नांदेडमध्ये 4.4 रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेडमध्ये 4.4 रिस्टर स्केलचे भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Earthquake in Nanded  magnitude of 4.4 on the Richter scale)

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: Namrata Patil

Jul 11, 2021 | 12:43 PM

नांदेड : राज्यात एकीकडे कोरोनाचे संकट असताना नांदेडमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. नांदेडमध्ये आज वेगवेगळ्या शहरात अनेक भागात सौम्य धक्के जाणवले आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. (Earthquake in Nanded  magnitude of 4.4 on the Richter scale)

मिळालेल्या माहितीनुसार, नांदेड शहरात सकाळी 8:33 मिनिटांनी वेगवेगळ्या भागात भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. त्याशिवाय अनेक भागात जमिनीतून गूढ आवाज देखील झाल्याचे बोललं जात आहे. मात्र नांदेडमध्ये भूकंपाचे हे धक्के जाणवल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे.

यवतमाळमधील साधूनगर भूकंपाचे केंद्रबिंदू

दरम्यान या भूकंपाचे केंद्रबिंदू हे यवतमाळ जिल्ह्यातील साधूनगर असल्याची माहिती भूकंपशास्त्र राष्ट्रीय केंद्राने दिली आहे. त्यांच्या अधिकृत संकेतस्थळावर ही बाब नमूद करण्यात आली आहे. यवतमाळमधील या भूकंपाची तीव्रता 4.4 रिस्टर स्केल इतकी होती. या भूकंपामुळे नांदेड जिल्ह्यात सौम्य धक्के जाणवले असल्याची शक्यता आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे .

पाहा व्हिडीओ : 

संबंधित बातम्या : 

नाशिक महापालिकेला पहिल्या तिमाहीत आर्थिक फटका, 7 हजार थकबाकीदारांना पालिकेची नोटीस, 400 कोटींची थकबाकी

पावसाने ओढ दिल्याने पांढऱ्या सोन्याच्या पेरणीत घट, कपाशीचं क्षेत्र घटण्याची भीती

नवी मुंबईत कोरोना रुग्णसंख्या वाढतीच, 19 जुलैपर्यंत निर्बंध वाढवले

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें