AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेनेच्या एकत्रिकरणावर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे विधान, थेट भूमिकेने चर्चेला उधाण; म्हणाले आम्ही…

एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले. दानवे यांच्या विधानावर शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. परंतु त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केली.

शिवसेनेच्या एकत्रिकरणावर एकनाथ शिंदे यांचे सर्वात मोठे विधान, थेट भूमिकेने चर्चेला उधाण; म्हणाले आम्ही...
EKNATH SHINDE AND UDDHAV THACKERAYImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jun 01, 2026 | 3:27 PM
Share

Eknath Shinde And Ambadas Danve : विधानपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे यांच्या विधानाची राजकीय वर्तुळात एकचर्चा होत आहे. त्यांनी दोन्ही शिवसेनेच्या एकत्रिकरणावर महत्त्वाचं भाष्य केलं आहे. भविष्यात शिंदे आणि ठाकरे या दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यायला हवे, एकत्र येऊन काम करायला हवे, असे मत दानवे यांनी व्यक्त केले आहे. त्यांच्या या विधानाचे आता अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत. भविष्यात खरंच शिवसेनेचे दोन्ही गट एकत्र येणार का? ते शक्य आहे का? असे विचारले जात आहे. यावरच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट उत्तर दिले आहे. त्यांच्या उत्तराचीही आता सगळीकडेच चर्चा होत आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांसाठीच्या विधानपरिषद निवडणुकीची सध्या धामधूम सुरू आहे. ठाण्यात महायुतीतर्फे शिंदे यांच्या पक्षाचे रवींद्र फाटक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत एकनाथ शिंदे होदेखील होते. अर्ज दाखल केल्यानंतर शिंदे यांनी माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली. याच दरम्यान, त्यांना पत्रकारांनी अंबादास दानवे यांनी केलेल्या विधानाविषयी विचारण्यात आले. दानवे यांच्या विधानावर शिंदे यांनी थेट उत्तर देण्याचे टाळले. परंतु त्यांनी आपली भूमिका मात्र स्पष्ट केली.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

आम्ही बाळासाहेबांचा, हिंदूत्त्वाचा विचार घेऊन पुढे चाललो आहेत. आम्ही महाराष्ट्रातील सर्वसामान्यांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केलेले आहे. एकदा नव्हे तर दोनदा आम्ही हे सरकार स्थापन केलेलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनाला, धनुष्यबाणाला, बाळासाहेब, आनंद दिघे साहेब यांच्या विचारांना, आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना आशीर्वाद दिलेले. त्यामुळे आमची ही घोडदौड अशीच पुढे चालू राहील, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी एकत्रिकरणाचा मुद्दा अप्रत्यक्षपणे खोडून काढला.

अंबादास दानवे नेमकं काय म्हणाले?

शिंदे यांचा गट संपवण्याचं काम भाजपा करत आहे. बाळासाहेब यांच्या विचारांची आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाची जी शिवसेना आहे, तिला कोणीही संपवू शकत नाही. दोन्ही शिवसेना गटांनी एकत्र यावं, असं मला बऱ्याच वेळा वाटतं. परंतु ते मला एकट्याला वाटून काहीही फायदा नाही, असे अंबादास दानवे म्हणाले आहेत.

Follow Us
पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल ठाकरेंचा इशारा
Uddhav Thackeray | पक्षाच्या नावाचा दुरुपयोग करणाऱ्यांचा लवकरच निकाल लागेल! उद्धव ठाकरेंचा सज्जड इशारा
विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले!
Sanjay Gaikwad | विनयभंग, जीवे मारण्याची धमकी; घरी 100 पुरुष पाठवतो म्हणाले! संजय गायकवाडांविरोधात आरती आंबींची पोलिसांत तक्रार दाखल
पुण्याच्या पायाभूत सुविधांचा विकास आणि आधुनिक शहर निर्मितीचे फडणवीसांच
पुण्याला वेगवान गतिशीलता असलेलं शहर बनवणार
नागपुरात डीजेच्या आवाजावर पोलीस ॲक्शन मोडवर
नागपुरात डीजेवरील बंदीनंतर पहिली कारवाई
आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मराठा आंदोलक घोड्यावर बसून अंतरवालीत
बापटांची मराठी ट्रेंडिंग-सीएम फडणवीस
'बापटांची मराठी ट्रेंडिंग,मला ट्यूशनच घ्यावी लागेल'-सीएम फडणवीस
शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! काकडेंच्या दौऱ्याने...
NCP | शरद पवारांची भेट, लगेच सुनेत्रा पवारांची भेट! विक्रम काकडेंच्या दौऱ्याने राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चांना वेग
बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! ठाकरेंचा भाजपवर घणाघात
Uddhav Thackeray | बोगस SRA फॉर्म भरणं हाच मोदींनी दिलेला रोजगार! उद्धव ठाकरेंचा भाजपवर घणाघात
दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! ठाकरेंचं मोठं वक्तव्य
Aaditya Thackeray | दिशा सालियन प्रकरणाशी माझा काडीमात्र संबंध नाही! आदित्य ठाकरेंचं मोठं वक्तव्य; राम कदमांचा थेट सवाल
मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक
Delhi | मारहाणीची कबुली देणारा हिंदुत्ववादी कार्यकर्ता मोकाट कसा? CJP आक्रमक; दिल्लीच्या संसद मार्ग पोलीस ठाण्याबाहेर मोठं आंदोलन