फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना घेरलं, म्हणाले बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा…
शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागावाटप जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादीच्या जागा अजित पवार घोषित करतील. शिवसेनेच्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित करतील.

मुंबई | 16 मार्च 2024 : मोदी सरकारने देशात नागरिकत्व दुरुस्ती (CAA) कायदा लागू केला आहे. या कायद्याला विरोध करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी याच मुद्द्यावरून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर टीका केली. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांना घेरलं आहे. CAA हा कायदा तीन देशांमधील नागरिकांसाठी आहे. ज्यांच्यावर त्यांच्या देशात अत्याचार होत आहे म्हणू ते भारतात परत आले आहेत अशा व्यक्तींसाठीच हा कायदा करण्यात आला आहे असे ते म्हणाले.
लोकसभा निवडणुकीची घोषणा दुपारी तीन वाजता होणार होती. त्यापूर्वी राज्य मंत्रीमंडळाची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे घेण्यात आली. मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. याचवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, CAA हा कायदा पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या देशामध्ये काही जातींवर अन्याय होत होता. यात हिंदू, शीख, बौद्ध, जैन, पारशी आणि ख्रिश्चन यांचा समावेश आहे. त्या समुदायांना भारतात सुरक्षित आश्रय देण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे. त्यांना भारतीय नागरिकत्व डेबर हा कायदा आहे. कुणाचे नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही असे ते म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांचा मुलगा उद्धव ठाकरे यांनी आता हिंदुत्व सोडले आहे. ते कॉंग्रेस सोबत गेले आहेत. त्यामुळे त्यांनी त्यांचे काय मत आहे ते स्पष्ट करावे. बाळ ठाकरेंचा मुलगा CAA ला कसा विरोध करू शकतो? उद्धव ठाकरे यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला विरोध केला आहे. बाळ ठाकरे यांचा मुलगा हे करू शकतो हे समजणे मला अवघड जात आहे, असा टोला त्यांनी लगावला.
उद्धव ठाकरे सर्वात अपयशी मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे हे सर्वात अपयशी मुख्यमंत्री होते असा टोला लगावून ते पुढे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्या सरकारने मुंबईत ज्या गोष्टी काही वर्षांपूर्वी करायला हव्या होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या. उद्धव ठाकरे यांना मुंबईतील जनतेने अनेक वेळा संधी दिली. पण, त्यांनी त्यांच्यासाठी काहीही केले नाही. त्यांच्याकडून शहरात एकही प्रतिष्ठेचे काम झाले नाही. आता आपल्या मतपेटीसाठी राजकारण करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली.
जागा वाढलेल्या दिसतील
शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपमधील जागावाटप जवळपास 80 टक्के पूर्ण झाले आहे. राष्ट्रवादीच्या जागा अजित पवार घोषित करतील. शिवसेनेच्या जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित करतील. तर, भाजपच्या काही जागा घोषित झाल्या आहेत. तसेच, या निवडणुकीत गेल्या वेळेपेक्षा भाजपच्या जागा वाढलेल्या दिसतील. राष्ट्रवादी आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष सोबत आहेत. त्यांच्याही जागा वाढलेल्या दिसतील असे फडणवीस म्हणाले.
