  नाशिक ग्रामीण- 05

  जिल्हा बाह्य- 00

 • 08 Jul 2021 06:21 PM (IST)

  नागपुरात दिवसभरात 20 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

  नागपूर कोरोना अपडेट

  नागपुरात आज ही कोरोनामुळे मृत्यू संख्या शून्य

  20 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

  तर 25 रुग्णांनी केली कोरोनावर मात

  एकूण रुग्णसंख्या - 477270

  एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 468089

  एकूण मृत्यूसंख्या - 9031

 • 08 Jul 2021 05:52 PM (IST)

  अकोल्यात आज दिवसभरात 6 जणांना कोरोना, 104 जणांवर उपचार

  अकोला कोरोना अपडेट

  अकोल्यात आज दिवसभरात 6 रुग्ण पॉझिटिव्ह आले असून दिवसभरात एक मृत्यू

  आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

  आतापर्यंत 56430 जणांनी केली कोरोनावर मात

  सध्या 104 रुग्ण उपचार घेत आहेत

  तर दिवसभरात 70 जण कोरोनामुक्त झाले आहेत

 • 08 Jul 2021 05:39 PM (IST)

  पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या घटेना, नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुगसंख्या पारनेरमध्ये

  अहमदनगर : पारनेर तालुक्यातील कोरोना रुग्णसंख्या घटेना

  नगर जिल्ह्यात सर्वाधिक रुगसंख्या पारनेरमध्ये

  जिल्ह्यात करोनाची दुसरी लाट ओसरताना पारनेर तालुक्यात मात्र सर्वाधिक रुग्ण आढळताय

  मुंबईशी सतत संपर्क असल्याने तेथील आकडे कमी होत नसल्याची चर्चा

  मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दावा फेटाळला

  तर पारनेरची रुग्णसंख्या नेमकी का वाढते याचा शोध घेण्याची पालकमंत्री यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

 • 08 Jul 2021 05:37 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 331 नव्या कोरोना रुग्णांची नोंद, 253 जणांना डिस्चार्ज

  पुणे कोरोना अपडेट

  दिवसभरात 331 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ.

  - दिवसभरात 253 रुग्णांना डिस्चार्ज.

  - पुण्यात करोनाबाधीत 13 रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील 5.

  -244 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

  - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या 480913

  - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- 2941

  - एकूण मृत्यू -8636

  -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज 469336

 • 08 Jul 2021 04:00 PM (IST)

  प्रत्येक शाखा प्रमुखाने आपल्या गावात कोरोनामुक्त गाव ही मोहीम राबवा : उद्धव ठाकरे

  शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आदेश

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गावा-गावात शिवसेना पोहोचण्यासाठी शिवसंपर्क मोहीम सुरू करा असा कार्यक्रम दिला आहे.

  शिवसंपर्क अभियान 12 जुलै ते 24 जुलै दरम्यान होणार

  माझे गाव करोनामुक्त गाव आपल्या गावात ही मोहीम प्रत्येक शाखा प्रमुखानं राबवण्याचे आदेस

  महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या प्रत्येक विभागात प्रत्येक प्रभागात बैठका घ्या

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनामुक्तीचा कार्यक्रम राबवा

  सत्तेच्या काळात पक्ष बळकट करण्याचा कार्यक्रम राबवा

  उद्धव ठाकरेंचे जिल्हा प्रमुखांना आवाहन

 • 08 Jul 2021 11:20 AM (IST)

  सोलापूर शहरात आज लसीकरण नाही

  सोलापूर शहरात आज लसीकरण नाही

  लसीचा साठा उपलब्ध नसल्याने लसीकरण नाही

  महापालिकेच्या 34 लसीकरण केंद्रावर आज लसीकरण होणार नाही

  लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर लसीकरण सुरू करण्यार असल्याच पालिका प्रशासनाची माहिती

 • 08 Jul 2021 09:26 AM (IST)

  देशात 24 तासांत 45 हजार 892 नवे रुग्ण

  दिल्ली -

  देशात 24 तासात नवे रुग्ण - 45,892

  देशात 24 तासात मृत्यू - 817

  देशात 24 तासात डीस्चार्ज - 44,291

  एकूण रूग्ण -3,07,09,557

  एकूण मृत्यू - 4,05,028

  एकूण डीस्चार्ज - 2,98,43,825

  एकूण एक्टीव्ह रूग्ण - 4,60,704

  एकूण लसीकरण - 36,48,47,549

  केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची माहिती

 • 08 Jul 2021 08:28 AM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यात उद्यापासून दुकानं सुरु होणार

  कोल्हापूर

  कोल्हापूर जिल्ह्यातील उद्यापासून सुरू होणार

  आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांची माहिती

  दुकान सुरू होणार असली तरी दुकानदार आणि ग्राहकांनी नियमांचे पालन करण्याच यड्रावकर यांच आवाहन

  कोल्हापूर शहराच्या धर्तीवर जिल्ह्यातील सर्वच व्यवसाय सुरू करण्याची व्यापाऱ्यांकडून होत होती मागणी

  व्यापाऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा माजी खासदार राजू शेट्टी यांनी देखील दिला होता इशारा

  व्यापारी संघटनेच्या आक्रमक भूमिकेची राज्य सरकारकडून दखल

 • 08 Jul 2021 08:26 AM (IST)

  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

  पुणे

  ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने जिल्हा परिषदेच्या 1 हजार 334 शाळा सुरू होण्याचा मार्ग मोकळा

  या शाळांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांनी नियमित शाळा सुरू करण्यास दर्शवली सहमती

  यामुळे किमान दीड वर्षाच्या खंडानंतर या शाळा सुरू होणार

  जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शाळा सुरू करण्याबाबत शालेय व्यवस्थापन समित्यांना दिले अधिकार

  हे अधिकार देण्यापूर्वी किती गावे, शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समित्या गावांतील प्राथमिक शाळा नियमितपणे सुरू करण्यास तयार आहेत, याचे सर्वेक्षण केले पूर्ण

 • 08 Jul 2021 07:06 AM (IST)

  मेडिकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 5 कोटींचा खर्च

  पिंपरी चिंचवड

  -मेडिकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी 5 कोटींचा खर्च

  -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या भोसरी, जिजामाता, थेरगांव व आकुर्डी रुग्णालयाकरीता रुग्णांच्या उपचाराकरीता आवश्यक द्रव ऑक्सिजन आणि मेडीकल गॅस लिक्विड ऑक्सिजन पुरवठा करण्याकामी येणाऱ्या 5 कोटी रुपयांसह शहरातील विविध विकास कामांच्या येणाऱ्या आणि झालेल्या सुमारे 79 कोटी 12 लाख रुपये खर्चास स्थायी समितीने मान्यता दिली

 • 08 Jul 2021 07:01 AM (IST)

  अकोल्यात काल दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू

  अकोला

  अकोल्यात काल दिवसभरात 2 रुग्ण पॉझिटीव्ह आले असून एकाचा मृत्यू

  आतापर्यंत 1130 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून आतापर्यंत 56360 जणांनी कोरोनावर मात केली आहे

  तर सध्या 164 रुग्ण उपचार घेत आहेत

  तर दिवसभरात 68 जण कोरोना मुक्त झाले आहेत

 • 08 Jul 2021 06:59 AM (IST)

  नागपूर शहरात कालच्या दिवसात 36 हजार 584 नागरिकांचे लसीकरण

  नागपूर ब्रेकिंग -

  नागपूर शहरात कालच्या दिवसात 36 हजार 584 नागरिकांचे लसीकरण

  शासकीय केंद्रामध्ये 33 हजार 470 तर खाजगी केंद्र मध्ये 3114 नागरिकांनी लस घेतली

  उध्या ला मनपा केन्द्रांमध्ये ४५ वर्षा वरील नागरिकांसाठी कोव्हीशील्ड उपलब्ध

  शासनाकडून मर्यादित प्रमाणात कोव्हीशिल्ड लसी प्राप्त झाल्यामुळे फक्त ४५ वर्षावरील वयोगटातील नागरिकांचे लसीकरण नागपूर महानगरपालिकेसह शासकीय असलेल्या केन्द्रावर गुरुवारी होणार आहे.

  या वयोगटातील नागरिकांना कोव्हिशिल्ड लस नि:शुल्क दिली जाईल.

  तर तीन केंद्रांवर कोव्हॅक्सीन लस उपलब्ध आहेत.

Published On - Jul 08,2021 6:40 AM

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें