AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?; फडणवीसांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over konkan visit)

मोदी महाराष्ट्रात का आले नाही म्हणता, मग मुख्यमंत्र्यांचा दोनच जिल्ह्यांचा दौरा का?; फडणवीसांचा सवाल
देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
| Updated on: May 21, 2021 | 10:47 AM
Share

देवगड: पंतप्रधान नरेंद्र मोदी केवळ गुजरातमध्ये का गेले असा सवाल करता? मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केवळ दोनच जिल्ह्यात का आले? इतर जिल्ह्यात का जात नाही?, असा सवाल करतानाच मुख्यमंत्री केवळ बाता मारत आहेत, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over konkan visit)

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज देवगडमध्ये आहेत. देवगडमध्ये बंदरावर येऊन त्यांनी मच्छिमारांच्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांना हा टोला लगावला. मोदी गुजरातला गेले. ते गोवा आणि महाराष्ट्रात का गेले नाही? असा सवाल करण्यात येतोय. मग मुख्यमंत्रीही केवळ दोनच जिल्ह्यात का आले? वादळाचा फटका पुणे, कोल्हापूर, सातारा आणि सांगलीलाही बसला आहे. तिकडे मुख्यमंत्री का गेले नाहीत?, आम्हीही असाच सवाल करायचा का? असा सवाल करतानाच गेल्या वर्षी निसर्ग चक्रीवादळावेळी सरकारनेही काहीही मदत केली नाही. मुख्यमंत्री केवळ राजकीय स्टेटमेटं करत आहेत, अशी टीका फडणवीस यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा?

मुख्यमंत्री म्हणतात राजकारण करू नका आणि प्रत्यक्ष टीका करत आहेत. मला राजकीय बोलायचं नाही. पण मुख्यमंत्र्यांचा दौरा किती तासांचा आहे. केवळ तीन तासांचा दौरा आणि किती किलोमीटरचा दौरा हे मोजून सांगू का?, असा सवाल करतानाच पण मुख्यमंत्री आले हे ठिक आहे, असंही ते म्हणाले.

एनडीआरएफची टीम तैनात का केली नाही?

वादळाचा अॅलर्ट असतानाही देवगडमध्ये एनडीआरएफची टीम तैनात का ठेवण्यात आली नाही? असा सवालही त्यांनी केला. कोकणात प्रचंड नुकसान झालं आहे. त्याचे पंचनामे कधी होणार? नुकसानग्रस्तांना मदत कधी मिळणार? बोटींचाही पंचनामा झालेला नाही, असं सांगतानाच अधिकाऱ्यांनी केवळ कागदावर नुकसानीचे आकडे दाखवले आहेत. तेही अत्यंत कमी आकडे आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी प्रशासनावर जरब बसवली पाहिजे, असं त्यांनी सांगितलं.  (Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over konkan visit)

संबंधित बातम्या:

Maharashtra Coronavirus LIVE Update : सोलापुरात ग्रामीण भागात आजपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन

LIVE | उजनीचे पाणी पेटले, इंदापूरमध्ये एकाचवेळी रस्ता रोको आंदोलन

“मुंबई दिल्लीश्वरांना अडीच लाख कोटी देते, वादळग्रस्तांसाठी 2 हजार कोटी द्यायला काय हरकत आहे?”

(Devendra Fadnavis criticizes CM Uddhav Thackeray over konkan visit)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.