Corona Delta Variant : कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, कोरोना विषाणुच्या व्हेरीएंटवर संशोधन होणार

कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हएरिएंटचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही.

Corona Delta Variant : कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेन्सिंग लॅब, कोरोना विषाणुच्या व्हेरीएंटवर संशोधन होणार
Kasturba-Hospital

मुंबई : मुंबई महापालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात जिनोम सिक्वेंसिंग लॅब उभारण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महापालिका ही कोरोना विषाणुच्या व्हेरीएंटवर संशोधन करुन तिचे निष्कर्ष मांडू शकणारी पहिली आत्मनिर्भर महापालिका बनली आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हएरिएंटचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर कस्तुरबा रुग्णालयातील जिनोम सिक्वेन्सिंग लॅब अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे आता कोरोनाचे नवनवीन व्हेरियंट तपासणीसाठी आता नमुने पुण्याच्या एनआयव्हीला पाठवण्याची गरज भासणार नाही. त्यामुळे रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे. (Genome Sequencing Lab set up at Kasturba Hospital, Mumbai)

कशी आहे ही जिनोम सिक्वेंसींग लॅब आणि काय आहेत तिचे फायदे ?

>> नेक्स्ट जनरेशन जीनोम सिक्वेसिंग ही पद्धती वापरुन विषाणूंचे जनुकीय सूत्र ओळखून एकाचवेळी मोठ्या प्रमाणावर वैद्यकीय नमुन्यांची चाचणी करता येणे शक्य होते.

>> सध्याच्या कोविड – १९ विषाणू संसर्ग कालावधीत कोविड विषाणूचे नवनवीन प्रकार समोर येत आहेत. अशा स्थितीत जीनोम सिक्वेसिंग लॅबमध्ये वैद्यकीय नमुन्यांची तपासणी करुन उपचारांना वेग देणे शक्य

>> अमेरिकेतील इलुम्निया या कंपनीने, अमेरिकेतीलच अल्ब्राईट स्टोनब्रिज ग्रुप (ए. एस. जी. – बोस्टन) या संस्थेच्या माध्यमातून एकूण ६ कोटी ४० लाख रुपये किंमतीचे २ जीनोम सिक्वेसिंग संयंत्र बृहन्मुंबई महानगरपालिकेला दान स्वरुपात दिले आहे.

>> एकाचवेळी 384 नमुन्यांची तपासणी होऊन 4 दिवसांच्या आत वैद्यकीय निष्कर्ष प्राप्त होऊ शकतात.

महापालिकेकडून वेगवेगळ्या चाचण्या करण्यासाठी यंत्रणा

मुंबई महापालिकेला ‘डेल्टा प्लस’ संशयित सुमारे 600 अहवालांचे रिपोर्ट मिळाले आहेत. मुंबईत ‘डेल्टा प्लस’चा केवळ एकच रुग्ण आढळला असून तो बरादेखील झाला आहे. मात्र मुंबई महापालिका आगामी काळात अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचण्या करण्यासाठी यंत्रणा उभारत आहे. सद्यस्थितीत पालिका ‘डेल्टा प्लस’सारख्या वेगळ्या विषाणूंच्या ‘जिनोम सिक्वेन्स’साठी पुण्याच्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ व्हायरॉलॉजी’कडे संशयित रुग्णांची सॅम्पल पाठवली जातात. मात्र या चाचण्यांचे अहवाल येण्यास दोन महिन्यांचा कालावधी लागतो.

कस्तुरबा रुग्णालयात चाचण्या

मात्र सद्यस्थितीत डोके वर काढणारा ‘डेल्टा प्लस’ सर्वाधिक वेगाने पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेने ‘डेल्टा प्लस’सारख्या विषाणूंच्या चाचण्या कस्तुरबा रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

राज्यात जुलै महिन्यात तब्बल 15 हजारपेक्षा अधिक बेरोजगारांना रोजगार, मंत्री नवाब मलिकांचा दावा

Mhada lottery 2021 update : म्हाडाची खुशखबर, 8 हजार घरांसाठी 14 ऑक्टोबरला लॉटरी, कुठे, किती घरं?

Genome Sequencing Lab set up at Kasturba Hospital, Mumbai

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI