पुण्यातील इंद्रायणीनंतर आता गोदावरी नदीतही मोठी दुर्घटना, भाविकांना जलसमाधी
इंद्रायणी नदीवरील पूल कोसळून पुण्यात मोठी दुर्घटना घडली आहे, सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे, त्यानंतर आता गोदावरी नदीमध्ये देखील पाण्यात उतरलेल्या भाविकांचा मृत्यू झाला आहे.

पुण्यात आज दुपारी साडेतीनच्या सुमारास मोठी दुर्घटना घडली आहे. इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला या दुर्घटनेत सहा पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. मावळमध्ये कुंड मळ्यात हा पूल कोसळला. आज रविवार असल्यानं या ठिकाणी पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. जेव्हा ही घटना घडली तेव्हा या पूलावर 50 पेक्षा अधिक पर्यटक होते, तसेच काही जणांनी या पूलावरून दुचाकी देखील नेली, वजन वाढल्यामुळे हा पूल कोसळल्याची चर्चा आहे.
दरम्यान दुसरीकडे पुण्यानंतर आता बासरमधून देखील मोठी बातमी समोर येत आहे. बासरच्या गोदावरील नदीपात्रात बुडून पाच भाविकांचा मृत्यू झाला आहे. हे सर्वजण हैदराबादवरून बासर येथे देवीच्या दर्शनाला आले होते. गोदावरील नदीच्या पात्रात अंघोळीसाठी उतरले असताना ही घटना घडली आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, नांदेड आणि धर्माबाद सीमेलगत तेलंगणा राज्यात बासर हे गाव आहे. बासरमध्ये देवीचं दर्शन घेण्यासाठी हैदराबादवरून भाविक आले होते. यावेळी त्यांनी बोटीनं नदीपात्रात प्रवेश केला, त्यानंतर ते अंघोळ करण्यासाठी बोटीतून नदीपात्रात उतरले, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यानं पाच भाविकांचा या घटनेत बुडून मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांचा समावेश आहे.
तर दुसरीकडे आज पुण्यातील इंद्रायणी नदीत देखील मोठी दुर्घटना घडली आहे. मावळमध्ये कुंड मळ्यात इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला. या घटनेत 20 ते 25 जण वाहून गेले आहेत. तर या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच तातडीनं पोलीस घटनास्थळी दाखल झाले, बचाव कार्य सुरू असून, काही जणांना वाचवण्यात यश आलं आहे. आज दुपारी साडतीनच्या सुमारास ही घटना घडली आहे. रविवार असल्यामुळे या ठिकाणी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणत होती. याच दरम्यान ही दुर्घटना घडली. पुलाचे दोन तुकडे झाले आहेत. या घटनेत वीस ते पंचवीस जण वाहून गेले.
