AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा

Shiv Sena : एका बड्या नेत्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिंदे गटात मोठा राजकीय भूकंप? 40 आमदार फुटणार? कधी फुटणार? बड्या नेत्याने केला मोठा दावा
Eknath Shinde NewsImage Credit source: Google
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 23, 2026 | 5:46 PM
Share

राज्याच्या राजकारणात गेल्या काही वर्षांमध्ये मोठे राजकीय भूकंप पहायला मिळाले होते. सर्व प्रथम शिवसेनेत फूट पडली होती. एकनाथ शिंदे अनेक आमदारांना सोबत घेत बाहेर पडले होते. त्यानंतर त्यांनी भाजपच्या साथीने सरकार स्थापन केले होते. कालांतराने राष्ट्रवादीतही फूट पडली होती, अजित पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपद मिळवले होते. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले होते. मात्र आता एका बड्या नेत्याने शिवसेनेत मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

शिवसेनेचे 40 आमदार भाजपच्या संपर्कात – रोहित पवार

राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केलेल्या दाव्याने राजकारणात खळबळ उडाली आहे. रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना म्हटले की, ‘एकनाथ शिंदेंच्या पक्षातले आमदार भाजपच्या संपर्कात आहेत. काही पक्षनिष्ठ आमदार सोडले तर अनेक आमदार संपर्कात आहेत. 2029 च्या निवडणुकांच्या आधी सगळं समोर येईल. जवळपास 40 च्या आसपास आमदार भाजपच्या संपर्कात आहेत.’

मोठ्या राजकीय घडामोडीचे संकेत

रोहित पवार यांच्या दाव्यामुळे राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. आता आगामी काळात पुन्हा राजकीय भूकंप पहायला तर मिळणार नाही ना असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होत आहेत. कारण याआधीही राज्याच्या राजकारणात मोठ्या राजकीय उलाढाली पहायला मिळाल्या होत्या, त्यामुळे रोहित पवार यांच्या या विधानानंतर पुन्हा एकदा मोठी घडामोड घडण्याचे संकेत मिळाले आहेत.

खासगी विमानांबाबत ठोस कायदा व्हायला हवा…

रोहित पवार यांनी बारामतीत बोलताना इतरही मुद्द्यांवर भाष्य केले. रोहित पवार यांनी म्हटले की, ‘दादा जाऊन 4 महिने झाले. दादांच्या अपघाताच्या तपासासाठी अधिवेशनात स्मरण पत्र द्यावं लागलं. अजित पवार आणि आमची एकच इच्छा असल्यामुळे विलिनीकरणाची चर्चा शेवटच्या टप्प्यात आली होती. दादा गेल्यामुळे चर्चा थांबली. दादांच्या विमानाचा अपघात झाला ते खासगी विमान होतं. उद्या आणखी कोणत्या नेत्याचा अपघात होऊ शकतो. त्यामुळे खासगी विमानांबाबत ठोस कायदा झाला पाहिजे.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ