Corona Omicron News Live Update | कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय, कुठे बंद, कुठे सुरू? वाचा अपडेट

| Updated on: Jan 04, 2022 | 6:32 AM

मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची (Corona) संख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्येसोतबच राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या रुपाने डोके वर काढले आहे. राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Corona Omicron News Live Update | कोरोनाचा कहर वाढल्याने शाळांबाबत मोठा निर्णय, कुठे बंद, कुठे सुरू? वाचा अपडेट
Omicron

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची (Corona) संख्या वाढताना दिसत आहे. रुग्णसंख्येसोतबच राज्यात ओमिक्रॉन (Omicron) या कोरोनाच्या नव्या रुपाने डोके वर काढले आहे. राज्यात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढत असून खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असे असतानाही ओमिक्रॉनचा प्रसार थांबण्याचे चिन्हं नाही. 2 जानेवारी रोजी ओमिक्रॉन व्हेरियंटची लागण झालेले 50 नवे रुग्ण आज राज्यात सापडले आहेत. त्यातील 36 रुग्णांची नोंद एकट्या पुण्यात झाली. तर पिंपरी-चिंचवडमध्ये 8 रुग्ण सापडले. राज्यात ओमिक्रॉनची लागण झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता 510 झाली आहे. त्यापैकी 193 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज पुन्हा एकदा ओमिक्रॉनबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 04 Jan 2022 12:27 AM (IST)

    मुंबईपाठोपाठ नवी मुंबईतही निर्णय! पहिली ते नववीचे ऑफलाईन वर्ग बंद राहणार

    नवी मुंबईतील शाळाही 31 जानेवारीपर्यंत बंद राहणार आहेत. मुंबई पाठोपाठ नवी मुंबई पालिकेनंही वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला आहे. शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्यात येत असून शाळा पुन्हा ऑनलाईन सुरु राहणार आहेत. दरम्यान, दहावी बारावीचे वर्ग ऑफलाईन सुरु राहणार असल्याचंही सांगण्यात आलंय. सगळ्यात मुंबई महानगरपालिकेनं शाळांबाबत निर्णय जाहीर केला होता. त्यानंतर ठाण्यातही शाळांबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानंतर आता लगेचच नवी मुंबईतही शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 03 Jan 2022 08:54 PM (IST)

    कोरोना रुग्णवाढीनं 12 हजाराचाही टप्पा ओलांडला, ओमिक्रॉनचे 68 रुग्ण

    एकिकडे कोरोना तर दुसरीकडे ओमिक्रॉनचा कहर सुरूच आहे, राज्यात आज कोरोना रुग्णांनी 12 हजारांचा आकडा पार केला आहे, आज राज्यात 12 हजार 160 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे राज्य लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर पुन्हा पोहोचले आहे. राज्यात आज ओमिक्रॉनचे 68 रुग्ण आढळले आहेत. मुंबई-40, पुणे-14 नागपूर- 4, पुणे ग्रामीण ,पनवेल प्रत्येकी 3 तर कोल्हापूर, नवी मुंबई, सातारा ,रायगड 1 रुग्ण, ही आजची आकडेवारी आहे. राज्यात आतापर्यंत 578 रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी 259 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. आज राज्यात 11 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाल आहे.

  • 03 Jan 2022 05:03 PM (IST)

    गोव्याची चिंता वाढली

    परदेशातून आलेले 66 प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह, गोव्याच्या आरोग्यमंत्र्यांची माहिती

  • 03 Jan 2022 01:40 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत पुण्यात कोरोना आढावा बैठक 

    पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत उद्या होणार कोरोना आढावा बैठक

    - शहर आणि जिल्ह्यात वाढत्या कोरोना,ओमिक्रॉन रुग्णासंख्येमुळे नवे निर्बंध लावण्याची शक्यता

    - गेल्या काही आठवड्यानंतर अजित पवार घेणार आढावा बैठक

    - बैठकीला पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेचे अधिकारी उपस्थित राहणार.

  • 03 Jan 2022 01:39 PM (IST)

    नाशिकमध्ये विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोव्हिसील्ड लस  

    नाशिक : विद्यार्थ्याला कोव्हॅक्सिनऐवजी दिली कोव्हिसील्ड लस

    - येवला तालुक्यातील पाटोदा आरोग्य केंद्रातील धक्कादायक प्रकार

    - या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधितांवर आरोग्य विभागाने कारवाई करण्याची केली पालकाने मागणी

Published On - Jan 03,2022 1:26 PM

Follow us
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला
तू ज्या शाळेत शिकतो बेटा, त्याचा मी हेडमास्तर; अजित पवारांचा खोचक टोला.
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा
राजसाहेबांचं भाषण झोंबलंय, पिक्चर अभी... मनसे नेत्याचा राऊतांना इशारा.
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला
पैसे मोजताना मी स्वतः...मातोश्रीवरचा तो किस्सा राणेंनी भरसभेत सांगितला.
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर
बाप तो बाप... बारामतीत शरद पवारांच्या सभास्थळी टोले लगावणारे बॅनर.
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य
माझ्याकडे असा दारूगोळा आहे, पण मी...; उज्ज्वल निकम यांचं सूचक वक्तव्य.
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'
'हेमंत करकरेंना कसाबने नाहीतर RSS समर्थक पोलीस अधिकाऱ्यानं घातली गोळी'.
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका
मतांसाठी कसाबची बाजू... लाज बाळगा; भाजप नेत्याची वडेट्टीवारांवर टीका.
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?
2004ला दादा मुख्यमंत्री, पवारांनी प्रस्ताव नाकारला, कुणाचा गौप्यस्फोट?.
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार
संताच्या ओव्या, अभंग, मोदी..., सोशल मीडियावरील फडणवीसांचा अनोखा प्रचार.
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला
ठाकरेंची कशावरून सटकली? 'त्या' वक्तव्यावरून शिंदेंनी लगावला खोचक टोला.