सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष, एका फोनमुळे टोळी गजाआड

कमी किंमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या एका टोळीला खामगाव पोलिसांनी जेरबंद केलं आहे.

सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष, एका फोनमुळे टोळी गजाआड
Buldana police
Follow us
| Updated on: Jun 01, 2021 | 10:27 PM

बुलडाणा : कमी किंमतीत सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवून लुटणाऱ्या एका टोळीला खामगाव पोलिसांनी जेरबंद केलं आहे. चाकूचा धाक दाखवून लुटणाऱ्या टोळीतील एकाने तक्रारदाराला दूरध्वनी केल्यानंतर संबंधिताने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर दधम, जयरामगड येथील दुसऱ्या एका टोळीचे बिंग फुटले. पोलिसांनी सतर्कतेने कोंबिंग ऑपरेशन राबवून पाच जणांना अटक केली आहे. (decoy of giving gold coins at low price, gang arrested by Buldana police)

सोन्याची नाणी कमी किंमतीत देण्याचे आमिष दाखवून टोळीतील काही आरोपीनी हिंगोली येथील हनुमान महादेव गिरी आणि त्यांच्या मित्राला 29 मे रोजी बोलावले होते. शीर्ला येथील राधास्वामी संत्सगाजवळ गिरी पोहोचल्यांनतर तेथे आधीच सापळा रचून बसलेल्या 10 ते 12 जणांनी फिर्यादीजवळील 25 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला.

त्यानंतर या टोळीतील काहींनी गिरी यांच्या दूरध्वनीवर संपर्क करीत, 3 ते 4 लाख रुपयांमध्ये सोन्याची नाणी देण्याचे आमिष दाखवत पुन्हा बोलावले. त्यावेळी गिरी यांनी (तक्रारदाराने) पोलिसांशी संपर्क केला. त्यानंतर खामगाव पोलीस पथकातील 64 अधिकाऱ्यांनी दधम, हिवरखेड परिसरात कोंबिंग ऑपरेशन राबवले. यामध्ये आरोपी महेश बाळू मोहिते (23), दिलीप शेषराव चव्हाण (23), कृष्णा पुंडलिक चव्हाण (60), बळीराम पुंडलिक चव्हाण (45) सर्व राहणार दधम आणि सतीश पवन पवार (19) राहणार जयरामगड यास अटक केली आहे.

दरम्यान, 29 मे रोजीच्या घटनेप्रकरणी कलम 395, 397 अन्वये हिवरखेड पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी यात दुर्जन किसन शिंदे राहणार जयरामगड यास अटक करण्यात आली होती. तर आरोपींकडून मोटारसायकलींसह 90 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पोलिसानी राबवलेल्या कोंबिंग ऑपरेशनमध्ये एक तलवार, एक सुरा, दोन चाकू, एक लाकडी दांडा, एक मोबाईल तसेच दुचाकी जप्त केल्या आहेत, अशी माहिती खामगावचे अप्पर पोलीस अधीक्षक हेमराजसिंग राजपूत यांनी दिली आहे.

इतर बातम्या

चोरट्यासोबतच्या झटापटीत लोकलखाली आलेल्या महिलेच्या मृत्यूने तीन मुली झाल्या पोरक्या; ह्रदय पिळवटून टाकणारी कहाणी

भ्रष्ट कारभारावर नाराजी व्यक्त करीत इसमाचा आत्मदहनाचा प्रयत्न, पोलिसांनी घेतले ताब्यात

फेसबुकवरुन ओळख, हनी ट्रॅपमध्ये अडकवणाऱ्या तरुणीची मुंबईत गळा दाबून हत्या

(decoy of giving gold coins at low price, gang arrested by Buldana police)

Non Stop LIVE Update
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.