साताऱ्यात 'कबीर सिंग-2', मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरचा महिलेवर उपचार

कबीर सिंगचा मोठ्या पडद्यावरील ड्रामा साताऱ्यात खराखुरा पाहायला मिळाला (Satara Kabir Singh). येथे एका डॉक्टरने मद्य प्राशन करुन रुग्णावर उपचार केला. इतकंच नाही तर, या साताऱ्याच्या कबीर सिंगने रुग्ण बरा न झाल्यास स्वत:ची मान कापून देईल, असंही सांगितलं. त्यामुळे संपू्र्ण रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

साताऱ्यात 'कबीर सिंग-2', मद्यधुंद अवस्थेत डॉक्टरचा महिलेवर उपचार

सातारा : काहीच महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेला अभिनेता शाहीद कपूरचा सुपरहीट सिनेमा ‘कबीर सिंग’ आपण सर्वांनीच पाहिला असेल. त्यामध्ये प्रेयसीच्या विरहात डॉ. कबीर सिंग नेहमी मद्यधुंद अवस्थेत असतो (Kabir Singh). तो त्याच्या रुग्णांवरही मद्य प्राशन केल्यावरच उपचार करतो. मात्र, कबीर सिंगचा हा मोठ्या पडद्यावरील ड्रामा साताऱ्यात खराखुरा पाहायला मिळाला (Satara Kabir Singh). येथे साताऱ्याच्या एका डॉक्टरने मद्य प्राशन करुन रुग्णावर उपचार केला. इतकंच नाही तर या साताऱ्याच्या कबीर सिंगने रुग्ण बरा न झाल्यास स्वत:ची मान कापून देईल असंही सांगितलं (Satara Kabir Singh).

माण तालुक्यातील दहिवडी गावात एका महिलेला साप चावला. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला दहिवडीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केलं. येथे ड्युटीवर असलेले डॉ. जगताप यांनी या महिलेचा उपचार केला. उपचार करतेवेळी या डॉक्टरने चक्क मद्य प्राशन केले होते (Satara Kabir Singh). त्यांनी नशेतच महिलेवर उपचार केला. इतकंच नाही तर महिलेला काहीही झाल्यास मी माझी मान कापून देईल असं धक्कादायक वक्तव्य या डॉक्टर महाशयांनी केलं. हे ऐकून रुग्णाच्या नातेवाईक गोंधळले. संपूर्ण रुग्णालयात सध्या या साताऱ्याच्या कबीर सिंगची चर्चा आहे. तसेच, जर डॉक्टर अशा प्रकारे बेजबाबजदारी दाखवतील, तर रुग्णांची जबाबदारी कोण घेणार असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.

रुग्णालयात मद्य प्राशन करुन रुग्णांवर उपचार करणाऱ्या या डॉक्टरांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णाच्या नातेवाईकांनी केली आहे. मात्र, या सर्व प्रकारामुळे दहिवडी येथील सरकारी रुग्णालयातील भोंगळ कारभाराचा पर्दाफाश झाला आहे. आता दहिवडी रुग्णालय प्रशासन या कबीर सिंगवर काय कारवाई करणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागून आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *