Dhananjay Munde case | धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याचीही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार

धनंजय मुंडे यांचे मोठे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी संबंधित महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार मुंबईत दाखल करण्यात आल्याची माहिती मिळतेय.

  • महेंद्रकुमार मुधोळकर, टीव्ही 9 मराठी, बीड
  • Published On - 12:24 PM, 15 Jan 2021
Dhananjay Munde case | धनंजय मुंडे यांच्या मेहुण्याचीही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार

बीड: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे मोठे नेते धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप झाल्यानंतर अजून एक मोठी बातमी समोर येत आहे. धनंजय मुंडे यांचे मोठे मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनीही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केल्याची माहिती पुढे आली आहे. पुरुषोत्तम केंद्रे यांनी नोव्हेंबरमध्येच रेणू शर्मा यांच्याविरुद्ध तक्रार केली होती. त्याबाबत आता काही माहिती उघड झाली आहे. (Purushottam Kendre file complaint against Renu Sharma)

पुरुषोत्तम केंद्रे हे धनंजय मुंडे यांचे मधवे मेहुणे आहेत. ते पुण्यात कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय करतात. रेणू शर्मा या धनंजय मुंडे यांना अनेक वर्षापासून ब्लॅकमेल करत होती. त्यामुळे धनंजय मुंडे हे डिप्रेशन मध्ये गेले होते. मेहुणे पुरुषोत्तम केंद्रे यांनी मुंबईत रेणू शर्मा या महिलेविरोधात तक्रार दिली होती. नोव्हेंबर महिन्यात ही तक्रार देण्यात आली असली तरी पोलिसांनी मात्र अद्याप कारवाई केली नसल्याचं समोर आले आहे.

रेणू शर्मा या गायिकेनं धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कारासारखा गंभीर आरोप केलाय. रेणू शर्मा यांनी तशी तक्रार ओशिवरा पोलिस ठाण्यात केली आहे. त्यानंतर राजकीय वर्तुळात मोठी खळबळ माजलीय. या गंभीर आरोपानंतर धनंजय मुंडे यांचं मंत्रीपद जाणार अशी दाट शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सूचक इशारा दिल्यानंतर ही शक्यता सत्यात उतरणार असंच मानलं जात होतं. पण गुरुवारी दुपारी भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांच्याविरोधात पोलिसांना लिहिल्या पत्रानंतर आणि मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनीही दिलेल्या माहितीनंतर धनंजय मुंडे यांच्या बाजूने वातावरण निर्मिती सुरु झाली. गुरुवारी रात्री जयंत पाटील यांच्या निवासस्थानी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीच्या बैठकीनंतर धनंजय मुंडे यांच्यावर गंडांतर तुर्तास दूर झाल्याचं पाहायला मिळालं.

कृष्णा हेगडे यांचं पोलिसांना पत्र

भाजप नेते कृष्णा हेगडे यांनी गुरुवारी दुपारी रेणू शर्मा या धनंजय मुंडेंविरोधात तक्रार देणाऱ्या महिलेविरोधात पोलिसांना एक पत्र दिलं आहे. संबंधित महिलेनं आपल्यालाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या, असंही त्यांनी म्हटलंय.

मनसेच्या मनीष धुरींचाही रेणू शर्मावर गंभीर आरोप

“जर रेणू शर्माच्या जाळ्यात फसलो असतो तर 2008-09 मध्येच माझा धनंजय मुंडे झाला असता. रेणू शर्मा आणि तिच्या बहिणीला उच्चभ्रू लोकांना ब्लॅकमेलिंग करण्याची सवय आहे. कृष्णा हेगडेंनी 2010 मध्ये अनुभव घेतलाय. पण मी 2008- 2009 मध्ये फसणार होतो, मात्र माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो. ही (रेणू शर्मा) आणि हिचं कुटुंब यामधीलच आहे असं वाटतंय”, असं मनीष धुरी म्हणाले.

भाजप नेते कृष्णा हेगडे आणि मनसे पदाधिकारी मनीष धुरी यांनी केलेल्या आरोपानंतर धनंजय मुंडे यांची बाजू काहीशी सावरली गेल्याचं पाहायला मिळत आहे. त्यानंतर आता धनंजय मुंडे यांच्या कुटुंबातील व्यक्तीनेही रेणू शर्मा यांच्याविरुद्ध पोलिसांत तक्रार केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता हे प्रकरण कोणतं नवं वळण घेतं हे पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

महाराष्ट्रातील सर्वात मोठा गौप्यस्फोट, करुणासोबत परस्पर सहमतीने संबंधात दोन मुलं, धनंजय मुंडेंची कबुली

1997 मध्ये ओळख झाल्याचा दावा, धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करणारी रेणू शर्मा कोण?

Purushottam Kendre file complaint against Renu Sharma