Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनाची माहिती लपवली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत

| Updated on: May 21, 2021 | 11:28 PM

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. | Corona Cases and Lockdown News LIVE

Maharashtra Coronavirus LIVE Update : कोरोनाची माहिती लपवली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत
MAHARASHTRA Corona

महाराष्ट्रात कोरोनाचा पुन्हा एकदा प्रकोप झालेला पाहायला मिळतोय. राज्यातल्या विविध शहरांत कोरोना रुग्णांच्या आकड्यांमध्ये चांगलीच वाढ झालेली पाहायला मिळतीय. राज्यातील प्रत्येक शहरात कोरोनाचा अक्षरक्ष: स्फोट होताना दिसतोय. त्यामुळे राज्यात आणखी कडक निर्बंध लावण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यासाठी राज्यात बुधवार दि. 14 एप्रिल 2021 पासून रात्री 8 वाजेपासून 15 मे 2021 पर्यंत लॉकडाऊन लावण्यात आला होता, आता राज्यातील अनेक शहरांमध्ये लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. | Corona Cases and Lockdown News LIVE

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 May 2021 10:54 PM (IST)

    कोरोनाची माहिती लपवली, सांगलीत एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्देवी अंत

    कोरोनामुळे एका घरातील तिघांचा मृत्यू, या कुटुंबाने कोरोना होऊनही माहिती लपवली होती, ते घरीच उपचार घेत होते, सांगली जिल्ह्यातील निरज तालुक्यातील टाकडी गावात संबंधित घटना घडली

  • 21 May 2021 09:46 PM (IST)

    कोरोनायोद्धा डॉक्टरची कोरोनामुळे मृत्यूशी झुंज सुरू, आर्थिक मदतीसाठी डॉक्टरच्या मित्रांचा सोशल मीडियावर टाहो

    औरंगाबाद :-

    कोरोनायोद्धा डॉक्टरची कोरोनामुळे मृत्यूशी झुंज सुरू

    लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तरुणावर औरंगाबादेत उपचार सुरू

    आर्थिक मदतीसाठी डॉक्टरच्या मित्रांचा सोशल मीडियावर टाहो

    औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांचीही मदतीसाठी पोस्ट

    राहुल पवार असं मृत्यूशी झुंज देणाऱ्या तरुणाचे नाव

    फ्रंटलाईन वर्कर्स असूनही उपचारावरील खर्चासाठी सरकारकडून दुर्लक्ष

    लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात करायचा आरोग्य सेवा

    आरोग्य सेवा करताना झाला होता कोरोनाचा संसर्ग

    आई-वडील ऊसतोड कामगार असल्यामुळे उपचारावरील खर्चासाठी मिळेनात पैसे

    रुग्णालयातील सहकाऱ्यांनी उपचारासाठी जमवले 2 लाख

    तर आतापर्यंत उपचारावर झाला 8 लाखांचा खर्च

    मदतीसाठी सोशल मीडियात पोस्ट व्हायरल

  • 21 May 2021 09:44 PM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1434 नवे कोरोनाबाधित

    सांगली कोरोना अपडेट -

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1434 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 35 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3115 वर

    सक्रीय कोरोना रुग्ण संख्या 13876 वर

    तर उपचार घेणारे 1376 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 89954 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 106945 वर

  • 21 May 2021 08:59 PM (IST)

    उस्मानाबाद जिल्ह्यात दिवसभरात 514 नवे रुग्ण, 8 जणांचा मृत्यू

    उस्मानाबाद कोरोना अपडेट :

    उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचे आज नवीन 514 रुग्ण व 08 मृत्यू तर 670 जणांना डिस्चार्ज

    उस्मानाबाद तालुका 113, तुळजापूर 61,उमरगा 45, लोहारा 39, कळंब 77, वाशी 77, भूम 71 व परंडा 31 रुग्ण

    1 मे - 667 रुग्ण - 19 मृत्यू 2 मे - 486 रुग्ण - 09 मृत्यू 3 मे - 814 रुग्ण - 13 मृत्यू 4 मे - 786 रुग्ण - 11 मृत्यू 5 मे - 783 रुग्ण - 07 मृत्यू 6 मे - 813 रुग्ण - 24 मृत्यू 7 मे - 660 रुग्ण - 08 मृत्यू 8 मे - 628 रुग्ण - 11 मृत्यू 9 मे - 712 रुग्ण - 08 मृत्यू 10 मे - 833 रुग्ण - 14 मृत्यू 11 मे - 676 रुग्ण - 11 मृत्यू 12 मे - 569 रुग्ण - 13 मृत्यू 13 मे - 623 रुग्ण - 08 मृत्यू 14 मे - 458 रुग्ण - 15 मृत्यू 15 मे - 607 रुग्ण - 12 मृत्यू 16 मे - 492 रुग्ण - 09 मृत्यू 17 मे - 547 रुग्ण - 07 मृत्यू 18 मे - 400 रुग्ण - 11 मृत्यू 19 मे - 449 रुग्ण - 08 मृत्यू 20 मे - 534 रुग्ण - 11 मृत्यू 21 मे - 514 रुग्ण - 08 मृत्यू

    उस्मानाबाद जिल्ह्यात सध्या 4582 सक्रिय रुग्ण

    उस्मानाबाद - 2 लाख 73 हजार 247 नमुने तपासले त्यापैकी 51 हजार 400 रुग्ण सापडले, रुग्ण सापडण्याच दर 18.81 टक्के

    45 हजार 659 रुग्ण बरे 88.83 टक्के रुग्ण बरे होण्याचा दर

    रुग्णांचा मृत्यू 1159 तर 2.25 टक्के मृत्यू दर

  • 21 May 2021 08:57 PM (IST)

    नाशिक जिल्ह्यात दिवसभरात 955 नवे कोरोनाबाधित रुग्ण

    नाशिक :

    आज पूर्ण बरे झालेले रुग्ण- 2394

    आज पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ - 955

    नाशिक मनपा- 468 नाशिक ग्रामीण- 465 मालेगाव मनपा- 022 जिल्हा बाह्य- 00

    नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू - 4280

    आज रोजी कळविण्यात आलेले एकूण मृत्यु -46 नाशिक मनपा- 25 मालेगाव मनपा- 00 नाशिक ग्रामीण- 21 जिल्हा बाह्य- 00

  • 21 May 2021 08:12 PM (IST)

    पुण्यात दिवसभरात तब्बल 973 नवे कोरोनाबाधित, 63 रुग्णांचा मृत्यू

    पुणे : - दिवसभरात ९७३ पाझिटिव्ह रुग्णांची वाढ. - दिवसभरात २४९६ रुग्णांना डिस्चार्ज. - पुण्यात करोनाबाधीत ६३ रुग्णांचा मृत्यू. २२ रूग्ण पुण्याबाहेरील. - १३१५ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. - पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६४०७६. - पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १३४७९. - एकूण मृत्यू -७९२८. -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४२६६९. - आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- ११६७६

  • 21 May 2021 08:09 PM (IST)

    राज्यात दिवसभरात 29 हजार 644 नवे कोरोनाबाधित, 555 रुग्णांचा मृत्यू

    राज्यात दिवसभरात 29 हजार 644 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 555 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. तसेच राज्यात दिवसभरात 44 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली.

  • 21 May 2021 07:50 PM (IST)

    नागपुरात दिवसभरात 1000 नवे कोरोनाबाधित, 33 रुग्णांचा मृत्यू

    नागपूर :

    नागपुरात आज 3159 जणांनी केली कोरोनावर मात

    1000 नवीन कोरोना रुग्णांची नोंद

    तर 33 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्णसंख्या - 468931

    एकूण बरं होणाऱ्यांची संख्या - 443159

    एकूण मृत्यूसंख्या - 8718

  • 21 May 2021 06:27 PM (IST)

    नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे 29 रुग्ण

    नवी मुंबईत म्युकरमायकोसिसचे 29 रुग्ण आढळले
    तेरणा - 10, MGM वाशी - 1, अपोलो 9, रिलायन्स  1, डी वाय पाटील - 5 , हीरानंदनी फोर्टिस- 1, साई स्नेह दीप, Mgm बेलापूर - 1
    त्यातील 14 रुग्ण नवी मुंबई मनपा हद्दीतील
    उर्वरित 15 रुग्ण हे नवी मुंबई बाहेरचे आहेत
    आतापर्यंत 4 जणांचा मृत्यू झाला असून 3 जणांना दुसऱ्या दवाखान्यात उपचारार्थ शिफ्ट केले आहे
    तर 5 लोकांना आतापर्यंत उपचार करून घरी पाठवण्यात आले
    नवी मुंबईतील खाजगी हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहेत
    या मधील 35 टक्के रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचा दावा  प्रश्नासना कडून करण्यात येत आहे
     10 मे च्या नंतर हे रूग्ण आढळून आले
  • 21 May 2021 06:25 PM (IST)

    रोहित पवारांच्या अॅग्रो संस्थेकडून केडीमसीला सहा ऑक्सीजन कॉन्सट्रेटर

    राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो या संस्थेकडून केडीएमसीला सहा ऑक्सीनज कॉसंटट्रेर देण्यात आले आहेत. हे ऑक्सीजन कॉसंटेट्रर देण्यासाठी राष्ट्रवादीचे पंधरा ते वीस कार्यकर्ते महापालिका कार्यालयात जमले होते. कार्यकर्ते जास्त असल्याने केडीएमसी आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी कार्यकर्त्यांची भेट नाकारली. रोहित पवार यांच्या प्रतिनिधीकडून हे कॉसंटेट्रर महापालिका आयुक्तांना सूपूर्द करण्यात आले.

  • 21 May 2021 06:18 PM (IST)

    वाशिम जिल्ह्यात दिवसभरात 382 नवे रुग्ण, 9 रुग्णांचा मृत्यू 

    वाशिम कोरोना रिपोर्ट :

    जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक

    जिल्ह्यात आज 09 रुग्णांचा मृत्यू

    नवे 382  रुग्ण आढळले

    तर 428 जणांना देण्यात आला डिस्चार्ज

    जिल्ह्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मागील 7 दिवसात 37 रुग्णांचा मृत्यू झाला तर नवे 2974 कोरोना रुग्ण आढळलेत तर या दरम्यान 3420 कोरोनामुक्त झाले

    जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेले एकूण पॉझिटिव्ह रुग्ण – 37659

    सद्यस्थितीत सक्रिय रुग्ण – 4046

    आतापर्यंत डिस्चार्ज दिलेले रुग्ण – 33219

    आतापर्यंत एकूण मृत्यू – 393

  • 21 May 2021 05:20 PM (IST)

    राज ठाकरेंच्या पाठपुराव्याला यश, राज्यात चित्रीकरणाला मुख्यमंत्र्यांनी दिली तत्त्वत: मान्यता

    मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुरुवारी (२० मे) मनोरंजन क्षेत्रातील मान्यवरांसोबत झालेल्या चर्चेनंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी दूरध्वनीवरुन चर्चा केली. मराठी मनोरंजन क्षेत्रासमोर अनेक समस्या आहेत, पण सध्या राज्यात चित्रीकरण पुन्हा सुरु होणं हे महत्त्वाचं आहे. टीव्ही मालिकांचं चित्रीकरण इतर राज्यात सुरु आहे. मालिका निर्माते आणि वाहिन्यांचे प्रमुख यांनी जर कडक निर्बंध पाळून, बायो बबलमध्ये चित्रीकरण कसं करणार यासंदर्भातला प्रस्ताव दिला तर त्यांना मंजुरी देता येईल, असं ठोस आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्याचं राज ठाकरेंनी आज जाहीर केलं.

  • 21 May 2021 05:16 PM (IST)

    पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करा : अमृता फडणवीस

    अमृता फडणवीस : पत्रकारांना फ्रंटलाईन वर्कर म्हणून घोषित करण्यात यावं त्यांना प्रवासांचे पासेस मिळायला हवे प्रत्येक व्यक्तीने लस घ्यायला हवी लशीची कमतरता आहे, 15 ते 20 दिवसात लस उपब्लध होईल मी स्वत: लवकरच लस घेणार आहे कलाकारांकडे आपण लक्ष द्यायला हवं सर्व गोष्टी करायला पाहिजे. सरकार करत नसेल तर त्यांना सत्तेवर राहायाचा अधिकार नाही कोव्हिशिल्डचं प्रोडक्शन लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे लस प्राधान्याने घेणं गरजेचं आहे धारावी जनतेची शक्तीशालीरित्या कोरोनाशी झुंज धारावी लोकांना एकत्रित येवून निमयाचं पालनं केलं त्यामुळे कोरोना आटोक्यात

  • 21 May 2021 05:12 PM (IST)

    पालकांची चिंता वाढवणारी बातमी, अहमदाबादेत 13 वर्षीय मुलाला म्युकरमायकोसिसची लागण

    अहमदाबाद : पालकांची चिंता वाढवणारी बातमी अहमदाबादमध्ये 13 वर्षीय मुलाला म्युकरमायकोसिसची लागण चांदखेडा येथील खाजगी रूग्णालयात आँपेरशन करण्यात आलं 13 वर्षीय मुलगा आधी कोरोनाने संक्रमित झाला होता कोरोनातून बरा झाल्यानंतर म्युकरमायकोसिस आजाराची लागण

  • 21 May 2021 04:57 PM (IST)

    गोंदियात 62 वर्षीय महिलेला एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस, गिधाडी येथील लसीकरण केंद्रावरील प्रकार

    गोंदिया : गोंदियात 62 वर्षीय महिलेला एकाच दिवशी कोविशिल्डचे दोन डोस दिल्याचा वृद्ध महीलेचा आरोप, पहिला डोस दहा मिनिटाच्या अंतराने दोन वेळा दिला, गोरेगाव तालुक्यातील गिधाडी येथील लसीकरण केंद्रावरील प्रकार, 62 वर्षीय महिलेची प्रकृती स्थिर

  • 21 May 2021 03:18 PM (IST)

    वर्ध्यात आतापर्यंत 34 म्युकर मायकोसिसचे रुग्ण 

    वर्धा : आधीच कोरोनाने हैराण असलेल्या वर्धेकरांना आणखी एका आजाराचा सामना करावा लागत आहे. नागपूर, अमरावती, चंद्रपूर नंतर वर्ध्यातही म्युकर मायकोसिसचे रुग्ण आढळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 34 रुग्ण आढळले आहे. यापैकी 13 रुग्ण सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात  भरती असून  8 रुग्णांवर शस्त्रक्रिया झाली आहे आणि ते बरे आहेत. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सचिन तडस यांनी सांगितले, वर्धा जिल्ह्यात एवढ्या मोठ्या संख्येने रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहेय. वैद्यकीय सूत्रांनुसार, हा बुरशीपासून होणारा दुर्मिळ पण अत्यंत घातक संसर्ग आहे. यातून डोळे गमावल्याचे प्रकरण समोर आले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर या आजाराची उद्रेक वाढण्याची शक्यता आहे. कोरोना होऊन गेलेल्या लोकांना हा आजार होण्याची शक्यता बळावली आहे. रोगप्रतिकारक शक्ती हे याचे मुख्य कारणही आहे. म्युकर मायकोसिसचा इंजेक्शनचा सध्या तुटवडा नाही.
  • 21 May 2021 03:14 PM (IST)

    ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जूनपर्यंत मोफत, मुख्यमंत्र्यांचा गोरगरीब जनतेला दिलासा

    ब्रेक द चेन अंतर्गत शिवभोजन थाळी आता 14 जून पर्यंत मोफत

    मुख्यमंत्र्यांनी दिला गोरगरीब जनतेला दिलासा

    राज्यात ४८ लाखांहून अधिक नागरिकांनी घेतला नि:शुल्क जेवणाचा लाभ

    योजनेअंतर्गत आतापर्यंत ४ कोटी २७ लाख ८१ हजार ३०६ थाळयांचे वितरण

  • 21 May 2021 03:11 PM (IST)

    रिलायन्स पेट्रोलपंप मार्फत प्रत्येक रुग्णवाहिकेला दर दिवशी काही लिटर डिझेल मोफत

    भंडारा :  देशात कोरोनाची लाट सुरू असताना रुग्णांना रुग्णालयामध्ये नेण्यासाठी काही रुग्णवाहिका चालक मोठया प्रमाणावर पैसे घेत असल्याने सामान्य नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे रिलायन्स पेट्रोल पंप मार्फत प्रत्येक रुग्णवाहिकेला दर दिवशी 50 लिटर डिझेल मोफत देणार आहे, याची सुरुवात संपूर्ण देश भर आज करण्यात आली आहे. भंडारा जिल्ह्यात खासदार सुनील मेंढे व विधान परिषद आमदार परीणय फुके यांनी हिरवी झेंडी देत या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

  • 21 May 2021 02:45 PM (IST)

    अहमदनगरात कोरोना रुग्णाचा मृत्यू, नातेवाईकांची डॉक्टरला मारहाण, ICU विभागाची तोडफोडही केली

    अहमदनगर -

    कोरोना रुग्णाचा मृत्यू झाल्याने नातेवाईकांनी घातला हॉस्पिटल मध्ये गोंधळ...

    हॉस्पिटल मधील ICU विभागाची तोडफोड करून डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना केली मारहाण...

    अहमदनगर मधील सिटी केअर हॉस्पिटल मधील घटना...

    मारहाणीत 1 डॉक्टर जखमी...

    तोफखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल...

  • 21 May 2021 02:39 PM (IST)

    रिलायन्स पेट्रोल पंपमार्फत प्रत्येक रुग्णवाहिकेला दर दिवशी 50 लिटर डिझेल मोफत

    भंडारा -

    देशात कोरोनाची लाट सुरू असताना रुग्णांना रुग्णालया मध्ये नेण्यासाठी रुग्णवाहिका मोठया प्रमाणावर पैसे घेत असताना सामान्य नागरिकांची लूट होत आहे

    त्यासाठी आज रिलायन्स पेट्रोल पंप मार्फत प्रत्येक रुग्णवाहिकेला दर दिवशी 50 लिटर डिझेल मोफत देणार आहे, याची सुरुवात संपुर्ण देश भर आज करण्यात आली आहे

    भंडारा जिल्ह्यात खासदार सुनील मेंढे आणि विधान परिषद आमदार परीणय फुके यांनी हिरवी झेंडी देत या उपक्रमाची सुरूवात केली आहे.

  • 21 May 2021 01:58 PM (IST)

    रायगड जिल्ह्यातील एका म्युकरमायकोसिस रुग्णाचा मृत्यू

    रायगड -

    जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचा पहिला बळी

    पनवेलमधील पुरुष रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू

    पनवेलच्या खाजगी रुग्णालयात सुरु होते उपचार

    रायगडमध्ये आतापर्यंत म्युकर मायकोसिसचे आढळले 3 रुग्ण

    1 महिला व 1 पुरुष रुग्णावर उपचार सुरू

    राज्यसरकारकडून अम्फोटेरिसिमबीच्या 70 इंजेक्शन्सचा पुरवठा

    कोणतेही फगंस टाळण्याकरीता घरगुती कपडी मास्क ला स्लच्छ धुवुन पुर्ण कोरडा होईपर्यंत सुकवून वापरावे.

    पावसाळी दिवसात ओला मास्क जास्त वापरु नये. याची काळजी घेणे आवश्यक.

    - निधी चौधरी, जिल्हाधिकारी

  • 21 May 2021 01:21 PM (IST)

    लॉकडाऊनच्या काळात मागच्या दरवाजाने कापड दुकानात खेरदी विक्री, औरंगाबाद पोलिसांची दुकानावर धाड

    औरंगाबाद -

    लॉकडाऊनच्या उल्लंघणाची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

    औरंगाबादचे पोलीस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी टाकली कापड दुकानावर धाड

    औरंगाबाद शहरातील सर्वात मोठ्या कापड दुकानावर धाड

    राज क्लॉथ सेंटरवर जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांनी केली कारवाई

    लॉकडाऊनच्या काळातही मागच्या दरवाज्याने सुरु होते राज क्लॉथ सेंटर

    पाच मजली पंचतारांकित दुकानात शेकडो ग्राहक करायचे खरेदी

    लॉक डाऊन सुरू असतानाही सुरू होती जोरात कपड्यांची विक्री

    वरीष्ठ अधिकाऱ्यांची रेड पडताच सेल्समनसह ग्राहकांनी केला पोबारा

    काही ग्राहक तर काही कर्मचाऱ्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात

    राज क्लॉथ सेंटर हे औरंगाबाद शहरातील सर्वात मोठं कापड दुकान

  • 21 May 2021 12:53 PM (IST)

    तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता - डॅा. वसंत खळतकर

    डॅा. वसंत खळतकर, मुलांच्या चाचणीचे प्रमुख -

    - तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर जास्त परिणाम होण्याची शक्यता

    - कोव्हॅक्सीनच्या लसीची लहान मुलांवर चाचणी

    - इथीकल कमेटीची परवानगी मिळाल्यानंतर स्वयंसेवक मुलांची नोंदणी होणार

    - २ ते १८ वर्षीच्या वयोगटातील मुलांची चाचणी होणार

    - दोन ते सहा, सहा ते १२ आणि १२ ते १८ या तीन गटात चाचणी होणार

    - मुलांमध्ये नाराद्वारे चाचणी होणार नाही

    - मसलमध्ये ( हाताला) लस दिली जाणार

    - लहान मुलांच्या आई- वडीलांची परवानगी घेतली जाणार

    - पहिला डोज दिल्यानंतर २८ दिवसांनी दुसरा डोज देणार

    - सहा ते सात महिने लसीची चाचणी चालणार

  • 21 May 2021 12:08 PM (IST)

    कर्नाटकला कोविशील्डचे 2 लाख डोज मिळणार

    कर्नाटकला कोविशील्ड लशीचे 2 लाख डोज मिळणार

  • 21 May 2021 11:32 AM (IST)

    जालन्यात विनाकारण प्रवास करणाऱ्यांची अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे

    जालना जिल्ह्यातील वाटूर फाटा येथे महामार्गावर विनाकारण प्रवास करणाऱ्यांची पोलीस आणि आरोग्य विभागाकडून अँटिजेन टेस्ट करण्यात येत आहे

    आतापर्यंत 120 वाहन धारकांची टेस्ट करण्यात आली आहे

    या अँटिजेन टेस्टमध्ये दोन जणांची अँटिजेन टेस्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांना जवळच्या कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आले आहे

  • 21 May 2021 10:57 AM (IST)

    सांगलीच्या कडेगावात एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू

    सांगली -

    कोरोनाने कडेगावच्या तोंडोली येथील एकाच कुटुंबातील चौघांचा कोरोनाने मृत्यू

  • 21 May 2021 10:34 AM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात

    -  उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत कोरोना आढावा बैठकीला सुरुवात,

    - बैठकीला जिल्हाधिकारी, महापौर दोन्ही महापालिकेचे आयुक्त उपस्थित,

    - बैठक संपल्यावर अजित पवार मीडियाशी बोलणार आहेत

  • 21 May 2021 09:57 AM (IST)

    गेल्या 24 तासांत भारतात 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

    गेल्या 24 तासांत भारतात 2 लाख 59 हजार 591 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे

    तर 4 हजार 209 रुग्णांना प्राण गमवावे लागले

    कालच्या दिवसात देशात 3 लाख 57 हजार 295 जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले

    देशातील कोरोना रुग्ण आकडेवारी

    देशात 24 तासात नवे रुग्ण – 2,59,591

    देशात 24 तासात डिस्चार्ज – 3,57,295

    देशात 24 तासात मृत्यू – 4,209

    एकूण रूग्ण – 2,60,31,991

    एकूण डिस्चार्ज – 2,27,12,735

    एकूण मृत्यू – 2,91,331

    एकूण अॅक्टिव्ह रुग्ण – 30,27,925

    आतापर्यंत लसीकरण झालेली संख्या – 19,18,79,503

  • 21 May 2021 09:28 AM (IST)

    सोलापुरात ग्रामीण भागात आजपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन

    सोलापूर - ग्रामीण भागात आजपासून दहा दिवस कडक लॉकडाऊन

    कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने 21 मे 1 जून या कालावधीत कडक लॉकडाऊन

    अत्यावश्यक सेवा म्हणून फक्त कृषीविषयक दुकाने व दूध वितरण करण्यास परवानगी

    किराणा दुकानासह सर्व दुकाने कार्यालये बंद ठेवण्याचे जिल्हा अधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

    ग्रामीण भागात रोज सरासरी 1800 ते 2000 हजार रुग्ण येत आहे आढळून

    माळशिरस, पंढरपूर ,सांगोला, करमाळा तालुका आहेत कोरोनाचे हॉटस्पॉट

  • 21 May 2021 09:07 AM (IST)

    औरंगाबाद शहरात म्युकरमायकोसिसचे 200 च्यावर रुग्ण, तर दुसरीकडे औषधींचा मोठा तुटवडा

    औरंगाबाद -

    शहरात म्युकरमायकोसिसचे 200 च्यावर रुग्ण तर दुसरीकडे औषधींचा मोठा तुटवडा

    म्युकरमायकोसिसचे औषधी नसल्याने नातेवाईक आणि आरोग्य विभाग हतबल

    अँमफोटेरिसिन बी ची मागणी हजारात मात्र उपलब्ध होतात फक्त चाळीस ते पन्नास

    म्युकरमायकोसिसच्या आजाराला कमी करण्यासाठी औषधीच नाहीत

    इंजेक्शन उपलब्ध व्हावेत यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांचा खटाटोप, मात्र हाती निराशाच

    आरोग्य विभागापुढे मोठे आव्हान, तर रुग्णांच्या नातेवाईकांची वाढली चिंता

  • 21 May 2021 09:05 AM (IST)

    नागपूर कारागृहात आणखी सहा कैदी झाले कोरोनाबाधित

    नागपूर -

    नागपूर कारागृहात आणखी सहा कैदी झाले कोरोनाबाधित

    यात पाच महिला कैद्यांचा समावेश

    बुधवारी 55 महिला आणि 53 पुरुष कैद्यांची करण्यात आली होती चाचणी

    यात रात्री 6 जणांचा रिपोर्ट आला पॉझिटिव्ह

    त्यांच्या वर जेल मधेच उपचार सुरु आहे

  • 21 May 2021 08:47 AM (IST)

    नाशकात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी दिला दंडुक्याचा प्रसाद

    नाशिक - रस्त्यावर विनाकारण फिरणार्यांना पोलिसांनि दिला दंडुक्याचा प्रसाद

    शहरात लोक डाऊन असताना विना मास्क फिरत होते रस्त्यावर

    पोलिसांनी एम जी रोड, पंचवटी, परिसरात केली कारवाई

    आता पर्यंत पोलिसांकडून कारवाई पोटी 10 लाख 32 हजार रुपयांचा दंड वसूल

  • 21 May 2021 08:43 AM (IST)

    2022 पर्यंत सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे - अजित पवार

    अजित पवार -

    - काळा दिवस म्हणून आपण पाळला,

    - राजीव गांधी यांना संगणक युग सुरु करण्याचे श्रेय त्यांना जातंय,

    - युवकांना विकासात सहभागी करुन घेतलं,

    - मी सकाळी कार्यक्रम घेतला म्हणून काहींची अडचण झाली असेल,

    - सरकारी कार्यक्रम एवढ्या सकाळी होत नाही,

    - महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यावर अनेक लॉटरी आपण काढल्या आहेत,

    - आजच्या लोटरीत ज्यांना घर लागणार नाही त्यांनी निराश होऊ नका,

    - पुढच्या टप्प्यात आपण 6309 घरांची लॉटरी काढणार आहोत,

    - 2022 पर्यंत सर्वांचे घरांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे

    - पिंपरीशी माझं वेगळ्या प्रकारचं नातं आहे

  • 21 May 2021 08:40 AM (IST)

    मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पावसाळ्यापुर्वीच्या कामाला सुरुवात

    - मुंबईच्या बीकेसी कोव्हिड जम्बो वॅक्सिनेशन सेंटरमध्ये पावसाळ्यापुर्वीच्या कामाला सुरुवात

    - तौक्ते चक्रीवादळामुळे बीकेसी कोव्हिड सेंटरमध्ये मंडप उभारणीला सुरुवात झालीये

    - सुरक्षेच्या कारणास्तव हा मंडप काढण्यात आला होता आत्ता पुन्हा हा मंडप बांधला जातोय

    - आज वयवर्ष ४५ च्या वरील लोकांना दिली जाणार लस

    - कोव्हिशिल्डचा पहिला आणि दुसरा डोज मिळेल, २०० डोज ऊपलब्ध

    - कोव्हॅक्सिनचे १०० डोज मिळणार, ४५ चा वरील लोकांना दुसरा डोज मिळेल

    - १० ते ३ वाजेपर्यंतच होणार वॅक्सिनेशन

    - सोमवार मंगळवार बुधवारी लसीकरण हे वाॅर्डमध्ये वाॅक इन स्वरुपात होणार

    - गुरुवार, शुक्रवार, शणिवार को विन ऐपमध्ये रजिस्टर झालेल्यांनाच, मेसेज आलेल्यांनाच लसीकरण होणार

    - रविवारी लसीकरण बंद राहील

    - दिव्यांगांचंही लसीकरण होणार

  • 21 May 2021 08:35 AM (IST)

    सहायक महापालिका आयुक्त सोनकांबळे यांचा कोराेनामुळे मृत्यू

    ढोलेपाटील क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक महापालिका आयुक्त दयानंद सोनकांबळे यांचे कोरोनामुळे गुरूवारी रात्री मृत्यू झाला

    काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते

    ताडीवाला रोड परिसरात राहून सोनकांबळे यांनी अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले होते

    महापालिकेत नोकरी करीत असताना ते सहायक आयुक्त पदापर्यंत पोहचले होते

    ते मनमिळाऊ व शांत स्वभावाचे अधिकारी म्हणून सर्वांच्या परिचयाचे होते

    गेल्या वर्षी कोरोनाच्या संसर्गात त्यांनी अनेक लोकोपयोगी कामे केली होती

    त्यांच्या पश्‍चात पत्नी व दोन मुले आहेत

  • 21 May 2021 08:09 AM (IST)

    लॉकडाऊन दरम्यान पोलिसांच्या ई-पासद्वारे 12 हजार नागरिकांनी केला प्रवास

    नागपूर -

    लॉकडाऊन दरम्यान पोलिसांच्या ई-पासद्वारे 12 हजार नागरिकांनी केला प्रवास

    यात सर्वात जास्त 4 हजार इ- पास परिमंडळ चार मधून देण्यात आल्या

    तर तब्बल 14 हजार पेक्षा जास्त नागरिकांचा इ - पास रद्द करण्यात आला

    कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलिसांनी कडक लॉक डाऊन लावलं

    आणि त्याची अंमलबजावणी सुद्धा कडक केली

  • 21 May 2021 08:08 AM (IST)

    जेवताना सतत रडते म्हणून सावत्र पित्याने केला मुलीचा खून, औरंगाबादेतील धक्कादायक घटना

    औरंगाबाद -

    जेवताना सतत रडते म्हणून सावत्र पित्याने केला मुलीचा खून

    खून करुन दीड वर्षीय चिमुकलीला पुरले जमिनीत

    गंगापूर तालुक्यातील अंतापूर गावातली घटना

    पोलिसांनी दीड वर्षीय चिमुकलीचा मृतदेह काढला बाहेर

    14 वर्षीय सावत्र पित्याने 20 वर्षीय महिलेशी केले होते लग्न

    घटनेनंतर मुलीच्या आईने दिराच्या मुलीला घेऊन केलाय पोबारा

    14 वर्षीय सावत्र पित्याला पोलिसांनी घेतले ताब्यात

  • 21 May 2021 07:57 AM (IST)

    सांगलीतील कडेगाव तालुक्यातील तोडोलीत कोरोनाने अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

    सांगली -

    जिल्ह्यातील कडेगाव तालुक्यातील तोडोलीत कोरोनाने अवघ्या 15 दिवसात एकाच कुटुंबातील 4 जणांचा मृत्यू

    या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे

    2 करती मुले आणि आई वडील याचा दुर्दैवी मृत्यू

    आई वैजयता सुखदेव मोहिते वय 75 या कोरोना पोजिटिव्ह झाले त्याचा कराड येथे उपचारा साठी नेत असताना रस्त्यातच 30 एप्रिल ला मृत्यू

    नंतर वडील सुखदेव पांडुरंग मोहिते वय 80 याना कोरोना ची बाधा त्याना उपचारासाठी बेड मिळाला नाही त्यामुळे 6 मे ला घरातच मृत्यू

    यातून सावरत असताना च मोठा मुलगा अशोक मोहिते वय58 हे पोजिटिव्ह झाले तेयचा कडेगाव कोविड सेंटर ला उपचारा दरम्यान 15 मे ला मृत्यू

    आणि शेवटी या सर्वांना मदत करणारा अनिल मोहिते हा लहान मुलगा वय 47 हा पोजिटिव्ह झाला याचा 16 मे ला विटा येथे उपचारा दरम्यान मृत्यू

    मोहिते कुटुंबातील 15 दिवसात 4 जणांचा मृत्यू झाला

    अशोक याच्या पश्चात पत्नी 2 मुली 1 मुलगा तर अनिल याच्या पच्यात 3 मुली आहेत

    15 दिवसात या मुलांच्या डोके वरील वडिलांचे छत्र हरवले

    या नंतर मोहिते याचे शेजारी बबन गोरड याचा ही कोरोना ने मिरज येथे उपचारा दरम्यान मृत्यू

    संपूर्ण गावावर या घटनेने शोककळा पसरली आहे

  • 21 May 2021 07:25 AM (IST)

    मलेशिया मराठी मंडळाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना दोन ऑक्सिजन काँसंट्रेटर प्रदान

    पिंपरी-चिंचवड -

    - मलेशिया मराठी मंडळाकडून पिंपरी चिंचवड पोलिसांना दोन ऑक्सिजन काँसंट्रेटर प्रदान तर क्रीडाई संस्थेचे अनिल फरांदे यांच्याकडून 5 व्हेंटिलेटर प्रदान

    - पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील कोरोनाबाधीत पोलिसांना व्हेंटिलेटर ची उणीव भासू नये यासाठी 5 व्हेंटिलेटर

    - तर खालावलेली ऑक्सिजन पातळी वाढविण्याच्या दृष्टीने मलेशिया मराठी मंडळाचे गजानन डोईजोड यांच्याकडून तीन ऑक्सिजन काँसंट्रेटर देण्यात आले. या ऑक्सिजन काँसंट्रेटरची क्षमता एक ते सात लिटर आहे.

  • 21 May 2021 07:13 AM (IST)

    कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत पुणे शहरासह जिल्ह्य़ातील नागरिक बाधित होण्याचे प्रमाण जास्त

    पुणे -

    - कोरोनाच्या पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत शहरासह जिल्ह्य़ातील नागरिक बाधित होण्याचे प्रमाण जास्त,

    - बाधितांचे प्रमाण 4.2 टक्क्यांनी जास्त असल्याचे निदर्शनास,

    - पहिल्या लाटेत बाधित होण्याचा दर 19.4 टक्के , तर दुसऱ्या लाटेत हाच दर 23.6 टक्के एवढा होता,

    - तसेच 31 ते 40 वयोगटातील तब्बल २६ टक्के नागरिक दुसऱ्या लाटेत बाधित झाले असून मृत्युदर मात्र पहिल्या लाटेच्या तुलनेत 0.9 टक्क्यांनी कमी झाला आहे,

    - पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांमधील करोना संसर्गाची दुसरी लाट ओसरू लागली आहे,

    - उर्वरित ग्रामीण भागातील रुग्णसंख्याही कमी होत आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

    - त्यानुसार पहिल्या लाटेत 16 लाख 31 हजार 129 आरटीपीसीआर आणि अँटिजेन चाचण्या करण्यात आल्या,

    - त्यामध्ये एक लाख 13 हजार 717 नागरिक बाधित झाले,

    - दरम्यान दुसऱ्या लाटेत 11 लाख 79 हजार 249 दोन्ही प्रकारच्या चाचण्या करण्यात आल्या,

    - त्यामध्ये दोन लाख 89 हजार 854 नागरिक बाधित झाले

  • 21 May 2021 07:10 AM (IST)

    नागपुरात बाहेर फिरणाऱ्या 10 हजार रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी

    - नागपुरात बाहेर फिरणाऱ्या 10 हजार रिकामटेकड्यांची कोरोना चाचणी

    - शहरात विनाकारण फिरणारे 450 कोरोना पॅाझिटीव्ह

    - 450 पॅाझिटिव्ह रुग्णांची 14 दिवसांसाठी क्वॅारंटाईन सेंटरमध्ये रवानगी

    - नागपूर शहरात ठिकठिकाणी ॲान दी स्पॅाट कोरोना चाचणी

    - नागपूरात आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या 38054 जणांना दंड

    - विनामास्क कारवाईत मनपाने आतापर्यंत वसूल केला 1 कोटी 73 लाखांचा दंड

  • 21 May 2021 07:02 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं वाढतं संकट

    - नागपूर जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचं वाढतं संकट

    - जिल्ह्यातील रुग्णसंख्या 290 वर, आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू

    - म्युकरमायकोसfसवर उपचाराचा आठ लाख रुपये खर्च

    - महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून तोकडी मदत

    - म्युकरमायकोसीसच्या आजारासाठी टास्क फोर्स स्थाापन

    - जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांचा निर्णय

  • 21 May 2021 07:00 AM (IST)

    आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयास 13 व्हेंटिलेटर प्रदान

    पुणे -

    - आंबेगाव तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांसाठी मंचर उपजिल्हा रुग्णालयास 13 व्हेंटिलेटर प्रदान

    - तालुक्यातील दानशूर व्यक्ती कडून आणि विविध सेवाभावी संघटना,कंपनी यांच्या कडून हे 13 व्हेंटिलेटर मंचर उपजिल्हा रुग्णालयास प्रदान करण्यात आले

    - उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,जुन्नर,खेड,शिरूर भागातील नागरिकांना ह्याचा उपयोग होणार

  • 21 May 2021 07:00 AM (IST)

    राज्य सरकारकडून गुरुवारी पुणे महापालिकेला लसीचा पुरवठा न झाल्याने शहरातील आज सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार

    पुणे -

    - राज्य सरकारकडून गुरुवारी पुणे महापालिकेला लसीचा पुरवठा न झाल्याने शहरातील आज सर्व लसीकरण केंद्रांवरील लसीकरण बंद राहणार,

    - राज्य शासनाकडून प्राप्त झालेल्या साडेसात हजार लसीच्या पुरवठ्यामुळे, पुणे महापालिकेकडून बुधवारी लसीकरण सुरू करण्यात आले़ होते,

    - मात्र या दिवशी ८४ दिवसांच्या नियमामुळे अनेकांना लस घेता आली नाही परिणामी पालिकेकडे सुमारे ६ हजार ५६५ डोस शिल्लक राहिलेत

    - यामुळे गुरुवारी शहरातील मोजक्या लसीकरण केंद्रांवर लसीकरण सुरू करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता.

  • 21 May 2021 06:39 AM (IST)

    नागपूरला मोठा दिलासा, मृत्यूचं प्रमाण कमी, बधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपूर :

    आज नागपूरला मोठा दिलासा, कोरोना मृत्यूचं प्रमाण झालं कमी, तर बधितांच्या तुलनेत बरं होणाऱ्यांची संख्या जास्त

    नागपूर जिल्ह्यात आज 3405 जणांनी केली कोरोनावर मात

    1151 नवीन रुग्णांची नोंद

    तर 28 जणांचा कोरोनामुळे मृत्यू

    एकूण रुग्ण संख्या – 467931

    एकूण बरं होणाऱ्यांची सांख्य – 440000

    एकूण मृत्यू संख्या – 8685

  • 21 May 2021 06:38 AM (IST)

    पुण्यात गेल्या 24 तासांत 931 नागरिकांना कोरोनाची लागण, 66 जणांचा मृत्यू

    पुणे :

    – गेल्या 24 तासांत ९३१ पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ

    – गेल्या 24 तासांत १०७६ रुग्णांना डिस्चार्ज

    – पुण्यात करोनाबाधीत ६६ रुग्णांचा मृत्यू, २४ रूग्ण पुण्याबाहेरील

    – १३२८ क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत

    – पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ४६३१०३

    – पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्ण संख्या- १५०४३

    – एकूण मृत्यू -७८८७

    -आजपर्यंतचे एकूण डिस्चार्ज ४४०१७३

    – आज केलेल्या नमुन्यांची (स्वॅब) तपासणी- १२२२६

  • 21 May 2021 06:35 AM (IST)

    सांगली जिल्ह्यात दिवसभरात 1304 नवे कोरोनाबाधित, 34 रुग्णांचा मृत्यू

    सांगली कोरोना -

    जिल्ह्यात आज दिवसभरात 1304 कोरोना रुग्ण

    जिल्ह्यात आज कोरोनामुळे 34 रुग्णांचा मृत्यू

    जिल्ह्यातील कोरोनाचा मृत्यूचा आकडा 3080 वर

    ऍक्टिव्ह कोरोना रुग्ण संख्या 13853 वर

    तर उपचार घेणारे 1291 जण आज कोरोना मुक्त

    आज अखेर बरे झालेल्या रुगणांची संख्या 88578 वर

    जिल्ह्याची एकूण कोरोना रुग्णांची नोंद संख्या 105511 वर

  • 21 May 2021 06:34 AM (IST)

    राज्यात दिवसभरात 29 हजार 911 नवे रुग्ण, तर 734 जणांचा मृत्यू

    गेल्या 24 तासात 29 हजार 911 नवे रुग्ण

    गेल्या 24 तासात 47 हजार 371 रुग्ण

    गेल्या 24 तासात 734 जणांचा झाला मृत्यू

Published On - May 21,2021 10:54 PM

Follow us
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.