Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाचे 8 हजार 172 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 124 जणांचा मृत्यू

कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

Maharashtra Coronavirus LIVE Update : राज्यात कोरोनाचे 8 हजार 172 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 124 जणांचा मृत्यू
corona virus

राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरल्याचं चित्र असतानाच आता कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटने चिंता वाढवली आहे. काल दिवसभरात राज्यात 7,761 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली व आज नवीन 13,452 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,65,644 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,01,337 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.27% झाले आहे. कोरोनाची हळू हळू वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसची रुग्ण संख्या यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमवाली लागू करता येणार नाही. त्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत.  | Corona Cases Lockdown news today Live Updates In Marathi July 17 2021 Daily City District Wise Covid 19 Vaccine Tracker Delta Plus variant Unlock Updates

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
 • 17 Jul 2021 20:24 PM (IST)

  राज्यात कोरोनाचे 8 हजार 172 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 124 जणांचा मृत्यू

  राज्यात कोरोनाचे 8 हजार 172 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 124 जणांचा मृत्यू, तर 8 हजार 950 रुग्णांची कोरोनावर मात

 • 17 Jul 2021 19:18 PM (IST)

  पुण्यात दिवसभरात 321 नवे कोरोनाबाधित रुग्ण, 14 जणांचा मृत्यू

  पुणे : दिवसभरात ३२१ पॅाजिटिव्ह रुग्णांची वाढ. – दिवसभरात ४३२ रुग्णांना डिस्चार्ज. – पुण्यात करोनाबाधीत १४ रुग्णांचा मृत्यू. तर पुण्याबाहेरील ०९. -२३४ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. – पुण्यात एकूण पॉजिटिव्ह रूग्णसंख्या ४८३५२०. – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- २९२६. – एकूण मृत्यू -८६८५. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४७१९०९. – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ८०५२

 • 17 Jul 2021 18:36 PM (IST)

  बीडच्या तीन तालुक्यात नवीन निर्बंध, आष्टी, पाटोदा, गेवराईत कडक निर्बंध

  बीड: तीन तालुक्यात नवीन निर्बंध

  आष्टी, पाटोदा, गेवराईत कडक निर्बंध

  उद्यापासून सकाळी 7 ते 12.30 पर्यंत सूट

  कोरोना रुग्ण वाढत असल्याने जिल्हा प्रशासनाचा निर्णय

  नियम डावलणाऱ्यावर कडक कारवाई करणार

  जिल्हा प्रशासनाने काढले आदेश

 • 17 Jul 2021 18:32 PM (IST)

  कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकान सोमवारपासून उघडली जाणार

  कोल्हापूर :

  अखेर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व दुकान सोमवारपासून उघडली जाणार

  जिल्हा प्रशासनाने काढले आदेश

  जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटी रेटमध्ये मोठी घट

  जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9.7 टक्क्यांवर

  सोमवारपासून जिल्ह्यासाठी तिसऱ्या टप्प्यातील नियम लागू असणार

  सर्व दुकान सकाळी 7 ते सायंकाळी 4 या वेळेत उघडता येणार

 • 17 Jul 2021 17:49 PM (IST)

  नाशिकमध्ये राजकीय, शासकीय, सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद, छगन भुजबळ यांची मोठी घोषणा

  छगन भुजबळ यांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :

  – आपला पॉझिटिव्हीटी रेट 2.2% आहे – एकूण बाधित 3 लाख 97 हजार – आपला मृत्यू दर राज्यापेक्षा कमी

  – ऑक्सिजन उद्दिष्टे जास्त ठेवलं आहे – जिल्ह्यातील 8 ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे – 1 महिन्यात ज्यांचा 1 ही रुग्ण नाही अशा गावात शाळा सुरू करायची – 1 हजार 24 शाळा त्या पैकी कोवीडमुक्त 335 गावातील 296 शाळा सुरू होणार – एका बेंचवर एक मुलगा – नियम पाळावे लागणार – रुग्ण सापडले तर शाळा बंद होणार

  – राजकीय,शासकीय,सामाजिक कार्यक्रम उद्यापासून बंद – ऑनलाइन कार्यक्रमास परवानगी – निर्बंध शिथिल नाही,मुख्यमंत्री म्हटले अधिक कडक करा – परिस्थिती बघता निर्णय

  – 4 नंतर शाळा ही बंद, फक्त 4 पर्यँत वेळ – प्रत्यकाला समजायला हवं,नियम.. – पोलिसांना दोन्ही कडून मार त्यांनीच काय करायचं,1 काठी मारली तर तुम्ही छापता – विकेंडला जमाव बंदीचे आदेश लागू

  – आजपासून सर्व बंद कार्यक्रम,सगळ्यांचेच बंद होणार – आदेश आता काढले,अजून लेखी आदेश निघणार,मग सर्वांना लागू होणार

 • 17 Jul 2021 16:58 PM (IST)

  नाशिकच्या जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना आढावा बैठक सुरु, पालकमंत्री उपस्थित

  नाशिक :

  – पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यलयात कोरोना आढावा बैठकीला सुरवात – सर्व अधिकारी बैठकीस उपस्थित – जिल्ह्यातील शाळा सुरू करण्या संदर्भात बैठकीत निर्णय होण्याची शक्यता

 • 17 Jul 2021 16:15 PM (IST)

  आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निर्देश

  मुंबई : चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण कोविडविषयक आरोग्याच्या नियमांची पूर्ण काळजी घेऊन झाले पाहिजे,यात कोणताही निष्काळजीपणा झालेला परवडणार नाही असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विशेषत: मुंबई आणि परिसरात निर्मात्यांनी चित्रीकरणाचे स्थळ व वेळ याबाबत पोलिसांशी योग्य तो समन्वय ठेवावा आणि आपल्या पथकातील कलाकार व लोकांची नियमित कोविड तपासणी करावी, लसीकरण होईल हे पाहावे अशा सुचना दिल्या.

  चित्रपट निर्मात्यांच्या सर्वात मोठी संस्था असलेल्या प्रोड्युसर्स गिल्डच्या पदाधिकाऱ्यांशी मुख्यमंत्र्यांनी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी राज्य शासनाच्या कोविडविषयक निर्देशांचे पुरेपूर पालन करून चित्रीकरण पार पडले जाईल अशी ग्वाही दिली.

 • 17 Jul 2021 08:32 AM (IST)

  मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरबाहेर वयोवृद्धांचा संताप

  – मुंबईच्या बीकेसी कोविड सेंटरबाहेर वयोवृद्धांचा संताप

  – लस द्या नाहीतर आमच्या फोनवर मेसेज पाठवणं बंद करा, अन्यथा लोक कायदा हातात घेतील, अशी प्रतिक्रिया

  – पहाटे पाच पासून लांबून आलेयत लोक, त्यांना आता घरी जाण्यास सांगितलं आहे

  – काहींना मेसेज येऊनही लस नसल्याचं कारण देण्यात येतंय, लसीसाठी हेलपाटे घालावे लागत आहेत

  – आज 25 लसीकरण केंद्रावर कोवॅक्सिनचा डोज दिला जाणार

  – बीकेसी कोविड सेंटर इथे 100 कोविशिल्डचे, 100 कोवॅक्सिनचे डोज दिले जात आहेत

  – 50 टक्के वाॅकइन आणि 50 टक्के ऑनलाईन प्रवेश दिला गेलाय

  – मुंबईत लसीचा साठा मर्यादित असल्याने लोक हैराण

  – काही करा पण लस द्या अशी नागरीकांची मागणी

 • 17 Jul 2021 08:23 AM (IST)

  आज सोलापूर शहरात पहिल्यांदाच गर्भवती महिलांसाठी लसीकरण

  आज सोलापूर शहरात पहिल्यांदाच गर्भवती महिलांसाठी लसीकरण

  शहरातील मदर तेरेसा आरोग्य केंद्रात गर्भवती महिलांच्या लसीकरणाची व्यवस्था

  18 वर्षांवरील गर्भवती महिलांना ऑनस्पॉट रजिस्ट्रेशन करून घेता येणार लस, कोव्हीशिल्डच्या 200 लसी उपलब्ध

 • 17 Jul 2021 07:44 AM (IST)

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

  सोलापूर –

  राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

  जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा घेणार आढावा

  जलसंधारण विभागाच्या बैठका,

  राष्ट्रवादी कार्यकर्त्यांच्या बैठकाना राहणार उपस्थित

 • 17 Jul 2021 06:53 AM (IST)

  गेल्या 24 तासांत राज्यात 7,761 कोरोना बाधित रुग्णांची वाढ

  गेल्या 24 तासांत राज्यात 7,761 कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली आणि नवीन 13,452 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण 59,65,644 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण 1,01,337 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 96.27% झाले आहे.

Published On - 6:31 am, Sat, 17 July 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI