भाजपनं रान उठवलं, ऊर्जा मंत्री म्हणतात, चुकलं तर माफ करा पण..!

जुनी थकबाकी दाबण्यासाठीच भाजप आंदोलन करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. वीज बिल भरलंच नाही तर वीज निर्मिती कशी होणार? असा प्रश्न विचारत ऊर्जामंत्र्यांनी जनतेला वीज बिल भरण्याचं आवाहन केलं आहे.

भाजपनं रान उठवलं, ऊर्जा मंत्री म्हणतात, चुकलं तर माफ करा पण..!
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 5:48 PM

नागपूर : वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावरुन भाजपनं आज रान उठवल्याचं चित्र राज्यभरात पाहायला मिळालं. त्यावर ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. महावितरण आता संकटात आहे. भाजपच्या काळात मोठ्या प्रमाणात थकबाकी वाढली होती. त्याचा परिणाम आता दिसत आहे. जुनी थकबाकी दाबण्यासाठीच भाजप आंदोलन करत असल्याची टीका राऊत यांनी केली आहे. वीज बिल भरलंच नाही तर वीज निर्मिती कशी होणार? असा प्रश्न विचारत ऊर्जामंत्र्यांनी जनतेला वीज बिल भरण्याचं आवाहन केलं आहे. भाजपच्या आंदोलनानंतर नितीन राऊत यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडलं.( Nitin Raut criticizes BJP’s agitation against light bill)

कोरोना काळात आणि आताही महाविकास आघाडी सरकार जनतेसाठी काम करत आहे. कोरोना काळात 24 तास वीज पुरवठा करण्यासाठी आमच्या कर्मचाऱ्यांनी चांगलं काम केल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. तसंच वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ग्राहकांसोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोप भाजप करत आहे. पण आम्ही असं काहीही केललं नाही. फक्त नोटीसा दिल्या आहेत. वाढीव बिल आले असेल तर त्यांना हप्ते पाडून देण्याची सवलत दिली. ग्राहक कार्यालयात आल्यास त्यांचंही समाधान केलं जात आहे. आम्ही मागितलेली मदत केंद्रानं दिली असती तर वीज बिलमाफी बाबत विचार करता आला असता, असंही ऊर्जामंत्री म्हणाले.

चुकलं तर माफ करा, पण वीज बिल भरा!

भाजपचे हे आंदोलन म्हणजे फसवणूक आहे. केंद्र सरकार आम्हाला कोळसा आणि वीज निर्मितीसाठी लागणारं साहित्य देणार का? असा सवालही राऊत यांनी विचायरलाय. भाजप आणि केंद्र सरकारच्या असंवेदनशील वागण्यामुळे महावितरण अडचणीत आहे. ग्राहक हा आमच्यासाठी देवासारखा आहे. आमचं चुकलं असेल तर माफ करा. पण वीज वापरली असेल तर बिल भरावंच लागेल, अशी हतबलताही ऊर्जामंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

राज्यभरात भाजपनं जे आंदोलन केलं ते फसवं ठरलं आहे. भाजपच्या या आंदोलनाला प्रतिसाद मिळाला नाही. 79 टक्के लोकांनी बिल भरलं असल्याचा दावा ऊर्जामंत्र्यांनी केलाय. ज्या प्रमाणे मागील निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. त्यातून बाहेर निघण्याचा ते केविलवाणा प्रयत्न करत असल्याचा टोलाही राऊतांनी लगावलाय.

भाजपचं टाळे ठोको आंदोलन

सरकारच्या वीज कनेक्शन तोडीविरोधात शुक्रवारी भाजपनं संपूर्ण राज्यात टाळे ठोको आंदोलन केलं. महाविकास आघाडी सरकारचा 72 लाख कनेक्शन तोडण्याचा निर्णय म्हणजे ही मोगलाई आहे, अशी टीका भाजप नेत्यांनी केली आहे. आधी 100 युनिट माफ करणार असं सांगितलं. लोकप्रिय घोषणा केली खरी पण पुढे काय झालं?, वीज बिलात माफी देण्याची वेळ आली तेव्हा उर्जामंत्र्यांचा प्रस्ताव उपमुख्यमंत्र्यांनी फेटाळला. ज्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यांना आधीच काही मिळाल नाही, तर मग ही लोकं पैसे कसे भरणार? असा सवाल भाजप नेत्यांनी केला आहे. 72 लाखांची वीज कनेक्शन तोडणार असेल तर याचा फटका कोट्यवधी लोकांना बसणार आहे. राज्य सरकारच्या या निर्णयाविरोधात भाजपनं शुक्रवारी राज्यभर आंदोलन केलं. त्यावेळी नागपूर, रत्नागिरी, जळगाव, मुंबई, ठाणे, जामनेर, यवतमाळ, परभणी अशा अनेक ठिकाणी भाजपनं महावितरणच्या कार्यालयाला टाळं ठोकलं.

संबंधित बातम्या :

5 फेब्रुवारी रोजी एमएसईबीवर ‘टाळे ठोको’ आंदोलन; भाजप देणार आघाडी सरकारला शॉक

बिलात 50 टक्के सूट द्या, वीज कापू नका, मनसेचं शिष्टमंडळ ऊर्जामंत्र्यांच्या भेटीला

Nitin Raut criticizes BJP’s agitation against light bill

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.