‘हे जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, ही तर जळगावची बदनामी’, आशादीप वसतीगृह प्रकरणावरुन खडसे आक्रमक

या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. या आरोपांमुळे जळगावाची बदनामी झाली, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले. (Eknath Khadse jalgaon ashadip hostel case)

'हे जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही, ही तर जळगावची बदनामी', आशादीप वसतीगृह प्रकरणावरुन खडसे आक्रमक
एकनाथ खडसे

मुंबई : जळगावमधील आशादीप वसतीगृहात (Jalgaon hostel case) पोलिसांनी महिलांना नग्न करुन नृत्य करायला लावल्याचा  प्रकार खोटा असल्याचे समोर आल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) चांगलेच आक्रमक झाले आहेत. आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगावची नाहक बदनामी झाली. या प्रकरणाची सर्व माहिती घेऊनच विरोधी पक्षाने बोलायला पाहिजे होते. या आरोपांमुळे जळगावाची बदनामी झाली, असे परखड मत खडसे यांनी व्यक्त केले. ते मुंबईत बोलत होते. गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी 4 मार्च रोजी या प्रकरणाचा चौकशी अहवाल विधानसभेत मांडला. या अहवालानुसार असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले जात आहे. (Eknath Khadse criticizes bjp and oposition party over commenting on Jalgaon Ashadip hostel case)

“आशादीप वसतीगृह प्रकरणात जळगाव जिल्ह्याची बदनामी झाली आहे. या प्रकरणी विरोधकांनी सर्व माहिती घेऊनच यावर जबाबदार विरोधी पक्षाने बोलायला हवे होते. यामुळे राज्यभर जळगावची बदनामी झाली आहे. कोणतीही माहिती न घेता विरोधकांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. हा प्रकार जबाबदार विरोधी पक्षाचे लक्षण नाही. हा उठावडेपणा आहे,” असे एकनाथ खढसे म्हणाले.

नेमके प्रकरण काय?

जळगावमधील आशादीप या शासकीय महिला वसतिगृहात तरुणींना कपडे काढून नृत्य करायला भाग पाडल्याचा आरोप करण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांकडे या कृत्याचा व्हिडीओही सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी तातडीने दखल घेऊन या प्रकरणाची चौकशी करण्याचे आश्वासन दिले होते. हा प्रकार खडल्यानंतर राज्यात खळबळ उडाली होती. राज्यभरातून महाराष्ट्र पोलीस आणि राज्य सरकार यांच्यावर टीका करण्यात आली. याच मुद्द्यावरुन भाजपच्या अनेक बड्या नेत्यांनी सरकारला धारेवर धरलं. विधानसभेतही हा मुद्दा चांगलाच गाजला होता. मात्र, त्यानंतर जळगावमध्ये महिलांना नृत्य करायला लावण्याचा कोणताही  प्रकार घडलाच नसल्याचे नंतर समोर आले.

असा कोणताही प्रकार घडला नाही 

दरम्यान, अनिल देशमुख यांनी गुरुवारी (4 मार्च) जळगाव वसतीगृह प्रकरणाच्या चौकशी अहवालातील माहिती विधानसभेत मांडली. यावेळी त्यांनी सांगितले की, या प्रकरणाच्या चौकशीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची जी समिती स्थापन करण्यात आली होती, त्यामध्ये चार महिला अधिकाऱ्यांचा समावेश होता. या वसतीगृहात 17 महिला राहत होत्या. 20 फेब्रुवारी रोजी या वसतीगृहात एक मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गरब्याचा डान्स सुरु होता. तेव्हा त्रास होत असल्यामुळे एका महिलेने अंगातील झगा उतरवून ठेवला. याउपर त्याठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. पोलिसांकडून महिलांना नग्न नाचवण्यात आल्याची रत्नमाला सोनार यांनी केलेली तक्रार खोटी असल्याचे अनिल देशमुख यांनी स्पष्ट केले.

इतर बातम्या :

Ashadeep hostel video : मुलींना नग्न करुन व्हिडीओ काढतात, रक्षकच भक्षक कसे बनले, श्वेता महाले कडाडल्या

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI