AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

टूलकिटप्रकरणी शंतनू यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये; झूम अ‍ॅपवर रचलं षडयंत्र

दिल्लीतील शेतकरी आंदोलन भडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. (delhi police team in beed to search shantanu muluk)

टूलकिटप्रकरणी शंतनू यांचा शोध घेण्यासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये; झूम अ‍ॅपवर रचलं षडयंत्र
| Updated on: Feb 15, 2021 | 6:00 PM
Share

बीड: दिल्लीतील शेतकरी आंदोलन भडकवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या टूलकिट प्रकरणी दिल्ली पोलीस बीडमध्ये दाखल झाले आहेत. बीडच्या शंतनू मुळूक यांच्यावर दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या शोधासाठी दिल्ली पोलीस बीडमध्ये आले आहेत. (delhi police team in beed to search shantanu muluk)

शंतनू मुळूक हे मूळचे बीडचे आहेत. सध्या ते दिल्लीत राहत आहेत. टूलकिट प्रकरणात त्यांच्याविरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यापासून ते गायब आहेत. त्यामुळेच त्यांचा शोध घेण्यासाठी पोलीस बीडमध्ये दाखल झाले असून शंतनू यांच्याविषयची अधिक माहिती मिळवत आहेत.

दिल्ली पोलिसांची पत्रकार परिषद

पर्यावरणवादी कार्यकर्ती दिशा रवी, निकिता जेकब आणि शंतनू या तिघांनी टूलकिट दस्ताऐवज तयार केले होते. तसेच झूम अॅपवरून या तिघांनी मिटिंग करून अपप्रचार करण्याचं षडयंत्र रचलं होतं, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला आहे. दिल्ली पोलिसांनी पत्रकार परिषद घेऊन हा दावा केला. टूलकिट षडयंत्रामध्ये पोएटिक फाऊंडेशन सहभागी होता. टूलकिटमध्ये चुकीची माहिती देण्यात आलेली आहे. आंदोलन फोफावण्यासाठी जानेवारीत टूलकिट तयार करण्यात आलं. हे आंदोलन विदेशापर्यंत पोहोचावं आणि परदेशातील भारताच्या दूतावासाला टार्गेट करता यावं म्हणून हा सगळा प्रकार करण्यात आल्याचं दिल्ली पोलिसांनी सांगितलं.

11 जानेवारीला मिटींग

11 जानेवारी रोजी एक झूम मिटिंग झाली. या मिटिंगमध्ये निकिता, शंतनू आणि दिशा रवी सहभागी झाले होते. या बैठकीला एमओ धालीवालही उपस्थित होते. 26 जानेवारीपूर्वीच ट्विटर स्टॉर्म तयार करण्याचा या बैठकीत निर्णय घेण्यात आला. पोलिसांच्या दाव्यानुसार या बैठकीला 60 ते 70 लोक उपस्थित होते.

पाच दिवसांची कोठडी

दिशा आणि निकिताच्या लॅपटॉपमधून काही आक्षेपार्ह माहितीही मिळाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. आतापर्यंत या प्रकरणात दिशा रवी, निकिता आणि शांतनू या तिघांचीच नावे समोर आली आहेत. दिशाला शनिवारी बेंगळुरूच्या सोलदेवनहल्ली येथून अटक करण्यात आली आहे. तिला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

पोलिसांचे दावे

पोलिसांच्या दाव्यानुसार, देशातील वातावरण बिघडवण्यासाठी दिशाने टूलकिट तयार केलं. पर्यावरणवादी ग्रेटा थनबर्गने हे टूलकिट डिलीट केलं होतं. पण दिशाने अनेकदा ते एडिट केलं. कोर्टाने तिला पोलीस कोठडी सुनावली. तेव्हा ती कोर्टात रडली आणि टूलकिटमधील दोन लाईन एडिट केल्याचं तिनं कबूल केलं. पोलिसांनी दिशाचा मोबाईल जप्त केला आहे. पण त्यातील डेटा आधीच डिलीट करण्यात आलेला आहे. पोलीस आता हा डेटा रिट्रीव्ह करणार आहे.

टूलकिट नेमकं काय आहे?

टूलकिट हे एक असं डॉक्युमेंट आहे, ज्यामध्ये आंदोलनादरम्यान सोशल मीडियावर समर्थन कसं मिळवावं, कोणते हॅशटॅग वापरावेत, आंदोलनावेळी जर काही अडचणी आल्या तर कुठे संपर्क करावा, आंदोलनावेळी काय करावं, काय करु नये असा सर्व कार्यक्रम या टूलकिटमध्ये सांगितला आहे. (delhi police team in beed to search shantanu muluk)

टूलकिट पहिल्यांदाच चर्चेत आलंय का?

अशाप्रकारचं टूलकिट पहिल्यांदाच वापरात आहे असं अजिबात नाही. गेल्यावर्षी अमेरिकेत पोलिसांनी एका कृष्णवर्णीयाची भररस्त्यात हत्या केली होती. त्यावेळी तिथे ‘ब्लॅक लाईफ मॅटर’ ही मोहीम सुरु झाली होती. भारतासह जगभरातील सेलिब्रिटींसह नागरिकांनी रंगभेदाविरोधात आवाज उठवला होता. हे आंदोलन किंवा मोहीम सुरु करणाऱ्यांनी टूलकिट बनवलं होतं. यामध्ये आंदोलनाबाबत सर्व माहिती दिली होती. जसे – आंदोलनात कसं सहभागी व्हावं, कोणत्या ठिकाणी जावं, कुठे जाऊ नये, पोलिसांनी कारवाई सुरु केली तर काय करावं? आंदोलनावेळी कपडे कोणते घालावेत, ज्यामुळे आंदोलन योग्य व्हावं, पोलिसांनी पकडलं तर काय करावं? आंदोलकांचे अधिकार काय, अशी सर्व माहिती होती. याशिवाय हाँगकाँगमध्ये चीनविरोधात जे आंदोलन सुरु होतं, त्यावेळीही अशा प्रकारचं टूलकिट वापरण्यात आलं होतं. (delhi police team in beed to search shantanu muluk)

संबंधित बातम्या:

Explainer : ग्रेटा थनबर्गने शेअर केलेलं टूलकिट नेमकं काय? ते काम कसं करतं?

Greta Thunberg | धमकीचा फरक पडत नाही, शेतकऱ्यांना पाठिंबा सुरूच राहील; ग्रेटाचं नवं ट्विट

कोण आहे दिशा रवी? पोलिसांकडून अटक का?; वाचा विशेष रिपोर्ट!

(delhi police team in beed to search shantanu muluk)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.