शेतकरी संघटनांचा 6 फेब्रुवारी रोजी देशव्यापी ‘चक्का जाम’; काँग्रेसचीही उडी

गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शांततेत आंदोलन केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. (Farmers announce 'chakka jam' on Feb 6; security measures tightened)

शेतकरी संघटनांचा 6 फेब्रुवारी रोजी देशव्यापी ‘चक्का जाम’; काँग्रेसचीही उडी
farmers-protest-photo
Follow us
| Updated on: Feb 05, 2021 | 4:54 PM

मुंबई: गेल्या दोन महिन्यापासून दिल्लीत शांततेत आंदोलन केल्यानंतर आता आंदोलक शेतकरी रस्त्यावर उतरणार आहेत. उद्या 6 फेब्रुवारी रोजी शेतकऱ्यांनी दिल्ली सोडून संपूर्ण देशात चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. या आंदोलनाला काँग्रेसनेही पाठिंबा दिला असून काँग्रेस कार्यकर्ते या आंदोलनात उतरणार आहेत. (Farmers announce ‘chakka jam’ on Feb 6; security measures tightened)

दुपारी 12 ते 3 दरम्यान आंदोलन

संयुक्त किसान मोर्चाने दिल्ली वगळून उद्या देशभर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. उद्या दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत हे चक्काजाम आंदोलन होणार आहे. देशातील सर्व राष्ट्रीय महामार्गांवर हे आंदोलन केलं जाणार आहे. यावेळी वाहतूक कोंडीत अडकलेल्या लोकांची शेतकरीच काळजी घेणार आहेत. वाहतूक कोंडीत अडकलेल्यांसाठी मोफत जेवण आणि पाणी देण्याची व्यवस्था शेतकरी करणार आहेत.

शहांचा महाराष्ट्र दौरा रद्द

भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या 6 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार होते. उद्या सिंधुदुर्गात भाजप नेते नारायण राणे यांच्या मेडिकल कॉलेजचं शहा यांच्या हस्ते उद्घाटन होणार होतं. पण शेतकऱ्यांच्या चक्काजाम आंदोलनामुळे उद्याचा दौरा रद्द करण्यात आला असून आता शहा रविवारी सिंधुदुर्गात येणार आहेत.

काँग्रेसचा पाठिंबा

कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी दिल्लीच्या सीमांवर ७० दिवसांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार शेतकऱ्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. शेतकरी आंदोलन चिरडू पाहणाऱ्या मोदी सरकार विरोधात दिवसेंदिवस हे आंदोलन तीव्र होत आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून संयुक्त किसान मोर्चाने 6 फेब्रुवारी रोजी देशभर तीन तासांच्या चक्काजाम आंदोलनाची हाक दिली आहे. काँग्रेस पक्षाचा या ‘चक्का जाम’ला पाठिंबा आहे, अशी माहिती महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

केंद्र सरकार नाटक करतंय

देशाचा अन्नदाता आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरला आहे. परंतु केंद्रातील भाजपाचे हुकूमशाही सरकार त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. कृषी कायदे हे शेतकऱ्यांना देशोधडीला लावणारे आहेत त्यामुळेच ते रद्द करावेत ही मागणी लावून धरत महाराष्ट्रासह देशभर आंदोलन करुन काँग्रेस शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला आहे. कृषी कायदे मंजूर करवून घेताना संसदेत चर्चा केली नाही. विरोध तीव्र होत असताना आता मात्र मोदी सरकार शेतकऱ्यांशी चर्चा करत असल्याचे केवळ नाटक करत आहे, असा दावा थोरात यांनी केला आहे. (Farmers announce ‘chakka jam’ on Feb 6; security measures tightened)

मोदींच्या हटवादीपणामुळे जगभर नाचक्की

दिल्लीच्या सीमांवर ठाण मांडून बसलेल्या शेतकऱ्यांवर मोदी सरकारने अनन्वीत अत्याचार सुरु केले आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना अन्न-पाणी मिळू नये अशी कोंडी मोदी सरकारकडून केली जात आहे. दिल्लीत प्रवेश करू नये म्हणून रस्त्यांवर मोठे बॅरिकेट्स लावून तटबंदी उभी केली आहे. रस्त्यावर खिळे ठोकले आहेत, इंटरनेट सेवाही बंद केली आहे. मोठा पोलीस फौजफाटा लावून शेतकऱ्यांचे आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला जात आहे. शेतकरी आंदोलनाला जगभरातून पाठिंबा वाढत असून मोदी सरकारच्या हटवादीपणामुळे भारताची जगभऱ नाचक्की होत आहे, असा घणाघातही त्यांनी केला. (Farmers announce ‘chakka jam’ on Feb 6; security measures tightened)

संबंधित बातम्या:

काँग्रेस हायकमांडनं नियुक्त केलेली टीम नाना पटोले वाचलीत का? एका क्लिकवर सर्व नावं

नरेंद्रसिंह तोमर भडकले; राज्यसभेत म्हणाले काँग्रेसला रक्तापासून शेती करायचीय

नरेंद्र मोदी पुन्हा पश्चिम बंगाल दौऱ्यावर, ममता बॅनर्जी ही उपस्थित राहणार, यावेळी काय घडणार?

(Farmers announce ‘chakka jam’ on Feb 6; security measures tightened)

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.