AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रस्त्यांची दुरावस्था, कार अपघातात भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा मृत्यू

भाजपच्या महिला नेत्या (BJP Women Leader) आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे (Corporator Mugdha Londhe) यांचा गुरुवारी (3 ऑक्टोबर) पनवेलमधील रॉयल हॉटेलजवळ (Panvel Royal Hotel) अपघात (Road Accident) झाला.

रस्त्यांची दुरावस्था, कार अपघातात भाजप नगरसेविका मुग्धा लोंढे यांचा मृत्यू
| Updated on: Oct 03, 2019 | 11:18 PM
Share

पनवेल : भाजपच्या महिला नेत्या (BJP Women Leader) आणि पनवेल महापालिकेच्या नगरसेविका मुग्धा लोंढे (Corporator Mugdha Londhe) यांचा गुरुवारी (3 ऑक्टोबर) पनवेलमधील रॉयल हॉटेलजवळ (Panvel Royal Hotel) अपघात (Road Accident) झाला. यात त्यांचा जागीच मृ्त्यू झाला. त्या हॉटेलजवळ रस्त्याच्या कडेला उभ्या असताना एका भरधाव स्विफ्ट कारने त्यांना धडक दिली. त्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्या प्रभाग क्रमांक 19 च्या भाजपच्या नगरसेविका होत्या.

या अपघातात माजी नगरसेविका आणि भाजपच्या रायगड जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना राऊत (Kalpana Raut) या देखील गंभीर जखमी झाल्या आहेत. हा अपघात खराब रस्त्यामुळे झाल्याचं सांगितलं जात आहे. संबंधित रस्ता अर्धवट काँक्रिटीकरण (Incomplete Concrete road) केलेला होता. दरम्यान रस्त्यावरुन जाणारी एक कार खड्ड्यात अडकली. कार काढण्याच्या प्रयत्नातच गाडी अनियंत्रित होत वेगाने समोर आली. त्यानंतर गाडीने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या लोंढे आणि राऊत यांना चिरडले. यात मुग्धा लोंढे यांचा जागीच मृत्यू झाला, तर कल्पना राऊत गंभीर जखमी झाल्या.

घटनेची माहिती मिळताच भाजपचे अनेक नेते आणि कार्यकर्ते घटनास्थळावर दाखल झाले. दुखापतग्रस्त कल्पना राऊत यांच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर आहे.

Follow Us
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू...
वादग्रस्त ऑडिओनंतर आमदार संजय गायकवाडांनी मागितली माफी, माझा हेतू....
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल
भाजपने पुन्हा एकदा पंजाबच्या जनतेला दगा दिला; केजरीवाल यांचा हल्लाबोल.
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान
मीरा-भाईंदरमध्ये येऊन दाखवावं, सदावर्तेंना अविनाश जाधवांचं आव्हान.
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;
दिल्लीत घडामोडी वाढल्या, आपचे 7 खासदार थेट भाजपा अध्यक्षांच्या भेटीला;.
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा...
मोठी बातमी! केजरीवालांना धक्का, राघव चड्ढा यांच्यासोबत 7 खासदारांचा....
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला
दिल्लीच्या राजकारणात आजवरचा सर्वात मोठा भूकंप, आम आदमी पक्ष फुटला.
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका...
हिंदू मुलींना मुस्लिम मुलंच आवडतात, माझ्या काकांच्या 3 बायका....
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?
अटकेच्या दिवशीच 58 लाखाचा व्यवहार! खरात तुरूंगात बसूनही करतोय कारनामे?.
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं...
पश्चिम बंगालमध्ये कोणाची सत्ता अमित शाहांनी थेट सांगितलं....
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर..
मोठी अपडेट! मुंबईतील नेस्को ड्रग्स प्रकरण आणखी चिघळलं, दोन पोलिसांवर...